यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |

Table of Contents

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना |

Yashvantrao Chavhan Gharkul Yojana 2024 yashvantrao chavhan mukt vasahat yojana maharashtra yashvantrao chavhan yojana marathi gharkul yojana onlain form yashvantrao chavhan mukt vasahat yojana 2024

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांच्या गरजा व समस्या ओळखून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात असतात. या योजना कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र आणि जेष्ठ नागरिक भविष्य निर्वाह निधी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांना आपले जीवन जगताना हाल अपेक्षा सहन कराव्या लागू नयेत यासाठी या योजना राबविल्या जात असतात.

भारत देश स्वतंत्र होऊन किती काळ लोटला तरीही भटक्या विमुक्त समाज अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवास आलेला आहे. या  समाजाचा विकास करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचे राहणीमान सुधारून स्थिरता प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांना स्वतःची जागा उपलब्ध करून त्यांची वसाहत उभी करणे खूप महत्त्वाचे आहे.

राज्यात पूर्वी अस्तित्वात असलेल्या सहकारी गृहनिर्माण योजना अंतर्गत २० टक्के लाभार्थ्याच्या सहभाग 30 % शासनाकडून बांधकाम अनुदान व 50 टक्के वित्तीय संस्थाकडून कर्ज उपलब्ध करून संस्थेची उभारणी केली जात होती.
राज्यात यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून ” यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना “ सुरुवात करण्यात आली. या प्रवर्गातील कुटुंबांची राहण्याची सोई, तसेच त्यांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देवून, स्थिर जीवन प्राप्त करणे, यासाठी ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण मुक्त योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली.

या योजना अंतर्गत उत्पन्न 50 हजार पर्यंत असेल अशा लाभार्थ्यांनी साठ हजार रुपये ते 1 लाख पर्यंत बांधकाम अनुदान रक्कम मंजूर करून देते. तसेच पात्र संस्थांना शासकीय अथवा खाजगी जमिनी विकत घेण्यासाठी अनुदान देण्यात येते.
परंतु तरी या संस्थेतील सभासदांची वार्षिक उत्पन्न कमी असल्याने त्यांना कोण द्वितीय संस्था वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत नाही. तसेच बांधकाम साहित्यचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी म्हणावी तितक्या प्रमाणात होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेच्या माध्यमातून विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांना राहणीमान उंचवून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून स्थिरता  प्राप्त करून देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रत्येकी पाच गुंठे जमीन उपलब्ध करून देऊन त्यावर 269 चौरस फूट जागेवर घर बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभाचे स्त्रोत असणाऱ्या संधी उपलब्ध करून देणे.
राज्यात  ग्रामीण भागातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये या प्रवर्गाचे जास्त लोकसंख्या असलेले 3 जिल्ह्यातील गावे निवडण्यात येतात व त्यातील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनाकडून इतर मागास प्रवर्ग समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेत आहोत. त्या योजनांचा लाभ घ्यावयाची माहिती आपण घेतली आहे.
त्याचप्रमाणे आज आपण शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या भटक्या विमुक्त जाती- जमातीच्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची माहिती घेणार आहोत.  त्सायाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी भटके प्रवर्गातील लोक असतील जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नावयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
लाभार्थीभटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गातील लोक
लाभमोफत घर बांधून देणे
उद्देशभटक्या प्रवर्गातील कुटुंबांचा विकास करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

हे देखील वाचा – 

ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |

शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |

कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |

जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |

havan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा उद्देश |

  • राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील लोकांना मूळ प्रवाहात आणून, उत्पन्न वाढीचे स्त्रोत उपलब्ध करून देऊन, त्यांना स्थिरता प्राप्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करणे व त्या ठिकाणीच त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे, हा त्यामागील मागील उद्देश आहे.
  • या समाजाचा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास करणे.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती लोकांच्या जीवनाला स्थिरता प्राप्त करून देणे, हा या योजनेमधील मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून या समाजातील प्रवर्गातील लोकांना स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनवणे.

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत देण्यात येणारा प्राधान्यक्रम |

महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंब पुढीलप्रमाणे  प्राधान्यक्रम देण्यात येतो :

  1. पालात राहणारे म्हणजेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे
  2. दारिद्र्य रेषेखालील
  3. कुटुंब घरात कोणीही कमावत नाही आशी कुटुंबे
  4. विधवा
  5. परितेक्त्या
  6. अपंग महिला पूरग्रस्त क्षेत्र

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पात्रता निकष |

  • या योजनेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील सर्व नागरिकांसाठी योजना लागू राहिली.
  • या योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20000/-  हजार पेक्षा कमी असावी.
  • या योजनेतील अर्जदार हा बेघर अथवा झोपडपट्टी, कच्चे घर, पालामध्ये राहणारा असावा.
  • अर्जदार बेघर असावा परंतु स्वताची जागा आवश्यक आहे.
  • या योजनेचे अर्ज करणारा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • अर्जदार कुटुंबाने महाराष्ट्र राज्यत  कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेतील अर्जदार हा कुठल्याही बँकेचा, वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • यशवंतराव चव्हाण वसाहत योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला देण्यात येतो.
  • अर्जदार कुटुंब वर्षभरातील सहा महिने एका ठिकाणी वास्तव्यास असला पाहिजे.

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना नियम व आटी |

  1. या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना दिला जाणार नाही.
  2. लाभार्थी कुटुंबाला मिळणारा भूखंड व त्यावरील घरी संयुक्तपाने  पती व पत्नीच्या नावे केली जाईल.
  3. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भूखंड व त्यावरील घरे कोणत्या कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला हस्तांतर करता येणार नाही, तसेच विकता येणार नाही.
  4. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका सदस्याला दिला जातो.
  5. या योजनेअंतर्गत पत्र लाभार्थ्याला मिळणारा भूखंड हा स्वतःचे उत्पन्न स्त्रोत वाढवण्याकरता दिलेला आहे, त्यामुळे ते घर अथवा जागा भाडेतत्त्वावर कोणाशी देता येणार नाही तसे असल्यास या योजनेचा लाभ रद्द केला जातो.
  6. या योजनेअंतर्गत दिलेल्या घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत कडून आकारण्यात आलेले घरपट्टी, भाडेपट्टी, पाणीपट्टी स्वतः लाभार्थ्याला भरावी लागेल, तसेच घराची देखभाल ही त्याला स्वतःलाच करावी लागणार आहे.

 

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | या मुक्त वसाहत योजनेतील भूखंड व त्यावरील क्षेत्रफळाची किंमत |

  • सदर योजना हि ग्रामीण भागामध्ये राबवण्यात येईल, प्रत्येक लाभार्थी पात्र कुटुंबास 5 गुंठे जमीन व 269 चौरस फूट चे घर देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठीची कमाल खर्च मर्याद्री 1,70000/- रुपये  इतकी ठरवण्यात आली आहे. या घराचा आराखडा हा अनुसूचित जाती व बौद्ध घटकासाठी राबवण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील आराखड्याचे प्रमाणे ठेवण्यात आलेला आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत राबविण्यात येणारा बांधकाम प्रकल्प आहवाल व पायाभूत सुविधा |

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुक्त वसाहतीमध्ये घरांबरोबरच पिण्याची पाण्याची सुविधा, सार्वजनिक शौचालय सुविधा, तसेच नळाचे पाणी, गटार, समाज मंदिरे व सार्वजनिक वाचनालय या सर्व पायाभूत सुविधांचा प्रकल्प आराखडा तयार करणे.
  • या योजनेअंतर्गत घराच्या बांधकामाबरोबरच वसाहती मधील इतर कामांसाठीची तसेच घराच्या कामाची जबाबदारी पत्र लाभार्थी कुटुंबावर दिलेली आहे.
  • या योजने अंतर्गातील अनुदान रक्कम जिल्हा विकास यंत्रणेमार्फत हि थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते, तसेच घर बांधकामाचे प्रगतीनुसार तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाने घर बांधण्यासाठी असमर्थता दर्शवल्यास जिल्हा विकास यंत्रणेमार्फत ठरवून दिलेल्या बांध काम व्यवसायिकास तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत घर बांधण्यासाठी हरकत नसावे. मात्र आशा स्वयंसेवी संस्थांची निवड हि शासनामार्फत करण्यात येईल.

 

Yashvantrao Chavan Gharkul Yojana | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. मतदान ओळखपत्र
  4. सक्षम अधिकारी दिलेले जात प्रमाणपत्र
  5. कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  6. भूमीहीन असल्याचे प्रमाणपत्र
  7. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले प्रमाणपत्र
  8. ईमेल आयडी
  9. मोबाईल नंबर
  10. बँक पासबुक
  11. पासपोर्ट साईझ फोटो
  12. इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र

 

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा |

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी पूर्वीप्रमाणे वीस कुटुंबासाठी एक हेक्टरी जमीन उपलब्ध होत नसल्यास हि आट शिथिल करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याने गठीत केलेल्या समितीस आहे.
  • योजनेतील पात्र दहा कुटुंबासाठी जर जमीन उपलब्ध होत असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • सदर योजनेचा लाभ हा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर पात्र लाभार्थी कुटुंबांना दिला जाईल.
  • सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागासाठी देण्यात यावा.
  • वसाहतीमध्ये सामूहिकरीत्या घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत असल्यास द्यावी, अन्यथा वैयक्तिक रित्या जागा उपलब्ध असेल तरीही योजनेचा लाभ दिला जावा.
  • ज्या पात्र लाभार्थ्याकडे स्वतःचे घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे व त्यांनी यापूर्वी कोणत्याही केंद्र व राज्य शासनाच्या आवास योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जावा.
  • नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात या योजनेचा लाभ दिला जाऊ नये.
  • या योजनेसाठी सामूहिक जमीन शासकीय उपलब्ध नसल्यास खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात यावी.

 

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | अर्ज करण्याची पध्दत |

  1. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आपल्याला जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात  जावे लागेल.
  2. तिथे जिल्हा सहाय्यक आयुक्त यांच्याकडून या योजनेचा अर्ज घ्यावा.
  3. हा अर्ज वाचून अचूक व व्यवस्थित भरावा.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत जोडाव्यात.
  5. नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा व अर्जाची पोच पावती घ्यावी.
  6. अशाप्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

 

Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 |

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना 2024 शासन निर्णय CLICK HERE

3 thoughts on “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |”

  1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | नोंदणी

    Reply

Leave a Comment