लाडक्या बहींनीसाठी खुशखबर | Ladki Bahin Yojana New Update | महिला दिनानिमित्त मिळणार शासनाकडून गिफ्ट | काय असणार ते ?

                         लाडक्या बहींनीसाठी खुशखबर | 

Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment
Ladki Bahin Yojana installment date

Ladki Bahin Yojana new update
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment
Ladki Bahin Yojana installment date

नमस्कार, Ladki Bahin Yojana new update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी पात्र महिलांना कधी मिळणार ? असा प्रश्न राज्यातील अनेक महिलांना सतावत होतात. अशातच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी सह मार्च महिन्याच्या हप्त्या बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी सह मार्चचाही हप्त्या`बद्दल खुद्द राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. त्या काय म्हणाल्या त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहुयात.

महिला दिनानिमित्त मिळणार गिफ्ट |

लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे राज्यभरातील महिलांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. लाभार्थी पात्र महिलांना महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे. या संदर्भातील माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्यसरकारच्या 17 लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी |  महागाई भत्त्यात झाली वाढ | पाहा निर्णय |

आदिती तटकरे म्हणाल्या की, येत्या 08 मार्च रोजी महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे. याबाबत 5 ते 6 मार्चपासून प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आदिती तटकरे यांनी माहिती दिली. त्याचबरोबर लाडकी बहिणी योजना ही सक्षमरित्या सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

लडकी बहीण योजना बंद होणार ?

राज्यातील लाडकी बहिणी योजना सरकारी तिजोरीवर भार वाढल्याने बंद होणार ? असल्याची चर्चा रंगली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर एक पत्रकार परिषद पार पडली. Ladki Bahin Yojana new update

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या योजनांवर च्या खर्चामुळे सरकारी तिजोरीवरचा भार वाढलेला आहे. त्यामुळे सरकारने काही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सणासुदीला राज्यातील पात्र कुटुंबांना तेल, साखर, डाळ या  वस्तू शंभर रुपयांमध्ये दिल्या जात होत्या, मात्र आता ही योजना बंद करण्यात आली. त्यामुळे हा लाभ मिळणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?  वाचा सविस्तर |

मुख्यमंत्री म्हणाले, ” लाडकी बहीण योजना बंद होणार नाही “

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 हजार रुपये दिले जातात. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढला आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांगितले की, वेगवेगळ्या योजनांचा भार अर्थसंकल्पावर असला, तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही महत्त्वाचे योजना बंद करणार नाही. मात्र नियमांच्या बाहेर आहेत, त्यांना आम्ही वगळणार आहोत.

2100 रुपये कधी मिळणार ?

राज्यातील महिलांना दरमहा 1500 हजार रुपये दिले जातात, मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने ही रक्कम वाढवून 2100 रुपये देणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे अर्थसंकल्पाबाबत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याची तरतूद असणार आहे. याला मंजुरी मिळाल्यास एप्रिल पासून लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana new update

दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी | दुध दारात झाली पुन्हा एकदा वाढ | पहा काय आहेत, सध्याचे नवीन दुध दर |

Leave a Comment