हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |

Table of Contents

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र |

hatmag vinkar mofat vij yojana 2024 | hatmag vinkar kalyan yojana hatmag vinkar yojana marathi mofat vij bill yojana

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनाकडून आपापल्या परीने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामाजिक घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.
केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना अनुदान तत्वावर राबवल्या जातात. या योजनांसाठी शासनाकडून अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर करण्यात येतो.
राज्यात विविध जाती-धर्मांमध्ये विविध प्रकारचे हस्ते उद्योग चालत असतात. हे परंपरागत उद्योग टिकून राहावे, या उद्योगाला चालना मिळावी, तसेच त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासन शासन स्तरावर अनेक प्रयत्न होत असतात.
राज्यात पूर्व परंपरागत चालत आलेला हस्त उद्योग, कलाउद्योग टिकून राहावा. जगाच्या बाजारात त्याची मालाची मागणी वाढावी. त्यामुळे त्या समाजाचा, त्या कलाकारांचा व्यवसाय चालव व त्यांच्या बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन, त्यांच्या उद्योगाला चालना मिळावी. त्यांचा उदरनिर्वाह तसेच दैनंदिन खर्च करता यावा, हा उद्देश या योजना सुरू करण्यामागे शासनाचा असतो.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील हातमाग उद्योग हा विनकर समाजाचा एक पारंपारिक उद्योग आहे. परंतु अजून आधुनिक युगात हातमाग वास्त्रौद्योगला असल्याची मागणी कमी होताना दिसत येत आहे. त्यामुळे हातमाग वस्त्र उद्योग हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
या उद्योगाला चालना देण्यासाठी, या लोकांच्या हाताला काम देण्यासाठी, त्यांचे उपजीविकेचे साधन असणाऱ्या या उद्योगाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेतला. ती योजना म्हणजे ” हातमाग विणकर कुटुंबांना मोफत वीज योजना ” होय.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महात्मा विणकर कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येते. हातमाग विणकर मोफत वीज योजना या योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्य सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत करण्यात आली.

मोफत वीज योजनेमुळे या विणकर कुटुंबावर असणारा वीज बिलाचा अतिरिक्त भर कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ते आपला व्यवसाय व्यवस्थित करून या वास्त्रौद्योग चालना देण्याचे काम करणार आहेत.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य व केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण रोज घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण राज्य शासनामार्फत राज्यातील हातमाग विनकरांसाठी राबवण्यात येणाऱ्या एका नावीन्यपूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे हातमाग विणकर मोफत वीज योजना होय.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात कोण विणकर असतील व जे आपला पारंपारिक व्यवसाय जोपासण्यासाठी झटत असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे ते हातमाग कामगार या योजनेचा लाभ मिळवून आपल्या उद्योगधंद्याला बळकोट देऊ शकतील, ही विनंती.

योजनेचे नाव हातमाग विणकर मोफत वीज योजना 
योजनेची सुरवातमहाराष्ट्र राज्य
विभागसहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
लाभ200 युनिट वीज मोफत
उद्देशहातमाग व्यवसायाचे संरक्षण करणे
लाभार्थीराज्यातील हातमाग व्यावसायिक कुटुंबे

हे देखील वाचा –

महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |

जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

गटई स्टॉल योजना मराठी | Good News | Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल |

चंदन कन्या योजना मराठी माहिती | New | Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | मुलींच्या भविष्यासाठी चंदन लागवाढ |

 

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेचा उद्देश |

  • हातमाग विणकर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून हातमाग विणकर यांच्या उपजीविकेचे साधन असणाऱ्या वस्त्रोद्योगाचे संरक्षण करणे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून हातमाग वस्तू उद्योगाला चालना देणे.
  • या योजनेमुळे तरुण पिढीतील हातमाग विनकरांना प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील हातमाग विणकरांचा सामाजिक व आर्थिक विकास करून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे.
  • राज्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राच्या वाढीस चालना देणे व त्याचा विकास करणे.
  • या योजनेच्या माध्यमातून हातमाग विनकरांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे.
  • या योजनेच्या माध्यमातून वस्तृद्योग कामगारांचा आपल्या कलेशी असणारी निष्टा, कलेवर असणारा विश्वास वाढेल.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेचा उद्दिष्ट्ये |

  1. हात माग विणकर मोफत वीज योजनेची सुरुवात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे करण्यात आली.
  2. या योजनेच्या माध्यमातून प्रति महिना दोनशे युनिट वीज मोफत देण्यात येते.
  3. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
  4. त्यामुळे अर्जदार विणकर यांना अर्ज करताना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  5. त्यामुळे त्यांच्या वेळ व पैशाची बचत होईल.

 

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेचे लाभार्थी |

हातमाग विणकर मोफत वीज योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील हातमाग वस्त्रोद्योगांमध्ये काम करणारी कुटुंबे हे या योजनेचे लाभार्थी आहेत.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजने अंतर्गत मिळणारा लाभ |

हातमाग विणकर मोफत वीज योजनेअंतर्गत हातमाग वस्त्रोद्योग विणकर कुटुंबांना प्रति महिना 200 पर्यंत मोफत वीज पुरवण्यात येते.

 

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेचे फायदे |

  1. हातमाग विणकर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून विणकर कुटुंबांना मोफत वीज दिली जाते.
  2. मोफत वीज योजनेतून विणकर कुटुंबांचा जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
  3. या योजनेमुळे राज्यातील तरुण वस्त्र विनकर प्रोत्साहित होऊन आपला पारंपारिक उद्योग अबाधित ठेवतील.
  4. या योजनेमुळे वस्त्रोद्योग विणकर कुटुंबांना हातमाग सुरू ठेवण्यासाठी चालना मिळेल.
  5. या योजनेमुळे वस्त्रोद्योग हातमाग विनकारांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
  6. हातमाग विणकर मोफत वीज योजनेमुळे विणकर कुटुंबे सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

 

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेचे नियम व आटी |

  1. या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा केंद्र शासनाच्या हातमाग अंतर्गत नोंदणीकृत असावा व त्याच्याकडे तसे ओळखपत्रही असावे.हातमाग विणकर  2
  2. मोफत वीज योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशांना दिला जाईल.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हातमाग विणकर कुटुंबाच्या नावे वीज जोडणीचे कनेक्शन असावे.
  4. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच दिला जाईल.
  5. अर्ज करणारा अर्जदार हा सहा महिन्यापासून विणकर, वस्त्र उद्योग व्यवसायात कार्यरत असला पाहिजे.
  6. त्याचा पुराव म्हणून त्याने कच्चा पक्का मला विक्रीचे बिल, महामंडळाचे सभासद असल्यास, त्या संस्थेचे प्रमाणपत्र सादर करावे.
  7. या योजनेअंतर्गत 200 पेक्षा जास्त युनिट वीज वापर झाल्यास उर्वरित बिलाची रक्कम लाभार्थ्याला भरावी लागते.
  8. तसेच विणकर कुटुंब आणि विज बिल देयक रक्कम नियमित भरलेली असावी, विलंब झाल्यास आकारणीची रक्कम शासन भरणार नाही.
  9. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा शासनाकडून आढावा घेण्यात येतो. त्यामध्ये जर इतर व्यवसायासाठी वीज वापर केल्याचे आढळून आल्यास या योजनेचा लाभ रद्द केला जातो.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर मोफत वीज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • विणकर असल्याचे ओळखपत्र
  • हातमाग महामंडळ विणकर सहकारी संस्थेच्या सभासद झाल्याचे प्रमाणपत्र
  • विजेचा वापर स्वतः कुटुंबाचा मर्यादित ठेवण्यात साठीची स्वयं घोष पत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ई-मेल आयडी
  • मागील तीन महिन्याचे वीज बिल

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  1. प्रथम आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून या योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
  2. त्यानंतर अर्जात विचारलेली माहिती योग्य व अचूक भरावी लागेल.
  3. त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्यात.
  4. सदर अर्ज सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागातील उपायुक्त यांच्याकडे जमा करावा.
  5. अर्ज जमा केल्याची पोच पावती कार्यालयातून घ्यावी.
  6. अशाप्रकारे तुमची हातमाग विणकर मोफत वीज योजनेचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | हातमाग विणकर योजने अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • हातमाग वीणकर मोफत वीज योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर व्यवसाय करत असेल, तर त्याचा या योजनेतून अर्ज रद्द होतो.
  • या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
  • मोफत वीज योजनेचा अर्जदार शासकीय नोकरीत असेल आणि तो जर हातमाग विणकर वस्त्रोद्योगमध्ये काम करत नसेल, तर त्याचा अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेअंतर्गत देण्यात येणारी मोफत वीज हे कुटुंबासाठी न वापरता इतर व्यवसाय उद्योगधंद्यासाठी वापरत असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा हातमाग विणकर नोंदणीकृत संस्थेचा सभासद नसल्यास, अर्ज रद्द केला जातो.
  • मोफत वीज योजने अंतर्गत अर्जदार व्यक्तीने यापूर्वी कोणत्याही शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत विजेचा लाभ घेतलेला असल्यास त्याला या योजनेत त्याचा या योजनेतून अर्ज रद्द केला जातो.

Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 |

हातमाग विणकर मोफत वीज योजनेचा अर्ज click here 

हातमाग विणकर मोफत वीज योजना शासन निर्णय CLICK HERE

1 thought on “हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |”

Leave a Comment