अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 % वाढ | Anganwadi Workers News | तसेच लाडकि बहिण योजनेचा इन्सेंटिव्ह ही दिला जाणार |

               Anganwadi Workers News | अंगणवाडी सेविका |

Anganwadi workers news
Anganwadi workers mandhan vadh
Anganwadi workers new update
Anganwadi workers Maharashtra
Salary details for Anganwadi workers

Anganwadi workers news
Anganwadi workers mandhan vadh
Anganwadi workers new update
Anganwadi workers Maharashtra
Salary details for Anganwadi workers

नमस्कार, Anganwadi workers news राज्यशासनाकडून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना दिवाळी बोनस हि देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे.

राज्य शासनाकडून राज्यात निवडणुकांच्या आधी सर्वच क्षेत्रामध्ये योजनांचा पाऊस पडलेला आहे. त्यामध्ये राज्यात सुरू केली लाडकी बहिणी योजना, त्यानंतर युवा तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याचबरोबर लाडका शेतकरी योजना. या योजना सुरू करून महिला व तरुणांना आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानंतर आता राज्य शासनाकडून राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनाची वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर शासनाकडून आता कोतवालांच्याही मानधनात वाढ करून, त्याबद्दलचा जीआर काढण्यात आलेला आहे. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करण्याच्या पवित्रात असलेल्या अंगणवाडी आणि मदतनीस यांच्याही मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांच्या मानधनात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलेला असून सर्व अंगणवाडी सेविकांनी मदतनीस यांना भाऊबीज ओवाळणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. Anganwadi workers news

लाडकी बहिण योजना 4 दिवसातच करा हे काम | Ladki bahin Yojana latest News | नाही तर पैसे होणार नाहीत जमा | येतील खूप अडचणी |

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ |

राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात 5000 हजार रुपये आणि 3000 हजार रुपयांची वाढ करून एक आठवड झाला. आता अंगणवाडी सेविका यांचे मानधन अगोदर 10 हजार होते ते आता 15 हजार रुपये करण्यात आलेले आहे. तर मदतनीस यांच्या ही मानधनात 3  हजार रुपयांची वाढ करण्यात आलेले आहे. Anganwadi workers news

अंगणवाडी सेविकांना दिवाळी बोनस |

भाऊ बहिणीच्या नात्याला अधिक घट करणाऱ्या भाऊबीजेच्या सणा निमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2000 हजार रुपयांची भाऊबीज ओवाळणी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, याची माहिती बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली.

यासाठी 40 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजुरीस मान्यता देण्यात आली असून लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यात मानधन वाढ आणि 2000 हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

स्वतःची जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपये | Bandhkam Kamgar Yojana | कोणाला मिळणार लाभ, पात्रता व आवश्यक कागदपत्रे | संपूर्ण माहिती |

लाडकी बहीण योजनेचा इंटेन्सिव्ह कधी मिळणार ?

राज्य शासनाकडून Anganwadi workers news अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारात 50 टक्के वाढ करण्यात आली, परंतु आता अंगणवाडी  सेविकांना प्रतीक्षा लागली आहे, ती म्हणजे लाडकि बहीण योजनेचा इन्सेंटिव्ह कधी मिळणार ?

जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली. या योजनेच्या अर्ज प्रक्रिया काही अनुचित प्रकार घडल्याने लाडके बहिण योजनेची फॉर्म भरण्याची काम हे फक्त अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आले. या अंगणवाडी सेवकांनी रात्रंदिवस काम करून ही जबाबदारी ही पार पडली.
त्यामुळे माझी लाडकी पण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते.
माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारे मानधन दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु त्याबाबतची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. Anganwadi workers news

Leave a Comment