संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार | Shravan Bal Pension Scheme New GR | नवीन GR आला |

                               विशेष अर्थ सहाय्य योजना |

Shravan Bal pension scheme new GR
Sanjay Gandhi niradhar Yojana.
Social welfare schemes
CM schemes
Vishesh arthsahay yojana

Shravan Bal pension scheme new GR
Sanjay Gandhi niradhar Yojana.

नमस्कार, Shravan Bal pension scheme new GR महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ पेन्शन योजना. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील निराधार व्यक्ती, अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती, अनाथ मुले, मोठे आजार, घटस्फोटीत महिला, दुर्लक्षित महिला व अत्याचारीत महिला इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 1980 रोजी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विशेष सहाय्य योजनांमध्ये होणाऱ्या विलंबाला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ पेन्शन योजनांचे पैसे आता थेट महाडीबीटी प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणार असून प्रक्रियेला लागणारा कालावधी कमी होणार आहे.

अशा बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने एक नवीन जीआर काढलेला आहे. GR नक्की काय आहे ? या योजनेचा उद्देश काय आहे ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

1 जानेवारीपासून कोणत्याही तारणा शिवाय मिळणार 2 लाखाचे कर्ज | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी |

संजय गांधी निराधार योजना |

1980 पासून ही योजना राज्यात सुरू आहे. अपंग, मानसिक रोगाने ग्रस्त व्यक्ती, विधवांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान दिले जाते. Shravan Bal pension scheme new GR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश |

  •  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाडीबीटीच्या माध्यमातून योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
  • सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
  • राज्यातील शासकीय वस्तीग्रहांची आवश्यक ती दुरुस्ती तसेच प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्याचबरोबर राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या, तीर्थ दर्शन योजनेसाठीचे पोर्टल सुरू करण्याचा निर्देश फडणवीस यांनी दिले.

 1 जानेवारीपासून UPI पेमेंट चे नियम बदलले | आता जास्त पैसे ट्रान्सफर करता येणार | सविस्तर माहिती |

15 दिवसात अहवाल सादर करण्यात आदेश |

  1.  राज्यातील सौर कृषी वाहिन्याने जल जीवन मिशन योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रकल्पावरील येणाऱ्या अडचणी सोडून पंधरा दिवसात मुख्यमंत्री कार्यालयात अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
  2. महायुती सरकारच्या या निर्णयाने राज्यातील करोडो लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळेल, त्याचबरोबर ही योजना अधिक पारदर्शक आणि गतिमान होणार असून, राज्याच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ गरजूंना मिळणार आहे.

 सामाजिक न्यायास सुरुवात |

श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरू असलेल्या श्रवण बाळ पेन्शन योजना व संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभाची रक्कम थेट डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. निर्णयामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे लाभ अधिक प्रभावीपणे राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचतील. Shravan Bal pension scheme new GR

 आधार कार्ड प्रमाणे आणखी एक नवीन आयडी मिळणार | कोणाला होणार याचा लाभ ? काय आहे सरकारचा नवीन प्लॅन |

1 thought on “संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार | Shravan Bal Pension Scheme New GR | नवीन GR आला |”

Leave a Comment