शेतकऱ्यांसाठी अजित पोर्टल |
Ajit portal for farmers
Farmers app launch
Ajit portal for krushi scheme
Ajit portal for government
Ajit portal for farmers scheme
नमस्कार, Ajit portal for farmers राज्य शासनामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान व लाभाच्या हितकारी योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांचा उडणारा गोंधळ कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांपर्यंत वेळच्यावेळी ला पोहोचवण्यासाठी राज्य शासनाकडून एक संकेतस्थळ निर्माण केले जात आहे.
त्यासाठी अजित पोर्टल नावाचे एक संकेतस्थळ लवकर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे देणार, असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. तसेच राज्यातील महिलांसाठी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे.
” त्या ” लाडक्या बहिणीचे अर्ज होणार बाद | घरोघरी पडताळणीला झाली सुरुवात | वाचा सविस्तर |
माणिकराव कोकाटे यांनी केली घोषणा |
राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पोर्टलचे नाव अजित पोर्टल असल्याचं कृषिमंत्री यांनी जाहीर केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावावरून देण्यात आलेल्याच बोलले जात आहे. राज्याचे कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकाटे यांनी कृषी विभागात नवीन प्रयोग करण्याची जाहीर केले आहे. तसेच कृषी विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे.
अर्थसंकल्पात धन धान्य कृषी योजनेची घोषणा | त्याच बरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली |
राज्यातील कथित पिक विमा घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कृषी खात्याचा कारभार व्यवस्थित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे कोकाटे म्हणाले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. Ajit portal for farmers
अजित पोर्टल चे मुख्य वैशिष्ट्ये |
एक खिडकी प्रणाली :
शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार त्यासाठी वेगवेगळ्या पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता पडणार नाही अजित पोर्टल एकच शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रणाली असेल.
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर :
शेतकऱ्यांना सर्व शेती विषयी योजनांचा लाभ थेट डीबीटी प्रणाली द्वारे त्यांच्या बँक खात्यात पोहोचवण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल.
महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना :
अजित पोर्टलमध्ये महिलांसाठी खास कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना कृषी क्षेत्रातील शिक्षण मिळवता येईल व ते शेतीमध्ये उत्तम कार्यक्षमता मिळते. Ajit portal for farmers
कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार वर नियंत्रण :
माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डीबीटी प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून योजना व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल.
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी | 15 तारखेपर्यंत ई – केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत | वाचा सविस्तर |
अजित पोर्टल नक्की काय आहे ?
अजित पोर्टल हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. जो शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा आणि अनुदानाचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देईल. यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सबसिडी व इतर शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सहकारी योजनांचा लाभ त्यांच्या बँक खात्यात दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी जास्त कागदपत्रांची आवश्यकता राहणार नाही, तसेच भ्रष्टाचार आणि गैरप्रकार यांना आळा बसेल.