लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट |
Ladki bahin Yojana verification process
Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana eligibility and verification process
नमस्कार, Ladki bahin Yojana verification process महायुती सरकार ने जुलै महिन्यातील आपल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” जाहीर केली. या योजनेसाठी महिलांना दर महिन्याला 1500 हजार रुपये देण्यात येत होते. या योजने अंतर्गत तात्काळ अंमलबजावणी सुरू करत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली.
जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे दर महा दीड हजार प्रमाणे 7500 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले. या योजनेचा राज्यातील महायुती सरकारला खूप मोठा लाभ झाला. तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने मतदान केल्याने महायुती सरकारचा दणदणीत विजय झालेला आहे.
या विजयानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून शपत घेतली आणि पदभार स्वीकारला.
तुमचं आधार कार्ड हरवले आहे का ? मग या टिप्स फॉलो करा | मीळेल नवीन आधार कार्ड |
लाडकी बहीण योजना |
आता लाडकी बहीण योजना संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेत अर्ज दाखल करण्यात आले आणि त्यावर आता पडताळणी सुरू करण्यात आली आहे. याची योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी अर्ज भरताना एक हमीपत्र लिहून दिले होते.
ज्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये पेक्षा अधिक नाही, कुटुंबातील सदस्य आयकर भरत नाही, माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन नाही, कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन नाही. शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही, असे हमी पत्रात लिहून देण्यात आले होते. आता त्याच हमी पत्रांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढणार आहे. Ladki bahin Yojana verification process
महानिर्मिती विभाग अंतर्गत होणार 800 पदांची मेगा भरती | 10 वी पास उमेदवारांना संधी |
लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र पुढील प्रमाणे |
- मी घोषित करते की,
- माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
- माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही.
- मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही.
- मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 हजार पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
- माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही.
- माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य नाहीत.
- माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन नाही.
- माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून ) नोंदणीकृत नाही.
- वरील प्रमाणे घोषित करते की, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणे क्रम प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार प्रमाणीकरणानंतर, माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा प्रथम ओटीपी माहिती प्रदान करण्याची संमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ” माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजना जिल्हा प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य व केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार एक केवायसी वर्णन पुरवण्या सहमती देत आहे.
अर्जदाराची सही