लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana installment
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana 8th installment
Ladki Bahin Yojana news
Ladki Bahin Yojana update
नमस्कार, Ladki Bahin Yojana installment राज्यातील लाभार्थी पात्र लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च महिन्याचा हप्ता वितरण करण्याकरता शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
या नवीन घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना एका सोबतच 3000 रुपये वितरित केलेले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
राज्य शासनाकडून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी व आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये एवढा निधी दिला जातो. ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आली, तेव्हापासून या योजनेमध्ये बऱ्याच अपात्र असणाऱ्या, तसेच निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील अर्ज सादर केले या अर्जाची शासनाकडून तपासणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये राज्यातील जवळपास नऊ लाख पेक्षा अधिक महिलांचे अर्ज या योजनेमधून बाद करण्यात आले आहेत.
लाडक्या बहींनीसाठी खुशखबर | महिला दिनानिमित्त मिळणार शासनाकडून गिफ्ट | काय असणार ते ?
फेब्रुवारी चा हप्ता वितरणास उशीर कारण ?
राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात महिन्याच्या हप्त्यांचे व्यवस्थित वितरण झालेले आहे. परंतु महिला आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणास शासनाकडून उशीर झालेला आहे. कारण राज्यातील महिलांचे अर्ज तपासणी दरम्यान तपासणी प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागल्याने, या महिन्याचा हप्ता वितरणस देखील विलंब झाला आहे.आता नवीन शासन निर्णयानुसार पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च दोन महिन्याचा निधी एकत्रित वितरित केला जाणार आहे. म्हणजेच राज्यातील महिलांना एक सोबत 3 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे.
निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळले |
महाराष्ट्र शासनाकडून योजनेच्या सर्व नियम व अटीच्या सहाय्याने अपात्र असणाऱ्या सर्व महिलांना या योजनेमधून वगळण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा निधी एकत्रित वितरीत केला जाणार आहे. ज्या महिलांची तपासणी दरम्यान अर्ज रद्द करण्यात आले आहेत. अशा महिलांना फेब्रुवारी, मार्च या महिन्याचा हप्ता वितरीत केला जाणार नाही. पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेचा हप्ता दिला जाईल. Ladki Bahin Yojana installment
राज्यसरकारच्या 17 लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी | महागाई भत्त्यात झाली वाढ | पाहा निर्णय |
” या ” तारखेला जमा होणार 3000 रुपये |
महिला ज्या गोष्टीची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत, ते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 6 मार्च 2025 पासून महिलांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील पात्र असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. ८ मार्चपर्यंत, महिला दिनापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे तीन दिवस आणखी महिलांना बँक खात्यात पैसे जमा होण्याची वाट पाहावी लागणार आहे.