रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 | Rojgar Sangam Yojana Maharashtra | Good News| ऑनलाईन नोंदणी सुरु |

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | रोजगार संगम योजना महाराष्ट्र |

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024
Berojgari Bhatta Yojana
Rojgar sangam Yojana  maharashtra Marathi
Mukhyamantri Yojana
Maha Govt scheme
Mahaswayam scheme

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये अनुदान योजना, पेन्शन योजना, विविध भत्ता योजना अशा योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्यात येते. त्यातून त्या योजनाची अंमलबजावणी होत असते.
शासनाकडून समाजातील प्रत्येक जातीतील, अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, बांधकाम कामगार, शेतकरी या सर्व वर्गात साठी योजनांची कार्यवाही होत असते. त्याचप्रमाणे सर्व जाती धर्मांमध्ये असणारया सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही शासनाकडून एक नाविन्यपूर्ण योजना राबवली जात आहे.  ती योजना म्हणजे ” रोजगार संगम योजना महाराष्ट्र “ होय.
आपल्या राज्यात शिक्षणाच्या सुविधा वाढल्यामुळे सर्व जाती-धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ते सुशिक्षित झाले आहेत, पण त्या प्रमाणात राज्यात नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे राज्यात बेरोजगारीचे, बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे.
या बेरोजगारीचा परिणाम म्हणून तरुणांमध्ये मानसिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यातून आत्महत्यांचे प्रमाण हे वाढले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाकडून रोजगार संगम योजनेची सुरुवात करण्यात आली. रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळेपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येते. तसेच नोकरी मिळवण्यासाठी सहाय्य केले जाते. या योजनेमुळे तरुणांना नोकरी मिळण्यात यश येते.
या योजनेअंतर्गत तरुणांना पाच हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य केले जाते. त्यातून ते नोकरी मिळेपर्यंत स्वतःचा खर्च, कुटुंबाचे पालन पोषण करू शकतील. रोजगार संगम योजना हि एक महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण तसेच ऑनलाइन प्रशिक्षण तासिकेचे आयोजन, मोफत मार्गदर्शन केले जाते.

या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध व्हावी, यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. तेथे प्राप्त कौशल्यानुसार  तरुणांची निवड करतात. ज्यामुळे तरुणांना नोकरी उपलब्ध होण्यास मदत होते.

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतलीच आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या रोजगार संगम योजनेची माहिती आज आपण घेणारआहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील, त्यांनाही या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त तरुणांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नाव रोजगार संगम योजना महाराष्ट्र 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
विभागकौशल्य विकास विभाग
उद्देशसुशिक्षित बेरोजगार  तरुणांना आर्थिक सहाय्य करणे
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण
लाभ5000/-चे आर्थिक सहाय्य
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

 

हे देखील वाचा –

             गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | Gai Gotha Anudan Yojana 2024 | Good News | ऑनलाईन अर्ज सुरु |

           Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |

           Rojgar Hami Yojana maharashtra 2024 | Good News | रोजगार हमी योजना माहिती मराठी |ऑनलाईन नोंदणी |

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | रोजगार संगम योजनेचे उद्धेश |

  •  महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या चांगली संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार संगम योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य देण्यात येते त्यामुळे ते स्वतःचा खर्च व कुटुंबाचे पालन पोषण करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य हे  बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेपर्यंतच दिले जाते.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचा सामाजिक व आर्थिक विकास केला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे मानसिक स्थैर्य अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो.

 

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | रोजगार संगम योजनेची वैशिष्ट्ये |

  •  रोजगार संगम योजना ही महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार द्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रतिमाह  5000/- रुपयांची आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  •  या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
  •  त्यामुळे अर्जदाराच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे.
  • रोजगार संगम योजनेसाठी अर्जदार हा ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.
  • रोजगार संगम योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य हे थेट लाभार्थ्याच्या खात बँक खात्यात जमा केली जाते.

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | रोजगार संगम योजनेची पात्रता |

  1. रोजगार संगम योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. महाराष्ट्र राज्य बाहेरील रहिवाशांन रोजगार संगम योजनेत नाव नोंदणी करता येणार नाही.
  3. रोजगार संगम योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी अर्जदार हा कमीत कमी बारावी उत्तीर्ण असावा.
  4. या आर्जदाराने पदवी किंवा एखाद्या पदवीउत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  5. कोणती एखादी व्यवसायिक नोकरी युक्त पदवी / अभ्यासक्रम पूर्ण केलेली असावा.
  6. या योजनेतील अर्जदाराचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असावे.
  7. रोजगार संगम योजनेतील अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावे.
  8. अर्जदाराला इतर कोणत्याही केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात नोंदणी करता येणार नाही.

 

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | रोजगार संगम योजनेचे फायदे |

  • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून कामाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
  • या योजनेतील पात्र उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल तसेच प्लेसमेंटच्या सुविधा पुरवल्या जातील.
  • या योजनेमुळे बेरोजगार तरुण स्वतंत्र व स्वयंपूर्ण होतील.
  • रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना 5000/- रुपयांचे आर्थिक सहाय्यक केले जाते.
  • या योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण घेतल्याने हे सुशिक्षित बेरोजगार तरुण सहजपणे नोकरी मिळवू शकतील.
  • रोजगार संगम योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांचा आर्थिक व सामाजिक विकास केला जाणार आहे.
  • रोजगार संगम योजनेमुळे राज्यातील तरुण आत्मनिर्भर बनतील.

 

रोजगार संगम योजना महाराष्ट्रसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. रहिवासी दाखला
  5. EWS प्रमाणपत्र ( त्याच आर्थिक वर्षाचे )
  6. शैक्षणिक डॉक्युमेंट
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. ई-मेल आयडी
  9. मोबाईल नंबर
  10. बँक पासबुक झेरॉक्स

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 | अर्ज रद्द होण्याची करणे |

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेत नोंदणी केलेल्या अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त असल्यास त्या अर्जदाराचे अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदारने अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार हा महाराष्ट्र केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही प्रयोजित बेरोजगारी भत्याचा लाभ घेत असल्यास त्या अर्जदाराचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार हा व्यवसायिक पदवीपूर्ण अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेला असल्यास त्या व्यक्तीचा अर्ज रद्द केला जातो.

 

Rojgar Sangam Yojana | रोजगार संगम योजनेत ( अर्ज ) रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया |

  •  प्रथम आपणाला https://rojgar.mahaswayam.gov.in/  या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर एक Page Open होईल, त्यातील नोंदणी या पर्यायावर Click करावे.
  • त्यानंतर अर्ज Open होईल, त्यात सर्व अचूक माहिती भरावी व पुढील पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक OTP येईल.
  • तो OTP आपल्याला अर्जात भरायचा आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा रिचेक करायचा आहे.
  • त्यानंतर submit  वर click  करावे.
  • अशाप्रकारे रोजगार संगम योजनेत ऑनलाइन पद्धतीने तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

 

Rojgar Sangam Yojana Maharashtra |रोजगार संगम योजनेतील अर्जाची स्थिती पाहण्याची पध्दत |

  • आपण भरलेल्या रोजगार संगम योजनेतील अर्जाची स्थिती पाहण्यासाठी आपणाला महास्वयम डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यामध्ये युजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपणाला लॉगिन करावे लागेल.
  • त्यानंतर चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपल्या अर्जाचे तपशील आपल्याला स्क्रीनवर दिसतील.

 

Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 |

रोजगार संगम योजना महाराष्ट्र अधिकृत website Click Here

रोजगार संगम योजना महाराष्ट्र रजिस्ट्रेशन form Click Here

 

1 thought on “रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 | Rojgar Sangam Yojana Maharashtra | Good News| ऑनलाईन नोंदणी सुरु |”

Leave a Comment