आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 – 26 |
RTE Admission 2025 – 26
RTE Admission Open
RTE Admission
Right to education
RTE Admission Maharashtra
नमस्कार, RTE Admission 2025 – 26 शिक्षण हक्क कायदा ( आरटीई ) अंतर्गत 25% राखीव जागांसाठी आता खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्य सरकारने ही मुदत वाढवून 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत जाहीर केली आहे. यापूर्वी 14 जानेवारी ते 27 जानेवारी हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु पालकांना अर्ज करण्यासाठी संधी मिळावी, यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली | ” या ” दिवशी मिळणार पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता | सविस्तर माहिती |
नक्की काय आहे ? आरटीई कायदा |
आरटीई ( Right to Education ) कायदा 2009 अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण मिळवून देणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. शालेय शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावरी या कायद्याअंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेश देण्यात येतो आणि विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्काची परिपूर्ती राज्य सरकार करत असते. या दुर्बल आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून आपले शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी या कायद्याअंतर्गत अधिकार प्राप्त होतो.
RTE Admission 2025 – 26 | वयोमर्यादा |
अ. क्र | प्रवेशाचा वर्ग | किमान वयवर्ष | वयाबाबत मानीव दिनांक |
1. | प्ले ग्रुप \ नर्सरी ( इयत्ता १ ली पूर्वीच्या 3 रा वर्ग ) | 3 + | 31 डिसेंबर |
2. | इयत्ता 1 ली | 6 + | 31 डिसेंबर |
ट्रॅक्टर मळणी यंत्रासाठी मिळणार 50 % अनुदान | आजच करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज |
वरील माहितीनुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी 31 डिसेंबर रोजी किमान वय 3 वर्षापेक्षा अधिक असावे, तरी आता पहिलीसाठी किमान वय 6 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- प्ले ग्रुप \ नर्सरी साठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 च्या दरम्यानचा असावा.
- ज्युनिअर केजी साठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 च्या दरम्यानचा असावा.
- सिनियर केजी साठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 च्या दरम्यान असावा.
- इयत्ता पहिलीसाठी साधारणपणे बालकाचा जन्म सामान्यपणे दिनांक 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 च्या दरम्यानचा असावा.
वयोमर्यादा 2025 – 26 |
- दिनांक 25 जुलै 2019 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सण २०२५ – २६ या शैक्षणिक क्षेत्रात आर टी ई 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात आले आहेत. RTE Admission 2025 – 26
- शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी दिनांक 18 \ 9 \ 2020 रोजी च्या शासन निर्णय आणि मानवी दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेले आहे. शासन निर्णयाने पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशासाठी चे किमान वय वरील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.
- शासन निर्णय दिनांक 25 जुलै 2019 नुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान व यामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांची शिस्त देण्यात आलेली आहे. तरी उपरोक्त प्रमाणे आरटीई 25 % सन 2025 – 26 च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आरटीई अंतर्गत अर्ज प्रक्रियेला सुरुवात | आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा | अर्ज करण्यासाठी ” ही ” आहे शेवटची तारीख |
आर टी ई प्रवेश फॉर्म कसा भरावा ?
- पालकांना आरटीई साठी ऑनलाईन फॉर्म भरावायाचा आहे.
- ऑनलाइन फॉर्म भरताना खालील लिंक वर क्लिक करून, न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे.
- https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
महत्वाची सूचना
आरटीई ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दिनांकाच्या आत आपला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. RTE Admission 2025 – 26