रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024 |
Maha dbt seed subsidy scheme
Maha Dbt subsidy scheme
Biyane anudan Yojana in Marathi
Rabbi Hungam biyane anudan Yojana
Maha Dbt subsidy scheme Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Maha dbt seed subsidy scheme राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाच्या पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आलेली आहे. यावर्षीच्या म्हणजे २०२४ – २५ च्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे.
बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे आणि पोषण सुरक्षा अनुदान यापैकी व राष्ट्रीय खात्यातील अभियान गळित धान्य पीक योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिके तसेच प्रामाणिक बियाण्यांची वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे पाहिजे, त्यांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? शेवटची तारीख कोणती आहे ? कोण – कोणती कागदपत्रे लागतील ? या सर्वांची माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. Maha dbt seed subsidy scheme
अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख |
मित्रांनो, Maha dbt seed subsidy scheme रब्बी हंगामातील बियाण्यांच्या अनुदान स्वरूपात लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत, अशी महत्वपूर्ण सूचना महाडीबीटी च्या माध्यमातून देण्यात आली आहे. रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज करायचे असेल, तर शेतकऱ्यांना दिनांक 6 ऑक्टोबर 2012 हि अंतिम तारीख देण्यात आलेला आहे.
कृषी विभागाकडून असे आव्हान करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांना महाडीबीटी बियाणे अनुदानासाठी अर्ज करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज लवकरात लवकर करून लाभ घ्यावा.
रासायनिक खतांच्या अनुदान वाटपास केंद्राची मंजुरी | पहा किती मिळणार अनुदान | संपूर्ण माहिती |
‘ या ‘ बियाणांसाठी मिळणार अनुदान |
2024 – 25 यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी बियाणे वितरीत केले जात आहेत, ती बियाणे पुढीलप्रमाणे :
- हरभरा
- गहू
- जवस
- करडे
- भुईमुग
- मोहरी
- राजगिरा
- सूर्यफूल
यासाठी मिळणार 100% अनुदान |
शेतकऱ्यांना पिकाच्या बियाणासाठी ऑनलाईन अर्ज करताना, तुम्हाला दोन पर्याय मिळतील. त्या दोन पर्यायांपैकी ‘ पीक प्रात्यक्षिके ‘ हा पर्याय निवडला, तर तुम्हाला बियाणंवर 100% अनुदान मिळणार आहे. Maha dbt seed subsidy scheme
पीक प्रात्यक्षिक घटकअंतर्गत एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादित सामावेश स्वरूपात 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. पण मात्र तुम्हाला यामध्ये जुनी बियाणे मिळणार नाहीत. फक्त नवीन बियाणे हेच ऑप्शन आहे.
Kapus Soyabean Anudan | कापूस सोयाबीन अनुदान जमा होण्यास झाली सुरुवात | पंतप्रधानांच्या हस्ते ” या ” दिवसा पासून झाले वितरण | KYC पूर्ण करा.
या घटकासाठी मिळणार 50 % अनुदान |
शेतकऱ्यांना पिकांच्या बियाणासाठी ऑनलाईन अर्ज करताना, दोन पर्याय दिले असतील. त्यापैकी हा दुसरा पर्याय आहे. जो म्हणजे ‘ प्रमाणित बियाणे. ‘
जर तुम्ही प्रमाणित बियाणे यावर क्लिक करून अर्ज सादर करत असाल, तर तुम्हाला प्रामाणित बियाणे या घटकासाठी 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एका शेतकऱ्याला मर्यादा दोन हेक्टर ठेवण्यात आलेली आहे.
या 50 टक्के अंतर्गत तुम्हाला नवीन आणि जुनी बियाणे अशा दोन्ही प्रकारचे बियाणे उपलब्ध असतील. त्याची तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना निवड करावी लागेल. त्यानुसार तुम्हाला लाभ दिला जाईल.
MAHA DBT Seed Subsidy Scheme | आवश्यक कागदपत्रे |
- सातबारा उत्तारा
- आठ अ उत्तारा
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक पासबुक
Apply Online For MAHA DBT Seed Subsidy Scheme |
- रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
- महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर दोन लॉगिन करायचे पर्याय दिसतील.
- आधार क्रमांक टाकून आपण OTP च्या साह्याने लॉगिन करू शकता, लॉगिन केल्यानंतर अर्ज हा पर्याय निवडा.
- अर्ज पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला बियाणे अनुदान हा पर्याय निवडायचा आहे.
- आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक इत्यादी पर्याय निवडायचे आहेत.
- अनुदान हवे असलेले धान्य निवडायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला पिकाचे वाण निवडावे लागेल. - लाभ घ्यायचा असेल ते क्षेत्र निवडावे.
- त्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर जतन वर क्लिक करावे.
- अशाप्रकारे तुम्ही रब्बी हंगामातील बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्जासाठी आवश्यक शुल्क |
रब्बी हंगामातील बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क हे भरावे लागेल, त्यासाठी अर्ज शुल्क 26.60 रुपये आहे. Maha dbt seed subsidy scheme
1 thought on “MAHA DBT Seed Subsidy Scheme | रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024 सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज | मिळेल लाभ |”