विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजना 2024 |

Vidhwa Penshan Yojana Maharashtra
Vidhwa Penshan Yojana Marathi
Vidhva Penshan Yojana Onlain Form
Vidhwa Penshan Yojana Maharashtra 2024
Vidhwa Penshan Yojana Maharashtra

Vidhwa Pension Yojana Maharashtra |

नमस्कार मित्रानो,  महाराष्ट्र शासनाकडून राज्यात वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होत असते. या योजना जनतेसाठी कल्याणकारी असतात. राज्यातील प्रत्येक घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामध्ये महिला, बालके, विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि बांधकाम कामगार, अनुसूचित जाती जमाती, कष्टकरी मागासवर्गीय सर्वांचा समावेश केलेला असतो.

प्रत्येक घटकाला अनुदान स्वरूप आर्थिक सहाय्य करून, त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून होत असतो. त्यांचे आर्थिक स्थिती सुधारावी व त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने योजना सुरू केलेले आहेत. तसेच राज्यातील विधवा महिलांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये ,या उद्देशाने विधवा पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.
राज्यात शासनाकडून आर्थिक दृष्ट्या निराधार असलेल्या सर्व विधवा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने एक नावीन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचे नाव ” महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना “ होय. या योजनेच्या माध्यमातून शासनामार्फत राज्यातील विधवा महिलांना दरमहा 900 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
राज्यातील अनेक विधवा महिला आहेत. त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन हलकीचे सुरू झाले आहे. कारण त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतेच स्थायी साधन उपलब्ध नसल्याने, त्यांचे परिस्थिती अत्यंत बिकट झालेले आहे. या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने त्यांच्या मदतीसाठी विधवा पेन्शन योजनेची सुरुवात केली.
या योजनेमुळे महिलांना आर्थिक संकटाचा सामना कराव लागु नये. तसेच वाढत्या वयात त्यांचे जीवन जगणे अधिक सोयीस्कर व्हावे. यासाठी ही योजना कार्यान्वित केले. विधवा पेन्शन योजनेसाठी शासनामार्फत 23 लाखाचे बजेट प्रसिद्ध जाहीर करण्यात आले आहे.
विधवा पेन्शन योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्यातून या महिला स्वतःच्या उदरनिर्वाह करतील, तसेच मुलांचे पालन पोषण व शिक्षण करू शकतील. त्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
महाराष्ट्र शासनामार्फत महिलांना दिला जाणाऱ्या पेन्शन योजना अंतर्गत 600/- रुपये दिले जातात. पण एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबातील महिलेला दरमहा 900/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना महिलांना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

Vidhwa Pension Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत महिलांसाठी सुरू झालेल्या विविध योजना आतापर्यंत आपण पहिल्या आहेत. महिला बचत गट योजना, महिला सन्मान बचत योजना त्याचप्रमाणे आज आपण एक विधवा महिलांसाठी सुरू केलेले योजनेची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे विधवा पेन्शन योजना होय. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात ज्या कोणी विधवा महिला असतील, त्यांनाही या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नाव विधवा पेन्शन योजना महारष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
विभागमहिला व बाल कल्याण विकास विभाग
लाभार्थीराज्यातील विधवा महिला
लाभ900/- रुपये प्रतीमहा
उद्देशविधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन / ऑनलाईन

 

हे पण वाचा –

                                          डीझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु | Good News | Diesel Pump Subsidy Yojana |

                         आम आदमी बीमा योजना 2024 | Good News | Aam Aadmi Bima Yojana Maharashtra | पात्रता, नोंदणी व फायदे |

                               शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |

                               रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 | Rojgar Sangam Yojana Maharashtra | Good News| ऑनलाईन नोंदणी सुरु |

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजनेचे उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
  • या योजनेमुळे राज्यातील महिला पतीच्या मृत्यूनंतर कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.
  • या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या दैनंदिन उदरनिर्वाह चालवण्यास मदत होणार आहे.
  • योजनेमुळे महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनतील.
  • विधवा पेन्शन योजना च्या आर्थिक सह्यामुळे महिला स्वतःचे तसेच आपल्या मुलांचे पालन पोषण करण्यास समर्थ होतील.
  • राज्यातील महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने महिला विधवा पेन्शन योजनेची सुरुवात केली.

 

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत राज्यातील विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेअंतर्गत विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी 900 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • विधवा पेन्शन योजनेची अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
  • अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने महिलांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.
  • विधवा पेंशन योजनेमुळे महिलांच्या पैशाची तसेच वेळेची बचत होणार आहे.
  • या योजनेमुळे महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होणार आहे.

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र साठी पात्रता |

  1. अर्जदार विधवा महिला हि महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
  2. विधवा पेन्शन योजनेसाठी अर्जदार महिलेचे वय हे 65 वर्षापेक्षा कमी असावे.
  3. विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे बँक खाते आधारशी संलग्न असावे.
  4. राज्यातील दारिद्र रेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील.

 

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्रासाठीचे लाभार्थी व दिला जाणारा लाभ |

  1. विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला पतीच्या मृत्यू नंतर एकाकी जीवन जगात आहेत, त्या सर्व विधवा महिला लाभार्थी आहेत.
  2. विधवा पेन्शन योजने अंतर्गत राज्यातील विधवा महिलांना प्रतिमाह 900/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजनेचे फायदे |

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या निराधार विधवा महिलांना या पेन्शन योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  • या पेन्शन योजनेच्या माध्यमातून ज्या विधवा महिलाना एकापेक्षा जास्त मुले असतील,  तर प्रतिमाह 900/- रुपये पेन्शन म्हणून दिली जातील.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन ही एखाद्या महिलेला मुलगी असेल व तिचे लग्न झाले तरीही त्या महिलेची पेन्शन कायम राहील.
  • विधवा पेन्शन योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थी महिन्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
  • विधवा पेन्शन योजनेच्या आर्थिक सहाय्यातून विधवा महिला स्वताचे व कुटुंबाचे पालन पोषण करू शकतील.

 

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शनसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. जन्माचा दाखला
  6. जातीचे प्रमाणपत्र
  7. पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
  8. बँक पासबुक
  9. मोबाईल नंबर
  10. पासपोर्ट साईज फोटो

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा पेन्शन योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची करणे |

  • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरली असेल, तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार महिला ही जर शासकीय नोकरीत असेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न तर जर 21 हजारांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार महिलेचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार महिलाही राज्याबाहेरील रहिवाशी असल्यास, त्या महिलेचा अर्ज या योजनेतून रद्द केला जातो.
  • विधवा महिला ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द केला जातो.

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • Home Page Open झाल्यावर Form वर Click केल्यानंतर फॉर्म ची यादी दिसेल.
  • त्यामधील संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य आणि अचूक भरावी लागेल.
  • त्यानंतर तो भरलेला अर्ज कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडून तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशाप्रकारे तुमची विधवा पेंशन योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Vidhwa Pension Yojana Maharashtra | विधवा महिला पेन्शन योजना महाराष्ट्र |

विधवा महिला पेन्शन योजना महाराष्ट्र  Website Click Here 

1 thought on “विधवा पेन्शन योजना 2024 | Good News | Vidhwa Pension Yojana Maharashtra | ऑनलाईन अर्ज सुरु |”

Leave a Comment