Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

Table of Contents

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र |

Mahila Swayam Siddhi Yojana 2024
mahila swayam siddhi yojana in maharashtra
virbhadrkali tararani mahila swayam siddhi yojana marathi
vidhva mahilansathi yojana
maha govt scheme

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो,  देशातील नागरिकांचा आरोग्यपूर्ण आणि आर्थिक व सामाजिक दृष्ट्या विकास पूर्ण जीवन जगण्यासाठी देशाच्या राष्ट्रीय व राज्य शासनाकडून जनतेच्या कल्याणासाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील प्रत्येक घटकाला अनुसरून निश्चित केल्या जातात. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकर्य पासून शहरातील मजुरांपर्यंत सर्वांचा समावेश केलेला असतो.
या योजनांसाठी शासनामार्फत निधी पुरविला जातो. तसेच वेगवेगळ्या स्तरावर निधीचे वितरण करून शेतकरी, बांधकाम कामगार, घर कामगार, महिला, मुली, विधवा, जेष्ठ नागरिक व लहान बालके तसेच अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या सर्वांचा विकास वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे त्यांचा विकास होण्यासाठी हातभार लावला जातो.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील, गरीब महिलांचे जीवन सुरक्षित करता यावे, तसेच महिलांचे हक्क व अधिकार त्यांना देता यावेत. यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यातीलच एक योजना म्हणजे ” वीरभद्रकाली ताराराणी स्वंयसिद्धी योजना “ होय.
देशात कोरोनाची महामारी निर्माण झाली. या कोरोनाच्या महामारीमध्ये राज्यातील ग्रामीण भागात अनेक कुटुंबातील कर्त्या पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे अनेक कुटुंबामध्ये उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे, अशा विधवा महिलांना त्यांची उपजीविका करता यावी. यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने 2 नोव्हेंबर 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली.
राज्यातील विधवा तसेच घटस्पोटीत महिलांना आपले जीवन समृद्ध व आत्म सन्मानाने जगता यावे, तसेच त्यांचे उपजीविकाही सन्मानपूर्वक व्हावी. या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी या महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते.
समाजामध्ये वावरताना ग्रामीण भागातील या महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलता यावा. तसेच त्यांना उपजीविकेसाठी आर्थिक सहाय्य निर्माण व्हावे, यासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरवले जाते. त्यामुळे या स्त्रियांना आपली उपजीविका करण्यासाठी तसेच आपल्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोजच आपल्या लेखांच्या माध्यमातून घेत असतो. या योजना समाजातील नागरिकांचे सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी राबवल्या जातात. त्याचप्रमाणे आज आपण राज्यातील विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या वीरभद्रकाली ताराराणी स्वयं सिद्ध योजना, या योजनेची माहिती पाहणार आहोत.
त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात किंवा परिवारात ज्या कोणी विधवा महिला असतील किंवा घटस्फोटीत असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा लेख हा जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत शेअर करा. त्यामुळे अशा महिलांना आपल्या व आपल्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल, ही विनंती.

योजनेचे नाव वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजना 
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
लाभार्थीराज्यातील विधवा व घटस्फोटीत महिला
उद्देशमहिलांना जीवन जगण्यासाठी सहय्य्य करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

हे देखील वाचा –

Good News | डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 |

कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना |New | Krushi Sanjivani Horticulture yojana maharashra 2024 | दिव्यांग शेतकऱ्यांसाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध |

मोफत सायकल वाटप योजना महाराष्ट्र | New | Cycle Vatap Yojana 2024 In Marathi | शालेय मुलीना मिळणार सायकल |

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना | Good News | Savitribai Phule Scholarship Yojana Maharashtra 2024 |

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2024 | Good News | Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana | मिळणार 43000/- रुपये भत्ता |

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील कोरोना काळात पुरुष मृत्यू पावलेल्या कुटुंबातील विधवा महिलांना आपले जीवन व उपजीविका सन्मानपूर्वक करता यावी, तसेच उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावी, या उद्देशाने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • विरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून, स्वावलंबी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • स्वयंसिद्ध योजनेच्या माध्यमातून महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास साधने.
  •  या विधवा महिलांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावी लागू नये, तसेच जास्त व्याजदराने कोणाकडून कर्जही घ्यावे लागू नये, यासाठी ही  योजना सुरू करण्यात आली. Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेची वैशिष्ट्ये |

  •  महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील घटस्फोटीत व विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेली वीरभद्र काली ताराराणी स्वयसिद्ध योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • स्वयंसिद्ध योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवून आत्मनिर्भर करणे.
  • या महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत करून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे.
  •  स्वयं सिद्ध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना विविध प्रकारची लाभ देणे.
  • या स्वयं सिद्ध योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदार व्यक्तीला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही. Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |
  • वीरभद्र काली ताराराणी स्वयसिद्ध योजनेमुळे राज्यातील विधवा महिलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत.
  • महिला स्वयं सिद्ध योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी आर्थिक लाभाची राशी थेट विधवा महिलांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा करण्यात येते.

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेसाठी पात्र व्यक्ती |

महाराष्ट्र राज्यातील विधवा व घटस्फोटीत महिला वीरभद्र काली ताराराणी स्वयं सिद्ध योजनेच्या लाभ घेण्यासाठी लाभार्थी आहेत.

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेचे फायदे |

  • जागतिक महामारी असलेल्या कोरोनाच्या काळात ज्या महिलांचे पती मृत्यू पावले आहेत. अशा विधवा महिलांना या योजनेअंतर्गत मदत दिली जाते.
  • या योजनेच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटीत महिलांनासाठी आर्थिक समावेश विषय उपक्रम राबवण्यात येतात.
  • एखाद्या वाडीतील, वस्तीतील तसेच गावातील विधवा व घटस्फोटीत महिलांना स्वयंसहाय्यता गटांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • राज्यातील रिझर्व बँक ऑफ इंडिया मार्फत किमान पाच विधवा महिलांच्या समूहांना विशेष सहाय्यता ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.
  • या योजनेमुळे महिलांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल.
  • वीरभद्र काली ताराराणी स्वयसिद्ध योजनेच्या माद्यमातून विधवा महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यास मदत मिळेल.
  • या योजनेअंतर्गत विधवा महिला सदस्यांना सहाय्यता निधी आदा करताना प्राधान्य दिले जाईल.
  • महाराष्ट्र राज्यातील शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत अशा समूहातील महिलांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षाविषयक योजनांमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल.
  • महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबी झाल्याने, त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
  • राज्यात राबवण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना PMG, JBY, PMSBY आणि APY  या योजनांमध्ये महिलांना प्रामुख्याने प्राधान्य असेल.
  • राज्याच्या आरोग्य विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • ज्या घरातील कर्त्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबातील महिलांना आरोग्य, शिक्षण व अन्नसुरक्षा इत्यादी योजना अंतर्गत प्राथमिकता दिली जाईल.

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | शासनामार्फत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना |

पंडित दीनदयाळ उपाध्ये ग्रामीण कौशल योजना अंतर्गत महिलांना प्रशिक्षण:

  • राज्यातील कोरोना काळात ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले आहे, अशा कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील विधवा महिलांना तसेच युवक – युवतींना दीनदया उपाध्ये ग्रामीण कौशल योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल.

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना:

  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 18 ते 35 वयोगटातील विधवा महिलांना 10 ते 45 दिवसांची कृषी विषयक, प्रक्रिया उद्योग तसेच उत्पादन विषयक आणि सामान्य उद्योजकता प्रशिक्षण दिले जाते.
  • तसेच हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो.

उन्नती योजना:

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विधवा महिलांना शंभर दिवसाची काम उपलब्ध करून दिले जाते.
  • तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, कृषी विज्ञान केंद्र
  • माध्यमिक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या व सोय रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातात.

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेसाठी पात्रता |

  • विरभद्र काली ताराराणी स्वयसिद्ध योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावी.
  • या योजनेचा लाभ घेणारी महिला ही विधवा किंवा घटस्फोटीत असावी.

वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धी योजनेचे नियम व आटी |

  1. महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी महिलांनाच वीरभद्रकाली ताराराणी स्वयसिद्ध योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
  2. राज्याबाहेरील महिलांना स्वयसिद्ध योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  3. या स्वयसिद्ध योजनेचा लाभ घेणारे महिलाही विधवा किंवा घटस्फोटीत असावी.
  4. अर्जदार महिलाकडे तिच्या पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, तसेच घटस्फोटाची प्रती सादर करावी लागेल.
  5. ताराराणी सोयसिद्ध योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय 18 ते 45 वयोगटात दरम्यान असावे.
  6. वय वर्ष 45 च्या वरील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • रहिवाशी दाखला
  • जन्माचा दाखला
  • पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र किंवा मृत्यूचा दाखला
  • घटस्फोटाचे प्रत
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | अर्ज रद्द होण्याची करणे |

  • राज्यातील अर्जदार महिलेचे वय 45 च्या वर असेल तर, तिला या योजने अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिला हि राज्याबाहेरील असल्यास अर्ज रद्द केले जातो.
  • अर्जदार महिलेकडे पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द केले जातो.
  • अर्जदार महिलेने अर्जात खोटी माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केले जातो.

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 | अर्ज करण्याची पद्धत |

  • अर्जदार महिलेस प्रथम आपल्या जवळच्या ग्रामीण भागात असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
  • शहरी भागात असल्यास महानगर पालिका कार्यालयात जावे लागेल.
  • तिथून या योजनेचा अर्ज घ्यावा.
  • तो अर्ज योग्य व अचूक भरावा.
  • त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  • नंतर तो अर्ज कार्यालयात जमा करावा.
  • जमा केलेल्या अर्जाची पोचपावती घ्यावी.
  • अशा प्रकारे तुमची ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल. Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |

वीरभद्रकाली ताराराणी स्वयसिद्ध योजना शासनाची अधिकृत website CLICK HERE

1 thought on “Good News | वीरभद्रकाली ताराराणी महिला स्वयंसिद्धी योजना महाराष्ट्र | Mahila Swayam Siddhi Yojana 2024 |”

Leave a Comment