प्रधानमंत्री घरकुल आवास योजना |
Gharkul scheme Maharashtra 2025
PM Awas Yojana
Gharkul scheme
Pradhanmantri Awas Yojana
Apply for pm Awas Yojana
नमस्कार, Gharkul scheme Maharashtra 2025 केंद्रशासनाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरिबाला घर मिळवून देणे, हा उद्देश आहे. ( PMAY – G ) ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना 1 लाख 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल. ही मदत पूर्वी 1 लाख 30 हजार रुपये इतकी होती, त्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे.
पीएम आवास ग्रामीण योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्वतःचं हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाकडून ग्रामीण व शहरी असे दोन प्रकारे ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळवायचा असेल, तर कोण – कोणती कागदपत्रे लागणार आहेत ? योजना नक्की काय आहे ? कोणाला लाभ मिळणार आहे ? ऑनलाइन अर्ज कसा करायचा ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पी एम इंटर्नशिप योजनेचा दुसरा टप्पा झाला सुरू | पात्रता काय ? अर्ज कसा करावा ? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती ?
घरकुल योजना 2025 नक्की काय आहे ?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची सुरुवात 1 एप्रिल 2016 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील गरीब कुटुंबासाठी, ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2.0 चा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सुरक्षित आणि आरोग्यदायी घर प्रदान करणे आहे.
पीएम आवास योजना 2025 अंतर्गत त्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते. त्यांना स्वतःचे घर नाही. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला पी एम ए वाय जिच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यातून गोरगरीब कुटुंबांना आपले स्वप्न साकार करता येते. Gharkul scheme Maharashtra 2025
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ | अर्ज न केलेल्या महिलांना नाव नोंदणीचा लाभ घेता येणार |
घरकुलसाठी आवश्यक पात्रता |
- अर्जदार व्यक्ती हा भारताचा मूळ नागरिक असावा.
- अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असावे.
- वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपये दरम्यान असावे.
- अर्जदाराचे चे नाव रेशन कार्ड किंवा बीपीएल यादीत असावे.
- मतदार यादीत नाव असणे अनिवार्य असावे.
- एक वैद्य ओळखपत्र पुरावा अर्जदाराकडे असावा.
Gharkul Scheme Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- निवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जॉब कार्ड
- स्वच्छ भारत मिशन नोंदणी क्रमांक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईझ फोटो
- ई-मेल आयडी Gharkul scheme Maharashtra 2025
असा करा ऑनलाईन अर्ज |
घरकुल योजना 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- प्रथम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण @https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज उघडेल. - त्यानंतर awassoft मेनूमध्ये data entry ऑप्शन वर क्लिक करा. क्लिक करतोच एक नवीन पृष्ठ उघडेल.
- त्यानंतर data entry for Awas वर क्लिक करा.
- नंतर तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा आणि continue बटणावर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल, त्यामध्ये युजरनेम, पासवर्ड आणि capcha code टाकून लॉगिन बटन वर क्लिक करा.
- पर्सनल डिटेल्स ( व्यक्तिगत माहिती ) Beneficiary Registration form मध्ये भरा.
- तिसऱ्या विभागात Beneficiary convergence details जॉब कार्ड नंबर आणि एसबीएम नंबर भरा.
- चौथ्या विभाग डिटेल्स फाईल बाय कन्व्हर्शन ऑफिस ब्लॉक द्वारे भरलेली माहिती असेल.
अशाप्रकारे तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण शक करू शकता. त्यानंतर लाभार्थ्यांना सेक्शन ऑर्डर स्वीकृती पद्धतीने अंतर्गत मिळणारे लाभ दर्शवले जातात, ते पत्र एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना पाठवले जाते.