पी एम किसान योजना |
PM kisan installment
PM kisan Yojana
PM kisan scheme
PM scheme for farmars
PM kisan Sanman nidhi Yojana
नमस्कार, PM kisan installment आपल्या भारतात अनेक लोक शेती व्यवसाय प्रामुख्याने करतात. त्यामुळे भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. म्हणून केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी, सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत टप्प्याटप्प्याने चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता याप्रमाणे दिली जाते. आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
केंद्र शासनाने 2019 मध्ये पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत देते. जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात दोन हजार रुपयांच्या हप्त्यांच्या स्वरूपात पाठवले जातात. त्याच योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हप्ते जारी करण्यात आली आहेत. आता शेतकरी वाट पाहत आहेत, ते म्हणजे 19 वा हप्ता कधी जमा होणार ?
1 जानेवारीपासून कोणत्याही तारणा शिवाय मिळणार 2 लाखाचे कर्ज | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |
फेब्रुवारीच्या ” या ” तारखेला मिळणार 19 व हप्ता |
पी एम किसान सन्माननिधी चा एकोणिसावा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होणार आहे. याबाबत अद्याप कोणते ही अधिकृत वक्तव्या नाही. या योजनेअंतर्गत सुमारे 13 कोटी शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. शासकीय योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जातो. PM kisan installment
गेल्या वेळी म्हणजेच पीएम किसान चा 18 वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात रिलीज झाला होता, जो फेब्रुवारी मध्ये चार महिने पूर्ण करेल. त्यामुळे पीएम किसान चा पुढचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार |
असा करा पीएम किसान साठी अर्ज |
- पी एम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसान च्या वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तिथे न्यू फार्म रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला त्याचे आधार क्रमांक, राज्य, जिल्हा व इतर संबंधित वैयक्तिक व बँक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आऊट काढून घ्या.
या लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही |
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा पीएम किसान निधी योजनेअंतर्गत काही नियम व अटी शासनाने ठरवून दिलेले होत्या. त्या अशा होत्या की, ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे, त्या शेतकऱ्यांनी आपली एक केवायसी करून घ्यावी. परंतु या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याने अद्यापही केवायसी पूर्ण केली नाही. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही व 19 वा हप्ता त्यांच्या खात्यात येणार नाही. PM kisan installment
1 thought on “PM Kisan Installment | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी | लवकरच खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये | लाभ घेण्यासाठी हे करा |”