श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजना |
Sanjay Gandhi niradhar pension Yojana
Shravan Bal pension Yojana
Government scheme for Maharashtra
Senior citizen scheme
Rajya pension Yojana
नमस्कार, Sanjay Gandhi niradhar pension Yojana महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असतात. त्यामुळे काही योजना या राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा ठराविक पेन्शन रक्कम देण्यासाठी राबवल्या जातात. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून निराधार तसेच 65 वर्षावरील व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेअंतर्गत तुम्ही जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला असेल, तर त्याअंतर्गत एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहीण योजनेसाठी 3 कोटीच्या खर्चाला मान्यता | सरकारचा मोठा निर्णय | GR आला |
नवीन अर्ज प्रक्रिया सुरु |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक नागरिकांनी अर्ज केलेला आहे. मात्र अद्याप अनेकांनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रे जमा केलेली नाहीयेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची संधी नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे दिलेली मुतती जमा केली नाहीत. त्यांच्यासाठी अजून एक संधी मिळालेली आहे.
Sanjay Gandhi niradhar pension Yojana
आतापर्यंत ज्या नागरिकांनी आपली कागदपत्रे पूर्णपणे जमा केलेली आहेत. त्यांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ मिळणार आहे. पण ज्या लाभार्थ्यांनी आपली आवश्यक कागदपत्रे जमा केलेले नाहीत. त्यांना लाभ मिळवण्यात अडचण येऊ शकतात. ज्या नागरिकांनी जानेवारी महिन्यापर्यंत आपली कागदपत्रे जमा केली नाहीत, त्यांना नव्याने अर्ज दाखल करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राजपत्र ( गॅझेट ) नोंदणी करण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज | आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क जाणून घ्या, संपूर्ण माहिती |
नागरिकांना DBT मार्फत लाभ हस्तांतरण |
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटी ( डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ) मिळण्याकरता https://sas.mahait.org/ हि वेबसाईट विकसित केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 15 लाख 97 हजार 116 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 29 लाख 65 हजार 015 असे एकूण 45 लाख 59 हजार 131 इतके लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येते.
5 वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार |
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्याकडून दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत होता. मात्र 50 वर्षांवरील जेष्ठ, वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशा लाभार्थ्यांना पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. Sanjay Gandhi niradhar pension Yojana