पीएम आवास योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ | PM Awas Yojana Subsidy | राज्याच्या अर्थसंकल्पनात करण्यात आली मोठी घोषणा |

                                  पी एम आवास योजना |

Pm awas Yojana subsidy
Pm aawas Yojana rural
Pm aawas Yojana
Awas Yojana Maharashtra government
PM aawas scheme

Pm awas Yojana subsidy
Pm aawas Yojana rural
Pm aawas Yojana
Awas Yojana Maharashtra government
PM aawas scheme

नमस्कार, Pm awas Yojana subsidy महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या 2025 – 26 अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घरकुल आणि पीएम आवास योजने संदर्भात अजित पवार यांनी घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारकडून पीएम आवास योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपये वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चा हप्ता जमा होण्यास सुरुवात | पण मार्च चा हप्ता कधी मिळणार ? पहा तारीख काय ?

44 लाख 7000 घरे आतापर्यंत मंजूर |

सर्वसामान्यांना परवडतील असे ” सर्वांसाठी घरे ” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.राज्यात पीएम आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत योजना, तसेच रमाई आवास, शबरी आवास, भारतीय अटल आवास, कामगार बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत आतापर्यंत 44 लाख 7 हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत.

पीएम आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ |

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा अंतर्गत 2024 – 25 साठी 20 लाख घरांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी दिली असून, 14 लाख 71 चा लाभार्थ्यांना पहिला हप्त्यासाठी 2200 कोटी रुपये वितरण करण्यात आले आहेत. ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांक राहील. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तसेच सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत. Pm awas Yojana subsidy

पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसर्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया सुरू | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | सविस्तर माहिती |

5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट |

प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 4 लाख 42 हजार 748 घरकुल यांना मंजूर असून, त्यापैकी 2 लाख 8304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. इमारत घरकुल बांधकाम 31 डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 02 अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलाची उद्दिष्ट असून, त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती, तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेतून आत्तापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांना 500 mw पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच स्थापित केले असून, त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. Pm awas Yojana subsidy

आता गाय गोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचे मिळणार अनुदान |  अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

Leave a Comment