PM Kisan FPO Scheme | FPO या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपये | पात्रता व निकष | कोणाला मिळणार लाभ ?

                 PM Kisan FPO Scheme | सविस्तर माहिती |

 

pm kisan yojana fpo yojna pm yojna kisan

PM Kisan FPO Scheme |

नमस्कार केंद्रशासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्य करून शेतकऱ्यांच्या शेतीला हातभार लावला जातो. केंद्र शासनाकडून राज्यात पीएम किसान सन्मान धन योजना राबवली जाते. त्याच अनुषंगाने पीएम किसान एफ पी ओ ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन जगण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी पंधरा लाख रुपयांच्या आर्थिक मदत करते. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना उत्पादक घटकामध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडून 15 लाख रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेमध्ये भाग देशातील शेतकरी घेऊ शकतात. जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभा करण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

Advance crop insurance | राज्यातील ‘ या ‘ 12 जिल्ह्यात अग्रीम पिक विमा वाटपास सुरुवात | पहा जिल्ह्यांची यादी |

 नक्की काय आहे एफ पी ओ योजना |

प्रधानमंत्री किसान एफ पी ओ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आपला व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रधानमंत्री किसान FPO योजना अंतर्गत 11 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करू शकतात आणि याच संघटनेला शासनाकडून 15 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम शेतकरी उत्पादक संघटना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वापरू शकतात.

PM Kisan FPO Scheme | पात्रता व निकष |

  • पीएम किसान एफ पी ओ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हे भारताचे मूळ नागरिक असणे गरजेचे आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे बंधनकारक आहे. PM Kisan FPO Scheme |
  • FPO योजनेच लाभ घेण्यासाठी शेतकरी हा शेतकरी उत्पादक संघटनेचा सदस्य असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी उत्पादक संघटनेमध्ये कमीत कमी 11 सदस्य असणे गरजेचे आहे, तरच या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

 

pm kisan yojana fpo yojna pm yojna kisan

 दिवाळीनिमित्त एसटी बसने प्रवास करणाऱ्यांना मिळणार मोफत प्रवास | ‘ हे ‘ नागरिक आहेत पात्र, संपूर्ण महिती |

पीएम किसान एफ पी ओ योजनेचे फायदे |

  1. या योजनेमुळे शेतकरी एकत्र येऊन काम करू शकतात.
  2. तसेच या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सह्यातून शेतकऱ्यांना आपला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.
  3. शेतकरी उत्पादक संघटनातून तयार होणाऱ्या मालांना योग्य बाजारपेठ मिळाल्याने अधिक नका करू शकतात.
  4. योजनेमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती शेत्रामध्ये करतील, त्यामुळे शेती कार्य अधिक जलद गतीने होईल.

PM Kisan FPO Scheme | आवश्यक कागदपत्रे |

  • रेशन कार्ड
  • शेतकऱ्याच्या आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पत्ता आणि पत्त्याचे पुरावा
  • बँक खाते पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • सातबारा उतारा

अर्ज करण्याची पद्धत |

  1.  पी एम किसान एफ पी ओ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अकरा शेतकऱ्यांच्या गटाने एकत्रित येऊन एक संघ किंवा एक संघटना तयार करावी लागेल.
  2. योजनेचा लाभ घेण्यासाठी संघटनेने आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतील.
  3. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  4. या वेबसाईटवर केल्यानंतर सर्वप्रथम मुखपृष्ठ ओपन होईल, त्यामध्ये Apply For New Schem  यावर क्लिक करावे लागेल.
  5. त्यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे.
  6. त्यानंतर आपल्या मोबाईल वरील ओटीपी टाकून एंटर करावे.
  7.  त्यानंतर आपल्या समोर योजनेचा फॉर्म ओपन होईल.
  8. त्यामध्ये विचारले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  9. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
 रेशन कार्ड धारकांना शेवटची संधी | हे काम करा, नाहीतर …. 31 ऑक्टोबर नंतर रेशन मिळणार नाही |

Leave a Comment