Mission Shakti Palnaghar Scheme |
Mission Shakti palnaghar scheme
Shakti palnaghar Yojana
Sevika modatnis pramotion
Palnaghar Yojana Maharashtra
345 palnaghar started from 2024
नमस्कार, Mission Shakti palnaghar scheme केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ” मिशन शक्ती ” या योजनेअंतर्गत राज्यातही सामर्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यात पाळणाघर अंगणवाडी ( अंगणवाडी कम क्रॅश ) योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यात 345 पाळणाघर सुरू करण्यात येणार असून, त्या पाळणाघरात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहे.
महिला आणि बालविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना राबविण्यात येत होती.
मात्र केंद्र सरकारने या योजनेचे राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये रूपांतर करून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत याचा समावेश केला आहे. त्यानुसार 2022 मध्ये पाळणाघर सुरू करण्याबाबतचे आदेश देऊन 2023 मध्ये सविस्तर सूचना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 345 पाळणाघरी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे अनुक्रमे 60 व 40 टक्के अनुदान आहे. Mission Shakti palnaghar scheme
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचा शुभारंभ | बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात |
पाळणाघर योजना सविस्तर माहिती |
मिशन शक्ती Mission Shakti palnaghar scheme या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात पाळणाघर योजना सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. या पाळणाघर योजनेत प्रती पाळणाघर वार्षिक खर्च हा 3 लाख 36 हजार 600 रुपये इतका आहे.
त्यात पाळणाघरातील अंगणवाडी सेविका यांना 1500 हजार रुपये भत्ता, अंगणवाडी मदतनीस यांना 750 भत्ता, पाळणावर सेविका यांना 5000 हजार 500 रुपये, पाळणाघर मदतनीस यांना 3000 हजार रुपये असे मानधन दिले जाणार आहेत.
तसेच पूर्व शालेय घटक संच, पोषण आहार, औषधी संच खेळणी दिले जाणार आहेत. पाळणाघर भाड्यासाठी महानगर क्षेत्रासाठी 12 हजार रुपये तर महानगर क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रासाठी 8000 रुपये भाड्या निश्चित करण्यात आले आहे. पाळणाघर उभारणीसाठी एक वेळ 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच पाळणाघर योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. पाळणाघर सेविका मदतनीस यांच्या नियुक्ती बाबतच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना स्वातंत्रपणे दिल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Mission Shakti palnaghar scheme
पाळणाघर योजनेच्या अंमलबजावणीसाठी समित्या |
राज्यात 345 पाळणाघर उभारण्याची योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरावर समित्यांची रचना करण्यात आली आहे. त्यात महिला आणि बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती, एकात्मक बालविकास सेवा योजना विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तालय स्तरावरील समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर अंगणवाडी सेविका यांच्या अध्यक्षतेखाली पाळणाघर स्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे. Mission Shakti palnaghar scheme
3 thoughts on “मिशन शक्ती योजनेअंतर्गत राज्यात 345 पाळणाघरे सुरू होणार | Mission Shakti Palnaghar Scheme | सेविका, मदतनीस यांची नियुक्ती होणार |”