अर्थसंकल्पामध्ये विकासावर भर |‍ Maharashtra Budget 2025 | वीज बिल शून्य, आवास योजनेत 50 हजारांची वाढ | अर्थसंकल्पातील प्रमुख 15 मुद्दे |

Table of Contents

                                        अर्थसंकल्प 2025 |

Maharashtra budget 2025
Pm aawas Yojana
Ek ladki Yojana
Ladki bhai Yojana
Farmers scheme for government

Maharashtra budget 2025
Pm aawas Yojana
Ek ladki Yojana
Ladki bhahin Yojana
Farmers scheme for government

नमस्कार, Maharashtra budget 2025 काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सन 2025 – 26 चा अर्थसंकल्प राज्य सभेत सादर केला. या अर्थसंकल्पात राज्याच्या विकासासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दर महा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र या अर्थसंकल्पात याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीचाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाटत होती, मात्र याबाबत ही कोणती घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर…|

पीएम आवास योजनेत 50 हजार रुपयांची वाढ |

प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 02 अंतर्गत 2024 – 25 साठी 2000 घरकुलांच्या उद्दिष्ट पैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी दिली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्यासाठी 2200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधी लाभार्थ्याच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. Maharashtra budget 2025

विज बिल शून्य |

0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांच्या छतावरील ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देणे ची योजना राज्य सरकारकडून लवकर सुरू करण्यात येणार असून, या योजनेमुळे येत्या काळात सुमारे ७० टक्के वीज ग्राहकांचे बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे.

आता गाय गोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचे मिळणार अनुदान |  अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |

लाडक्या बहिणीसाठी धक्का |

लाडक्या बहिणीला 1500 हजार एवजी 2100 रुपये देणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. मात्र आता अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीच्या वाढीच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार अशी शक्यता दिसत नाही.

लाडक्या लेकींसाठी 50 कोटीचा निधी |

राज्य सरकारने लेक लाडकी या योजनेअंतर्गत 1 लाख 13 हजार विद्यार्थीला मदत देण्यात आली आहे. आता आगामी 2025 – 26 या वर्षासाठी या योजनेत 50 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्रास्तावित आहे. या अंतर्गत मुलींच्या व्यवसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. Maharashtra budget 2025

 लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये | अटी, नियम व कागदपत्रे संपूर्ण माहिती |…BEST

कुंभमेळ्यासाठी खास बजेट |

2027 मध्ये नाशिक येथे सहस्त्रकुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच नाशिक मधील रामकाली पदविकास प्रकल्प अंतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसराचा विकास करण्यासाठी एक लाख 46 कोटी 10 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटी |

लडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या दोन कोटी 53 लाख लाख महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. त्याच अनुषंगाने 2025 – 26 मध्ये या योजने करता 36 हजार कोटी रुपये प्रस्तावित निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना |

राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वस्तीगृहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? निर्णय काय झाला ? स्पष्ट बोलल्या आदिती तटकरे |

प्रत्येक तालुक्यात बाजार समिती |

अजित पवार यांनी ” एक तालुका – एक बाजार समिती ” योजना राबवणार असल्याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तिथे किमान स्वतंत्र एक पाच समिती स्थापन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी घोषणा |

या अर्थसंकल्पामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील मध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत, तसेच शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

याच बरोबर या अर्थसंकल्पात अनेक विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात विकासावर भर दिलेला दिसून येत आहे.

Leave a Comment