गाय गोठा अनुदान योजना |
Gai gotha anudan 2025
Gai gotha anudan Yojana
Gai mhais gotha anudan
Gai gotha anudan Yojana news
Animal gotha subsidy scheme
नमस्कार, Gai gotha anudan 2025 महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. त्यांतर्गत शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कायम स्वरूपी विशेष अनुदान योजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पशु धनासाठी आधुनिक व पक्या स्वरूपाचे गोठे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. तर आज आपण गाय गोठा अनुदान यासाठी अर्ज करायचा ? पात्रता काय असणार आहे ? कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ? निकष काय ? या सर्वांची माहिती सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ? निर्णय काय झाला ? स्पष्ट बोलल्या आदिती तटकरे |
गाय गोठा अनुदान योजनेचा उद्देश |
राज्यात शेती करणार्यांचा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकरीहे जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. त्याच बरोबर दुग्ध व्यवसाय हा आर्थिक नफा कमवण्यासाठी केला जाणारा एक खूप मोठा व्यवसाय महाराष्ट्रात चालतो. या शेतकऱ्यांच्या गाई म्हशींच्या पालन साठी योग्य गोठ्याची कमतरता असल्याने जनावरांचे व्यवस्थित पोषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून गोटा बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. कारण :
- जनावरांचे व्यवस्थित पालन पोषण व्हावे. ऊन, वारा, पाऊस यापासून त्यांचे रक्षण व्हावे.
- शेतकऱ्यांना विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जावे, त्यामुळे रोजगार निर्मिती होते.
- त्याचबरोबर राज्यातील दूध उत्पादनाला चालना देणे. Gai gotha anudan 2025
Gai Gotha Anudan 2025 | अनुदानाचे स्वरूप |
- दोन ते सहा जनावरांचा गोठा :
दोन ते सहा जनावरांचा गोठा बांधण्यासाठी एकूण 77,188 रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. - सहा ते 12 जनावरांचा गोठा :
शासनाकडून सहा ते बारा जनावरांचा गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते, ते म्हणजे 1 लाख 54 हजार 376 रुपये दिले जातात.
- 13 पेक्षा अधिक जनावरांसाठी :
ज्या शेतकऱ्याकडे तेरा पेक्षा अधिक जनावरे असतील, तर पहिल्या प्रकारच्या 3 पट म्हणजेच 2 लाख 31 हजार 564 रुपयांच्या अनुदान दिले जाते.
प्रत्येक अपंग नागरिकाकडे कार्ड असलेच पाहिजे ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |
आवश्यक कागदपत्रे |
- सातबारा उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पशुधन असल्याचा पुरावा
- शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची शेत जमीन असल्याचा उतारा
अर्ज करण्याची पद्धत |
- ऑनलाइन :
गाय गोठा अनुदान योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फक्त ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावा लागणार आहे. Gai gotha anudan 2025
- ऑफलाइन :
ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय मार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना | आता 574 रुपयांचा गुंतवणुकीवर बना लखपती | वाचा सविस्तर |
अर्ज कोण करू शकतो |
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जागा उपलब्ध असावी.
- शिवाय त्या व्यक्तीला पशुधन पालनाचा अनुभव असावा.
- या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील पशुपालकांना लाभ दिला जातो.