लाडक्या बहिणींना खास भेट |
Ladki Bahin Holi gift
Ladki Bahin Yojana
Retion card news
Holi gift for government
Saree gift for ladki bahin
नमस्कार, Ladki Bahin Holi gift राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाचे बसमधून अर्ध्या तिखटावर प्रवास करण्याची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणूक ही पूर्वी लाडकी बहिणी योजना आणून 1500 रुपये महिलांच्या बँक खात्यात सुरू केले, त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारला भरभरून मत दिले, त्यामुळे फिरून एकदा महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली.
आता महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांची वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहेत. त्या संदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत.
लाडक्या बहिणीने साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गट्टे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक साडी दिली जाणार आहे.
स्वतःच घर बांधायचं आहे ? मग जाणून घ्या, घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय ? संपूर्ण माहिती |
रेशन दुकानातून मिळणार साडी |
विधानसभा निवडणुकीनंतर एका बाजूला लाडक्या बहिणीच्या अर्जाची कडक पडताळणी सुरू आहे. त्यामुळे लाखो लाडक्या अपात्र ठरत आहेत. दुसऱ्या बाजूला पात्र लाभार्थ्यांना आणखी खुश करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांना सरकारने गिफ्ट देण्याचे ठरवले आहे, ते म्हणजे होळी सण निमित्त रेशन दुकानातून साड्यांची वाटप होणार आहे. अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणी वस्त्रोद्योग विभागाकडून केली जाणार आहे, त्यामुळे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींवर आनंदाच्या रंगाची उधळण होणार आहे.
पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा झाला सुरू | पात्रता काय ? अर्ज कसा करावा ? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ?
कॅप्टिव्ह मार्केट योजना |
वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील आंत्तोदय शिधापत्रिका धारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी कॅप्टिव मार्केट योजना राबविण्यात येत आहे. Ladki Bahin Holi gift
कॅप्टीओ मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकार यांच्या शहस्ते 27 जानेवारी रोजी झाला. या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 24 लाख शिदापात्रिका धारकांना यांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार असल्याचे मंत्री सावकारे यांनी सांगितले.
सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग अंतर्गत नोंदणीकृत घटकांकडून साड्यांची उत्पादन करण्यात आले असून, त्यामुळे विणकारांना रोजगार उपलब्ध झाले आहेत.
ही योजना 2023 ते 2028 पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आली असून, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला वस्त्र उद्योग विभागामार्फत यंत्र मार्गावर विणलेली प्रति कुटुंबिक साडीचे रेशान दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ जवळपास 24 लाख 87 हजार 375 कुटुंबांना होणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ | अर्ज न केलेल्या महिलांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार |
या सणाला मिळणार गिफ्ट |
राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाकडून कॅप्टिव मार्केट योजनेअंतर्गत साड्या दिल्या जाणार आहेत, त्याच्या वस्त्रोद्योग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग आणि कालबद्ध नियोजन सुरू केले असून, साडी वाटप करण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून साडी वाटप सुरू करण्यात आली आहे आणि होळी पूर्वी साडी वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याने, राज्यातील महिलांना होळी सणाला या योजनेचा लाभ पूर्णपणे मिळेल, असे जिल्हा नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांचा होळी सण नव्या साडी ने साजरा होणार आहे. Ladki Bahin Holi gift