लाडकी बहिण योजना |
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana installment date
Ladki Bahin Yojana news
2100 rupees for ladki bahin Yojana
Ladki Bahin Yojana update
नमस्कार, Ladki Bahin Yojana विधानसभा निवडणुकी च्या पूर्वी जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे वितरण करण्यात आले होते. याच दरम्यान निवडणुकांच्या प्रचारामध्ये महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महायुतीची सत्ता येऊन जवळपास चार महिने होऊन गेले परंतु, अद्यापही लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे वाढीव अनुदान कधी मिळणार ? याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेलं होतं. दरम्यान आता लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्चच्या हप्त्या बद्दल महत्त्वाची माहिती मिळालेली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का लांबला ? याबद्दल कारण सांगितले होते. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचे व मार्च महिन्याचे असे 3000 हजार रुपये महिला दिना निमित्त लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्याच अनुषंगाने 07 मार्च 2025 पासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाभार्थी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली.
फेब्रुवारी महिन्याचे 1500 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले, परंतु मार्च महिन्याच्या हप्त्याचे काय ? याबद्दल बोलताना अदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे ते पहा. Ladki Bahin Yojana
पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसर्या टप्प्यातील नोंदणी प्रक्रिया सुरू | ” ही ” आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख | सविस्तर माहिती |
काय म्हणाल्या अदिती तटकरे |
महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या फेब्रुवारी व मार्च हप्ता बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे. यामध्ये आदिती तटकरे म्हटले आहे की, ” लाडकी बहिण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्याची प्रक्रिया 7 मार्च पासून सुरू झालेले आहे.
हि प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असून, सर्व पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये व मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व लाभ पात्र लाभार्थ्यांना दोन्ही मिळण्याचा लाभ मिळणार असून, याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. Ladki Bahin Yojana
आता गाय गोट्यासाठी 2.25 लाख रुपयांचे मिळणार अनुदान | अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ?
महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबद्दल म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याच्या घोषणा बद्दल विचारले असता, अदिती तटकरे म्हणाल्या की, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्याचे आम्ही जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते. या श्वासनाच्या आम्ही पूर्तता करणार आहोत, यात कोणतीही शंका नाही.” 2100 रुपयांबाबत नियोजन सुरू आहे. आमच्या घोषणाची नक्कीच आम्ही पालन करू, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.” Ladki Bahin Yojana