लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? Ladki Bahin Yojana 2100 Rupay | निर्णय काय झाला ? स्पष्ट बोलल्या आदिती तटकरे |

                       लाडक्या बहिणींना 2100 रुपये |

Ladki Bahin Yojana 2100 Rupay
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment date
Ladki Bahin Yojana update

Ladki Bahin Yojana 2100 Rupay
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment date
Ladki Bahin Yojana update

नमस्कार, Ladki Bahin Yojana 2100 Rupay राज्यात महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये प्रतिमाह आर्थिक सहाय्य दिले जात होते. त्यातच विधानसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू झाली, त्यावेळेस महायुती सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यातील घोषणेमध्ये माहिती सरकारने लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांची रक्कम वाढवून ती 2100 रुपये करणार असल्याचे सांगितले होते.

मात्र जाहीरनाम्यातील घोषणेची अंमलबजावणी लांबली होती. ती आत्ता अंमलबजावणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात करेल, अशी अपेक्षा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना होती, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विभागाच्या मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी 2100 रुपयांबद्दल देणार की नाही ? याबद्दल स्पष्ट केलेले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील घोषणा या पाच वर्षासाठी लागू असतात. त्यामुळे जाहीर नाम्यामध्ये घोषणा केलेली 2100  रुपयांची अंमलबजावणी योग्य वेळी केली जाईल, असेही अदिती तटकरे त्याबद्दल बोलताना म्हणाल्या. या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नमो शेतकरी सन्मान निधी मध्ये होणार वाढ | शेतकऱ्यांना मिळणार आता दरवर्षी 15 हजार रुपये | मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा |

2 हप्त्यांचे एकत्रित वितरण |

लाडकी बहिण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रतिमाह 1500 हजार रुपयांचे वितरण आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एकत्रित वितरित केले जाणार आहे. कारण फेब्रुवारीमध्ये अपात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली होती, या पडताळणी प्रक्रिया दरम्यान फेब्रुवारी चा महिना हप्ता जमा करण्यास शासनाकडून विलंब झालेला आहे.
म्हणून शासनाकडून फेब्रुवारी चा हप्ता आणि मार्च चा हप्ता असे दोन्ही मिळून 3000 हजार रुपये आज 8 तारखेपासून महिलांचे बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana 2100 Rupay

लाडक्या बहींनीसाठी खुशखबर | महिला दिनानिमित्त मिळणार शासनाकडून गिफ्ट | काय असणार ते ?

काय म्हणाल्या अदिती तटकरे |

अधिवेशन सुरू झालेले आहे. अधिवेशनात सभागृहात विचारलेल्या प्रश्नांबद्दल उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ” महायुतीच्या जाहीरनामात 2100 रुपयाची घोषणा केली होती, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनातच देणार अशी कोणती हि घोषणा केलेली नाही. जाहीरनामा हा पाच वर्षांच्या कालावधीसाठी असतो अशी माहिती त्यांनी दिली.”

त्याचबरोबर महिलांना अपात्र करण्याचे प्रक्रिया जशी इतर विभागाकडून माहिती प्राप्त होते. त्यानुसार त्यावर कारवाई केली जात आहे, सुरुवातीला शासनाने निर्धारित केलेला नियम अटीनुसारच महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाडकी बहीण सावत्र |

लाडक्या बहिणीने 2100 रुपये अनुदान देण्याबाबतच्या गोष्टीवर, तसेच महिला अपात्र करण्याच्या प्रक्रियेवर विरोधकांनी अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना चांगली घेरले होते. राज्यातील लाडक्या बहिणीचे माते घेऊन सत्तेत आलेल्या महायुती सरकार लाडक्या बहिणींना अपात्रतेचे निकष का लावत आहे ? असा प्रश्न विरोधकांनी यावेळी मांडला त्याचबरोबर रस्त्याचे छाननी करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करणार का हे प्रश्न विचारत निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण असलेली आता बहीण सावत्र झाली का ? असा प्रश्न देखील विरोधकांनी सभागृहात मांडला. Ladki Bahin Yojana 2100 Rupay

राज्यसरकारच्या 17 लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी |  महागाई भत्त्यात झाली वाढ | पाहा निर्णय |

Leave a Comment