संजय गांधी निराधार योजना |
Sanjay Gandhi niradhar Yojana news
नमस्कार, Sanjay Gandhi niradhar Yojana news राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महा 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना आता येत्या जानेवारीमध्ये डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता दिला जाणार आहे. पण तो हप्ता 1500 हजार रुपयांचा मिळणार की, 2100 रुपयांचा याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.
” मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजने ” बद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे, ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना व मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ महिला घेऊ शकणार आहेत, त्यामुळे तसे न केल्यास महिलांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.’
शेतकऱ्यांसाठी ” गुड न्यूज ” पीएम किसान योजने अंतर्गत 6000 हजार ऐवजी मिळणार 12000 रुपये | सविस्तर वाचा |
लाडकी बहीण योजनेच लाभ |
राज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. अनेक महिलांना पाच महिन्यात दर महा 1500 हजार रुपये याप्रमाणे 7500 हजार रुपये मिळाले. दरम्यान विधानसभेची निवडणूक झाली, त्यात महायुतीने महिलांना दर महा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी ते आश्वासन पूर्ण करू आणि निकषांप्रमाणे पात्र महिलांन निश्चित करून 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल असे सांगितले. मात्र या निकषात किती लाडक्या बहिणी पात्र होतील, हे पाहावे लागेल. सध्या राज्यात लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत, त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांचाही समावेश आहे. Sanjay Gandhi niradhar Yojana news
राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येत नाही, निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी आहे. राज्यवर संकट आले, तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ती आखलेले नाही. त्या योजनेचे निकष अत्यंत काटेकोर आहेत.
भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू साठी मोठी भरती | 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी| लगेच करा अर्ज |
त्यामुळे बहुतांश लाभार्थी या मागास घटकातील व आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या वर्गातील आहेत. त्यामुळे या महिलांना शक्यतो लाडकी बहिण योजनेस 2100 लाभ केल्यास प्राधान्य देतील, मात्र त्यात 2100 रुपये हि अडचण ठरू शकते. कारण लाडक्या बहिणींना एकविशे रुपये मिळणार असतील, तर महिलांचा कल लाडक्या बहिणीकडे असणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्याचा विचार सरकार करत आहे.
निराधार योजनेच्या नवीन अर्जदारांकडून ‘ एनओसी ‘ घेतली जाईल |
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी या शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अनुदान घेत नसाव्यात, अशी अट आहे. या पार्श्वभूमीवर आता निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्यांकडून ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ‘ योजनेतून लाभ घेत नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाईल, जेणेकरून दोन्हीकडे त्यांची नावे येणार नाहीत. Sanjay Gandhi niradhar Yojana news