सोलर पंप अनुदान योजना |
Solar pump online status
Solar pump anudan Yojana
Solar panel scheme for government
Solar pump scheme peyment option
Solar pump online status
नमस्कार, Solar pump online status सोलर पंप अनुदान योजना हि राज्यात कृषी विभागामार्फत राबविली जाते. त्या अंतर्गत शेतकर्यांना चोवीस तास शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत अनुदान मंजूर केले जाते. त्यासाठी शेतकर्यांना mahadbt च्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
सोलर पंप साठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत काही अर्ज मंजूर झालेले आहेत, परंतु काही अर्ज अजून प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. त्यांना पेमेंट करण्यासाठीचा ऑप्शन आलेला आहे, मेसेज आलेला आहे. परंतु ज्यांच्या अर्ज मंजूर झालेले नाहीत, त्या शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन बघू शकतात.
जर सोलार पंप साठी आपण अर्ज केला असेल, पण आपल्या अर्जाची स्थिती जर पहायची असेल, तर ते कसे पहायचे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Solar pump online status
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत | त्या अगोदर भरून घ्या, आपला पिक विमा |
ऑनलाइन स्टेटस चेक करण्याची पद्धत |
- तुम्ही जर महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज केलेला असेल, तर तुम्ही महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.
- सोलर पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन स्थिती तपासता येते.
- अर्जाची स्थिती तपासताना तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून, या वेबसाईटवर जावे. वेबसाईट गेल्यानंतर पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का ? असे विचारले जाईल.
- नंतर एक प्रश्न विचारण्यात येईल. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभियान पीएम कुसुम सोलार योजनेसाठी अगोदर नोंदणी केलेली आहे का ?
- जर तुम्ही अगोदर नोंदणी केलेली असेल, तर YES करा. जर तुमची नोंदणी झालेली नसेल, तर तुम्ही No या पर्यायावर क्लिक करू शकता.
- तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे, म्हणून तुम्हाला yes करायचे आहे. एस केल्यानंतर तुम्ही खालील अर्ज क्रमांक टाकायचा आहे.
- हा अर्ज करताना तुम्हाला जो MK आयडी दिलेला आहे, तो आयडी त्या ठिकाणी टाकायचा आहे. आयडी टाकल्यानंतर ” शोधा ” या बटनावर क्लिक करायचे आहे.
- शोधा या बटनावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दाखवण्यात येईल. मुख्य म्हणजे अर्जाची स्थिती तुम्हाला उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येईल. Solar pump online status
- त्या ठिकाणी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला नसेल, तर तुम्हाला वेटिंग असे दाखवण्यात येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार | संपूर्ण माहिती |
स्टेट्स चेक करण्याची दुसरी पद्धत |
तुम्हाला सोलर पंप साठी केलेला अर्ज स्टेटस पाहण्यासाठी, अजून ही पद्धत देण्यात आलेली आहे. या पद्धतीने तुम्ही जाऊन आपल्या अर्जाची ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता.
दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकतात. त्या वेबसाईटवर केल्यानंतर बेनेफिक्टरी लॉगिन असे लिहिलेले असेल, या खाली तुम्हाला MK आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे ? त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दाखवण्यात येईल.
अशा पद्धतीने तुम्ही अधिकृत लिंक व वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाचे स्थिती पाहू शकता. दोन्ही पद्धतीने तुम्हाला तुमच्या अर्जाचे ऑनलाईन स्टेटस पाहता येणार आहेत.