कडबा कुट्टी अनुदान योजना |
Kadba kutti subsidy scheme
Kadba Kutti anudan Yojana
Krushi Yojana Maharashtra
Maha DBT kadba kutti subsidy scheme
Kadba Kutti anudan Yojana Maharashtra
नमस्कार, Kadba kutti subsidy scheme महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करत आहेत. त्यामुळे शेती सोबतच जोडधंदा म्हणून ते पशुपालनाचा व्यवसाय करतात. शेतीला पूरक असा हा व्यवसाय संपूर्ण महाराष्ट्रभर केला जातो.
परंतु राज्यातील पशुपालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या जनावरांना हिरवा चारा द्यावा लागतो, परंतु तो हिरवा चारा जसाचा तसा टाकल्यास त्याचे नुकसान जास्त होते. त्यामुळे तो बारीक कट करून टाकावा लागतो, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे चारा कट करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री नसल्याने चारा कट करता येत नाही व चाऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात होती व पुढे जाऊन चारा टंचाई निर्माण होते.
आज राज्यातील अशा पशुपालक शेतकऱ्यांना चारा हाताने कट करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात व त्यामुळे शारीरिक इजा देखील पोहोचू शकते. या सर्वांवर उपाय म्हणून आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना चारा कट करण्याची मशीन, कुटी यंत्र खरेदी करण्यासाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचे वेळ व पैशाचे दोन्हीचे बचत होते.
2 एचपी विद्युत चलित कडबायंत्र याची किंमत वीस हजार रुपये पर्यंत आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत सरकारकडून दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय आहे ? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहिण योजनेंतर्गत अर्जाची होणार पुन्हा छाननी | 2100 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री |
आवश्यक पात्रता नियम व अटी |
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असावी.
- अर्जदाराकडे पशुधन असणे आवश्यक आहे.
- फक्त ग्रामीण भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्जदार व्यक्तीकडे कमीत कमी दोन जनावरे असावीत.
- अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये पेक्षा जास्त असू नये.
- सदर योजनेअंतर्गत दिली जाणारी कडबा कुट्टी मशीन लाभार्थी व्यक्तींना विकता येणार नाही.
- या योजनेसाठी नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.
नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना | नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग | वाचा सविस्तर |
Kadba Kutti Subsidy Scheme | आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक तपशील
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
- कडबा कुटी मशीन खरेदी केल्याचे बिल
- जनावराचा विमा केल्याचे प्रमाणपत्र.
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- मुखपृष्ठ ओपन झाल्यावर अर्जदाराला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- तुम्ही जर युजर आयडी व पासवर्ड बनवला नसेल, तर तुम्हाला नवीन अर्ज नोंदणी या पर्यावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- लॉगिन केल्यावर तुम्हाला शेती योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर योजनांची एक लिस्ट ओपन होईल, त्यामधील तुम्हाला कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल.
- त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक रित्या भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.
- शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून आपला अर्ज सबमिट करावा.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता पद्धतीने अर्ज करू शकता. Kadba kutti subsidy scheme
अशी करा मोबाईल ॲप ( DCS ) मधून नवीन ई – पिक पाहणी | पूर्ण माहिती सविस्तर वाचा |
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत |
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर तो अर्ज योग्य रित्या व अचूक भरावा.
- त्या अर्जासोबत अवश्य कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत जोडाव्यात.
- भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा.
- अशाप्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.