Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र |
Kishori Shakti Yojana Maharashtra]
नमस्कार मित्रानो , महाराष्ट्र शासन जनतेसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवीत असते. त्यामध्ये लहान बाळापासून ते जेष्ठ नागरिकापर्यंत सर्वांचा समावेश असतो. या सगळ्यांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांचे जीवनमान उंचावणे हाच त्या मागील हेतू आहे. त्यामुळे शासनाने आता किशोरवयीन मुली व बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ती म्हणजे किशोरी शक्ती योजना हि होय.
या किशोरी शक्ती योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास व बालिका मंडळ विभाग यांच्या मार्फत 15 मे 2004 रोजी करण्यात आली. हि योजना राज्यातील मुलींचे भविष्य लक्षात घेऊन, ते उज्जवल कसे करता येईल. या हेतूने महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजना सुरु केली. या योजने अंतर्गत किशोरवयीन मुली निरोगी राह्व्यात ,यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. या योजने मार्फत राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये किशोरवयीन मुलींना IFA व Deworming ( टॅबलेट ) पुरवण्यात आल्या आहेत. या गोळ्या मुलींना ६ महिन्यातून एकदा देण्यात याव्यत . असा महाराष्ट्र सरकारचा GR आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र रेषेखालील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील किशोरवयीन मुलींना अंगणवाडी सेविकाकडून पौष्टिक अन्न दिले जाते. त्यामध्ये कडधान्ये ,भात ,डाळ सुकडी या अन्नपदार्थांचा समावेश असतो. या योजने अंतर्गत किशोरवयीन मुलींना निरोगी जीवनासाठीच्या विविध सुविधा शासनाकडून पुरविल्या जातात.
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
चला तर मित्रानो, महाराष्ट्र शासना कडून जनकल्याणासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण आशा योजना येत असतात. त्या योजनांची माहिती आपण घेत असतो. त्यमुळे राज्य शासनाच्या एका नवीन योजनेची माहिती आपण घेणार आहोत. ती म्हणजे किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र हि होई. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील जास्तीत जास्त मुलींना हा लेख शेअर करा. त्यामुळे त्यानाही या योजनेचा लाभ घेता येईल.
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ती योजना |
इतर योजना पहा – महिला बचत गट शासकीय योजना 2024 | Good News | Mahila Bachat Gat Loan Maharashtra |
Shravan Bal Rajya Nivruti Vetan Anudan Yojana 2024 | Good News | श्रावण बाळ निराधार अनुदान योजना |
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana 2024 | Good News | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र |
योजनेचे नाव | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे लाभार्थी | सर्व किशोरवयीन मुली |
योजनेची सुरुवात | 15 मे 2005 |
योजनेचे उद्दिष्टे | किशोरवयीन मुलींना निरोगी ठेवणे व आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे |
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट |
- किशोरी शक्ति योजना महाराष्ट्र अंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन पौष्टिक अन्न प्रदान करणे आणि त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्याचा मुख्य उद्देश आहे.
- किशोरवयीन मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्याना घरगुती व्यवसाया कसे निर्माण करता येतील या दृष्टीने सक्षम बनवण्याचा उद्देश या योजनेमार्फत करण्यात येतो.
- तसेच बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवून , स्वताचा बालविवाह रोखण्यास सक्षम करणे.
- या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत व परिसर स्वच्छता इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जाते.
- किशोरवयीन मुलींची निर्णयक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण देणे.
- या योजनेतून किशोरवयीन मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास साधला जातो.
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ती योजनेचे लाभ |
- या योजनेमुळे मुली घरकाम व व्यावसायिक ज्ञान प्राप्त केल्याने सक्षम होतात.
- योजनेअंतर्गत दरमहा किशोरवयीन मुलींचे वजन करून हिमोग्लोबिनची मात्र तपासली जाते.
- या योजनेत किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून अंगणवाडी मार्फत पौष्टिक अन्न दिले जाते.
- या योजनेत मुलींना रांगोळी काढणे,मेहंदी काढणे , शिलाई काम करणे ,विणकाम करणे यांचे प्रशिक्षण दिले जाते .
- योजनेअंतर्गत मुलींना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी, गर्भावस्था, गैरसमज, गर्भनिरोधन, बालविवाहाचे परिणाम, यासारखे आरोग्यविषयक विषयाचे शिक्षण दिले जाते.
- आपत्कालीन वेळी कोणता हेल्पलाइन नंबर वापरायचा त्याबद्दलचे शिक्षण दिले जाते.
- किशोरवयीन मुलींना स्त्रियांसाठी कायदे अधिकार याबाबतचे संपूर्ण ज्ञान दिले जाते.
- 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना अंगणवाडी तर्फे लोहयुक्त गोळ्या व जंतनाशक गोळ्या देण्यात येतात.
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | लाभार्थी मुलींची निवड |
- किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 20 किशोरवयीन मुलींची 6 महिन्यांकरिता निवड करण्यात येते.
- त्यापैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची निवड दारिद्र रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मधून केली जाते.
- या योजनेमध्ये शाळा सोडलेल्या मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते.
- यातील 3 मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवून त्यांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाते.
- या मुलींची निवड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. [Kishori Shakti Yojana Maharashtra]
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | नियम व अटी |
- या योजनेत फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच सहभाग दिला जाईल.
- या योजनेचा राज्याच्या बाहेरील मुलींना लाभ मिळणार नाही.
- शेतकरी मागास , गरीब, दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील मुलींना या योजनेचा फायदा घेता येईल.
- या योजनेत मुलींचे वय 11 ते 18 च्या दरम्यान असणे आवश्यक.
- या योजनेअंतर्गत मुलींच्या निवडीचा कालावधी हा फक्त 6 महिने एवढा असेल.
- अगोदर लाभ मिळवलेल्या मुलीला या योजनेचा लाभ पुन्हा घेता येणार नाही.
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | किशोरी शक्ति योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- रेशन कार्ड
- शाळेचा सोडल्याचा दाखला
- शाळेचे मार्कशीट
- जातींचे प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- शासनाने या योजनेसाठी कोणतीच ऑनलाईन सेवा उपलब्ध केली नाही ,परंतु तुम्ही शासनाचा GR येथे पाहू शकता.
- किशोरवयीन मुलींच्या पालकांना आपल्या परिसरातील अंगणवाडीला भेट द्यावी व योजनेचा अर्ज घ्यावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून रीतसर भरून कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी व सदर अर्ज अंगणवाडीत जमा करावा.
- या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड करण्यात येते.
- तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक घरी जाऊन सर्वे केला जातो त्यातून लाभार्थी किशोरवयीन मुलींची निवड केली जाते. [Kishori Shakti Yojana Maharashtra]