पी एम किसान योजना |
PM kisan Yojana
नमस्कार, PM kisan Yojana पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. संसदीय समितीने सरकारला पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वाढवण्याचे शिफारस केलेली आहे. समितीने केलेल्या शिफारशीत योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाणारी वार्षिक 6000 हजार रुपयांची रक्कम वाढवून 12000 पर्यंत करण्याची सूचना केली आहे. कृषी मंत्रालयाचे संलग्न समितीने अध्यक्ष चरणजीत सिंग चन्नी यांनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीने आपल्या शिफारशी सरकारला सादर केले आहेत.
मंगळवारी 17 डिसेंबर 2024 रोजी चिरंजीत सिंह चन्नी यांनी लोकसभेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय बाबत लोकसभेच्या अनुदानाची पहिली मागणी मांडली. या अहवालात कृषी कल्याण मंत्रालयाशी संबंधित संस्थेच्या स्थायी समितीने पीएम किसान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारे निधी मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची वार्षिक मर्यादा 6 हजार रुपयांवरून 12 हजार रुपये करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.
” आनंदाची बातमी ” पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता या तारखेला होणार जमा |
२०२५ च्या अर्थसंकल्पात मिळणार ” मोठे गिफ्ट ” |
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी २०२५ -२०२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारशीच्या आधारे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादित वाढ करण्याची शक्यता अर्थसंकल्पात जाहीर केली जाऊ शकते.
दरम्यान पीएम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्याची ही पहिलीच वेळ नाही, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनीही अर्थमंत्र्यासमोर अर्थ संकल्प पूर्वी बैठकीत ही मागणी केली आहे. PM kisan Yojana
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू साठी मोठी भरती | 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी| लगेच करा अर्ज |
शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्त्याची रक्कम जमा |
पी एम किसान योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. आत्तापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 3.45 ला कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ होईल, अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही.
परंतु , देशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर लवकरच केंद्र शासनाकडून पी एम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दिल्या जाणार्या रकमेत वाढ होण्याची जास्त शक्यता आहे. तशा हालचाली सध्या सुरु आहेत. लवकरच या बाबत अपडेट मिळेल. PM kisan Yojana