Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | अंगणवाडी सेविकांना मिळणार लाभ |
Anganwadi Sevika News Maharashtra 2024
नमस्कार, लहान मुलाच्या घराबाहेरच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे अंगणवाडी. या अंगणवाडीमध्ये लहान मुले येतात,हसत खेळत बागडतात, ते अगदी आपल्या घरासारखे. आणि या अंगानावाडी मध्ये हसत खेळत वातावरण राखण्याचे काम करतात ते म्हणजे अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस होई. 3 वर्षे पूर्ण झालेलं लहान मुल आपल्या आईचा हात सुडून बाहेर पडत ते या सेविकांच हात धरून. मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याची हीच पहिली पायरी आहे.
या अंगणवाडी चे कर्मचारी यांच्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असते. या कर्मचार्यांनी कित्येक वेळा त्यांच्या प्रश्नासाठी आवाज देखील उठवला आहे. त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात, हि त्यांची मागणी आहे.
त्यामुळे या वर्षी शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडला आहे.अगदी शेतकऱ्यापासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत आणि महिलांपासून मुलींपर्यंत प्रत्येक वर्गासाठी भरपूर आशा घोषणा केल्या आहेत.अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर साठी तर फडणवीस सरकारने मोठी गुड न्यूज दिली आहे सेविकांचे पगार वाद्व्ण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच त्यांना चांगले मानधन मिळणार आहे.
Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | वाचकांना विनंती |
मित्रानो रोज आपण शासनाचे नवनवीन निर्णयाय पाहत असतो. नवीन GR पाहत असतो. त्याचा फायदाही आपणाला होत असतो. त्याच प्रमाणे आज आपण अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढी बाबतचा GR पाहणार आहोत.त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या घरात किंवा परिसरात ज्या अंगणवाडी सेविका असतील, तर त्यांच्या पर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. हि विनंती.
हे देखील वाचा –
Krushi Dron Subsidy Yojana Maharashtra 2024 | New | कृषी ड्रोन अनुदान योजना महाराष्ट्र |
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | New | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | Good News | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र |
Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | सेविकंच्या या होत्या मागण्या |
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावे.
- या सेविकांना वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर सर्व शासकीय कर्मचार्या प्रमाणे लाभ द्यावेत.
- अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे.
- तसेच अंगणवाडी मदतनिसांना 20 हजार रुपये मानधन द्या.Anganwadi Sevika News Maharashtra 2024 |
- महागाई दुपटीने वाढते आहे त्यामुळे दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करण्यात यावी.
- सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शन मंजुरीचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा.
- अंगणवाड्यासाठी मनपा हद्दीत 5 हजार ते 8 हजार भाडे मंजूर करावे.
- अंगणवाडी आहाराचा दर बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा.
वरील सर्व मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा कित्येक दिवस लढा चालू होता. अंगणवाडी बंद ठेवून बेमुदत संपावर एक महिना सेविका व मदतनीस होत्या. त्यामुळे शासन दरबारी विरोधाकाकडून अधिवेशनात सरकारला घेरण्यात आले. त्यामुळे शासन कडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅच्युईटी, पेन्शन आणि मानधनात वाढ करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.Anganwadi Sevika News Maharashtra 2024 |
राज्यात अगोदर आघाडी चे सरकार होते, मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या पेन्शन, मानधन आणि ग्रच्युइति साठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल होत.त्यानंतर आता महायुतीचे सरकार त्यावर शिक्कामोर्तब करेल.
Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | सेविकांसाठी शासन निर्णय |
अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात, यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन केल होत. त्यानंतर आता मात्र राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देण्याची ग्रॅच्युईटीची रक्कम जवळपास निश्चित केली आहे. पेन्शन बाबतही निर्णय झाला असून, मानधनात हि वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेली आहे. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार, त्याचसोबत ग्रॅज्युएटीही जाहीर झाल्याच कळतंय. हा निर्णय झाल्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना 1 लाख 55 हजारापासून ते 1 लाख 76 हजारापर्यंत ग्रॅज्युएटी मिळेल.Anganwadi Sevika News Maharashtra 2024 |
मानधनातील वाढ पुढीलप्रमाणे :
- आशा स्वयंसेविकांचे मानधन रुपये 3500 वरुन रुपये 5000
- गटप्रवर्तकांचे मानधन रुपये 4700 वरुन रुपये 6200
- अंगणवाडी सेविकांचे मानधन रुपये 8325 वरुन रुपये 10,000
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन रुपये 5975 वरुन रुपये 7200
शासन GR पाहण्यासाठी येथे Click करा.
Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | दोन लाख अंगणवाडी सेविकांना लाभ मिळणार |
सध्या महाराष्ट्र राज्यात 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार अंगणवाडी सेविका आणि 90 हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचार्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी जानेवारी मध्ये झालेल्या बैठकीत अंगणवाडी सेविकांचे मानधन 8500 वरून दीड हजार वाढविणे आणि मदतनीस 4500 वरून एक हजार वाढविणे. या बाबत आश्वासन दिले होते. मात्र अंगणवाडी सेविकांचे काम व महागाई पाहता त्यांना किमान सेविकास 15000 हजार प्रती महिना व मदतनीस 10000 प्रती महिना वाढविणे गरजेचे आहे.Anganwadi Sevika News Maharashtra 2024 |
तसे पाहता पेट्रोल, गॅस, अन्नधान्य आदींची वाढती महागाई लक्षात घेत, कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात यावा, त्याचबरोबर पोषण ट्रॅकर अँपमध्ये अंगणवाडी सेविकांनी भरावयाची माहिती इंग्लिशमध्ये असून, ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या सेविकांचा विचार करून ही संपूर्ण माहिती मराठीमध्ये भरण्याची सोय करून देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
Anganwadi Sevika News Maharashtra 2024 | अंगणवाडी सेविकांना होणारा फायदा |
- यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
- यामुळे त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल.Anganwadi Sevika News Maharashtra 2024 |
- या निर्णय यामुळे पेन्शन लागू झाल्याने उतारवयात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
- अंगणवाडी सेविका स्वावलंबी व आत्म निर्भर होतील.