लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana installment date
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana 6th and 7th installment
नमस्कार, Ladki bahin Yojana news राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळालेले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे. जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अमलात आणली.
निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला मतदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 हजाराचा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. तरी या योजनेवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा उमटत होत्या.
मात्र लाडकी बहिण योजनेंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्याचा जमा झालेले आहेत. त्यामुळे आत्ता प्रतीक्षा आहे ते पुढचा हप्ता कधी मिळणार ? आणि मिळाला तर तो किती मिळणार ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana news
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत | त्या अगोदर भरून घ्या, आपला पिक विमा |
योजनेचे आतापर्यंत चे पाच हप्ते |
राज्यात जुलै 2024 मध्ये या योजनेला सुरुवात झाली. 15 ऑक्टोबर पर्यंत या अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली होती. त्यामुळे या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटी 40 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. दोन कोटी वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ता हि महिलांच्या खात्यात जमा झाला, तसेच नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित पैसे दिवाळीचा बोनस म्हणून देण्यात आले. त्यामुळे आत्तापर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय ? अर्ज कसा करायचा ? कोण – कोणती कागदपत्रे लागणार | संपूर्ण माहिती |
हप्ता कधी मिळणार ? एकनाथ शिंदे यांचे आश्वासन |
राज्यातील निवडणूक प्रचार दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ” ही योजना फक्त घोषणासाठी नाही, आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. ” असे सांगितले. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्यातच हप्ता सरळ पात्र महिन्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. याशिवाय पुढील कालावधीसाठी पुरेसे नियोजन केलेले आहे.
त्याबरोबरच शिंदे यांनी अंतिम महत्वाची घोषणा केली होती, ती म्हणजे आम्ही फक्त 1500 हजार देणार नाही, तर योजनेचा लाभ वाढवून 2100 करणार आहोत, असे त्यांनी सांगितले होते. Ladki bahin Yojana news
विधानसभा निकालानंतर महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशाचे श्रेय लाडक्या बहिणींना देत, या योजनेचे 2100 रुपये महिलांना देणार असल्याची घोषणा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.