Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र |
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 |
नमस्कार मित्रानो, राज्य शासनामार्फत राज्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवल्या जात असतात. कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, जेष्ठ नागरिक भविष्य निर्वाह निधी अशा विविध क्षेत्रातील घटकांचा समावेश या योजनांमध्ये केलेला असतो.
प्रत्येक घटकातील नागरिकांच्या गरजा व समस्या ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य करणाच्या उद्देशाने या योजना राबवल्या जात असतात. या नागरिकांना आपले जीवन जगताना हाल अपेष्ट्या सहन कराव्या लागू नयेत, हा त्यामागील उद्देश असतो.
त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना आपल्या मुला मुलींचे लग्नाची समस्या जाणवू नये किंवा त्यामुळे त्याला कर्ज काढावे लागू नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एका नावीन्यपूर्ण योजनेची सुरुवात केली. ती योजना म्हणजे ” शुभमंगल सामूहिक विवाह योजना “ होय.
या योजनेच्या माध्यमातून सरकार गोरगरीब, अनुसूचित जाती – जमाती, दारिद्र्य रेषेखालील नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यामधील जाती – जमाती तसेच शेतकरी वर्ग यांच्या मुलींच्या लग्नासाठी मंगळसूत्र व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रतिजोडप्यामागे दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच या सामुहिक विवाहाचे आयोजन करणाऱ्या संस्थेसाठी जोडप्याने दर दोन हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिले जाते.
ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील पालकांना आपल्या मुली बोज वाटू नये म्हणून व तसेच त्यांच्या लग्नाच्या चिंतेने मुलींना समाजात कमी लेखले जाऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक विवाह योजनेचे आयोजन करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याचे कार्य करते.
शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे समाजात मुलगी जन्माला येण्या अगोदरच तिला संपवण्याचा निर्णय घेणाऱ्या लोकांच्या विचारांना मुळासकट खोडून टाकण्यास मदत होणार आहे.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, महाराष्ट्र व केंद्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील विविध योजनांची माहिती आपण रोजच घेत असतो. त्या योजनांच्या माध्यमातून समाजातील नागरिकांचा सामाजिक व अर्थीक विकास घडवून आणण्याचे काम या योजना करीत असतात. त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात जे कोणी आर्थिकदृष्ट्या मागास व दुर्बल शेतकरी आहेत. ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करावयाचे आहे. त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमच्या हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही विनंती.
योजनेचे नाव | सामुहिक शुभ मंगल विवाह योजना |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहय्य करणे |
लाभार्थी | शेतकरी व शेतमजुरांच्या मुली |
लाभ | 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे हि वाचा –
कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |
जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |
Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |
SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक विवाह योजनेची उद्दिष्ट्ये |
- राज्यात आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल शेतकरी व शेतात काम करणारे शेतमजूर, यांच्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या भार पडू नये, या उद्देशाने शासनाकडून शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच सावकाराकडून कर्जही काढावे लागणार नाही, हा या योजनेमधील महत्त्वाचा हेतू आहे.
- या योजनेमुळे ग्रामीण भागातील समाजात मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या जीवनाची सामाजिक व आर्थिक घडी या योजनेमुळे विस्कटणार नाही.
- शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्राप्त झाल्यामुळे राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेतील आर्थिक साह्यामुळे शेतकरी कोणाच्याही दबाव खाली जाऊन आपल्या मुलीचा विवाह करणार नाही.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक विवाह योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत शेतकऱ्यांच्या तसेच शेतमजुरांच्या मुलीच्या विवाह साठी शुभमंगल विवाह योजना राबविण्यात येते.
- या योजनेची संपूर्ण जिल्हा नियोजन विकास समिती मार्फत करण्यात येते.
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत विवाह करण्यासाठी मुलीचे वय 18 असणे आवश्यक आहे, त्यामुळे बालविवाह प्रतिबंध होणार आहे.
- जर एखादे जोडपे सामुहिक विवाह योजनें अंतर्गत विवाह न करता विवाह नोंदणी कार्यालयात जावून करत असेल, तर त्यांना त्या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत दिलेली जाणारी लाभाची राशीने या जोडपे यांच्या बँक खात्याची डीबीटी मार्फत जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिल्याने कोणत्याही शेतकऱ्याला, शेतमजुराला कोणाच्याही दाबावाला बळी न पडत आपल्या मुलीचा विवाह करता येणार आहे.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजने अंतर्गत दिले जाणारे
महाराष्ट्र राज्यातील सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या तसेच शेत मजुरनच्या मुलीस, वधूस दहा हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात येते तसेच या विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस प्रतिजोडपे दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेचे लाभार्थी |
राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील शेतकरी तसेच शेतमजुरांच्या मुली या सामुहिक शुभ मंगल विवाह योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेचे फायदे |
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाह साठी मंगळसूत्र व इतर वस्तू खरेदीसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येते.
- या विवाह योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम वधूच्या आईच्या नावाने देण्यात येते, परंतु ते जर नसतील तर तिच्या वडिलांच्या नावाने देण्यात येते, परंतु जर दोघेही नसतील, तर मुलीच्या नावाने ती रक्कम देण्यात येते.
- या योजनेमुळे शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
- शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास होवून ते आत्मनिर्भर बनतील.
- तसेच लग्नातील देवाण-घेवाण करण्यासाठी गरीब कुटुंबातील शेतकरी व शेतमजुरांना आपल्या मुलीच्या लग्नासाठी कोणाकडून कर्ज काढावे लागणार नाही.
- या योजनेमुळे शेतकरी स्वावलंबी बनतील.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेची पात्रता |
शुभमंगल विवाह योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेसाठी आटी व नियम |
- शुभमंगल विवाह योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच दिला जाईल.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील मुलींना दिला जाणार नाही.
- शुभमंगल विवाह योजनेचे लाभ घेणारी मुलगी शेतकरी, शेतमजूर गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत विवाह करणारे वधूचे वय 18 व वरचे वय 21 असणे गरजेचे आहे.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असू नये.
- या योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारस रहिवासी दाखला व जन्माचा दाखला अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत विधवा किंवा घटस्फोटीत महिलांना त्यांचा पुनर्विवाह करण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
- या योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करणाऱ्या संस्था महाराष्ट्र शासन महा शासनाकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
- या स्वयंसेवी संस्थेस वर्षातून दोन वेळा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करता येते, त्यापेक्षा जास्त विवाह सोहळ्यास अनुदान दिले जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी एक महिना अगोदर महिला व बालविकास विभागाकडे कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे, तसे न केल्यास या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- लग्नानंतर या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेतलेल्या जोडप्यांना लग्नाची व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच प्रमाणपत्र सादर सादर करणे बंधनकारक आहे.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- या योजनेचा अर्ज
- वधू व वरचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पनाचा दाखला ( वधूच्या वडिलांचा )
- रहिवाशी दाखला
- पालकांचे बँक पासबुक
- पालक शेतकरी असल्याचा पुरावा
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- लग्नाचा दाखला
- बाल विवाह प्रतिबंधक व हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग न केल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजने अंतर्गत अर्ज रद्ध होण्याची कारणे |
- सामूहिक विवाह सोहळ योजनेसाठी अर्ज करणारे अर्जदार वधू किंवा वर हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द होतो.
- विवाह योजनेसाठी अर्ज करणाऱ्या वधूचे वय 18 व वराचे वय 21 पूर्ण नसल्यास या योजनेअंतर्गत अर्ज रद्द केला जातो.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार वधूचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील नसल्यास या योजनेतून अर्ज रद्द होतं.
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या वधूच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | सामुहिक शुभ मंगल विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत |
- प्रथम आपणाला आपल्या क्षेत्रातील किंवा जवळील महिला व बाल विकास विभागात जाऊन सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- नंतर त्यात जर विचारलेली सर्व माहिती अचूक भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज कार्यालयातील विभागीय अधिकाऱ्यांकडे जमा करावा.
- स्वंयसेवी संस्थेने आयोजित केलेल्या या विवाह सोहळ्याच्या किमान एक महिना अगोदर आपणाला महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो.
Samuhik Vivah Yojana Marathi 2024 |
सामुहिक शुभ मंगल विवाह योजना form click here
1 thought on “शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |”