जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |

Table of Contents

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजना मराठी |

Janani Surksha Yojana 2024
maharashtra scheme for pregnanta laides
maha govt scheme
pradhanmantri matrutv vandana yojana
janani suraksha yojana marathi

Janani Suraksha Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, आपल्या देशात केंद्र शासनाकडून नागरिकांच्या विकासाचे योजनाच्या माध्यमातून कल्याणकारी व विकासाच्या योजनांची अमलबजावणी केली जात असते. या योजना केंद्र व राज्य सरकार मार्फत राबवल्या जात असतात.
समाजातील नवजात बालकापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घटकांचे या योजनांमध्ये समावेश केलेला असतो, प्रत्येक घटक हा केंद्रस्थानी ठेवून या योजनांची आखणी होत असते.
समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास, अनुसूचित जाती – जमाती, गरीब कष्टकरी शेतकरी, बांधकाम मजूर, स्त्रिया, मुली व  नवजत बालके या  सर्वांच आर्थिक व सामाजिक विकास करणे. केंद्र व राज्यशास्त्र मार्फत या योजना सुरू करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश असतो.

आज आपण केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्याच्या एक योजनाची माहिती पाहणार आहोत. त्या योजनेचे नाव आहे ” जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र “ होय.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात राहणाऱ्या अनुसूचित जाती – जमाती, मागास प्रवर्ग, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला व त्यांच्या बालकांना सकस आहार घ्यावा, यासाठी राज्य शासनामार्फत सहा हजार रुपये दिले जाते.
महिला हि गर्भवती असताना त्यांना डॉक्टर फी, दवाखाना, गोळ्यांचा खर्च तसेच येण्या – जाण्याचा खर्च या सर्व गोष्टीसाठी अतिशय खर्च होतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी महिला व त्यांच्या बालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यातून काही वेळेस माता व  बालकांचा मृत्यू देखील होतो. हे सर्वच कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशात जननी सुरक्षा योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या योजनेसाठी सरकार दरवर्षीय 1600 रुपयांचे बजेट जाहीर करते.
नवीन जन्माला आलेले बाळ फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतो. त्याला आईच्या दुधापासून पोषक आहार मिळत असतो. पण आर्थिक  दृष्ट्या हलाखीचे, गरीबीचे जीवन जगत असताना, कुटुंबामध्ये मातेला पोषक आहार देणे शक्य होत नाही. त्याचा परिणाम म्हणून बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ते बाल कुपोषित जन्माला येते.
ह्या सर्व गोष्टी विचारात घेता केंद्र सरकारने महिलांचा विचार करून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या लाभ फक्त दुसऱ्या प्रसूती[पर्यंतच दिला जातो.

Janani Suraksha Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग याबाबतच्या योजना ची माहिती आपण रोजच घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एका नावीन्यपूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत. ती योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना होय.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात अथवा आसपासच्या परिसरात ज्या कोणी गर्भवती स्त्रिया असतील, त्यांनाही या योजनेचे माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त प्रमाणात समाजातील स्त्रियांना शेअर करा. त्यामुळे समाजातील महिलांना मदत मिळेल. ही विनंती.

योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना मराठी 
लाभार्थीराज्यातील गर्भवती महिला
लाभ6000 रुपयांची आर्थिक मदत
उद्देशगर्भवती महिलांना पोषक आहार देणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन

 

हे देखील वाचा –

Good News | ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र | Tractor Anudan Yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज |

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मराठी | NEW | Acharya Jambhekar Patrkar Sanman Yojana 2024 | मिळणार आर्थिक सहाय्य |

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजना मराठीचे उद्देश |

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच कुटुंबातील महिलांना सकस पोषक आहार मिळावा, या उद्देशाने जननी सुरक्षा योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यात या योजनेमुळे गर्भवती महिला व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
  • या योजनेच्या सहाय्यामुळे राज्यातील जन्माला येणारी नवजात बालके सदृढ व पोषित जन्माला येतील.
  • जननी सुरक्षा योजनेतील लाभांमुळे महिलांचे घरी प्रसूती होण्याचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे संभाव्य धोके टाळता येतील.
  • या योजनेतील साहाय्यामुळे कुटुंबात गर्भवती महिलांची काळजी घेतली जाईल.
  • राज्यात या योजनेमुळे गर्भवती महिला व नवजात बालके सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होणार आहे.
  • नवजात बालकांना पुरेसे पोषण व पौष्टिक आहार या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल.
  • राज्यातील गर्भवती महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यातील गर्भवती महिला व नवजात बालके यांची काळजी या योजनेच्या माध्यमातून घेतली जाते.

 

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजना मराठीची वैशिष्ट्ये |

  • राज्यात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत जननी सुरक्षा योजनेचे सुरुवात करण्यात आली.
  • देशातील गर्भवती महिलांचा तसेच बालकांचा मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • राज्यात सर्व जाती धर्मातील व प्रवर्गातील गर्भवती महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
  • गर्भवती महिलांचा सामाजिक आर्थिक विकास करून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • जननी सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निम शासकीय दवाखाने व शासनाने निर्धारित केलेले खाजगी दवाखाने यांचा समावेश केलेला आहे.
  • जननी सुरक्षा योजनेसाठी शासनाकडून 1600 कोटी रुपयांचे बजेट दरवर्षी सादर करण्यात येते.
  • जननी सुरक्षा योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे राज्यातील गर्भवती स्त्रियांना अर्ज करताना कोणतेही अडचण येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट गर्भवती महिलांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा करण्यात येते.

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजनेसाठी माता व नवजात बालके यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य |

  1. ग्रामीण भागातील गर्भवती महिलेची शासकीय, निम शासकीय दवाखान्यात प्रसूती झाल्यास तिला प्रसूती झाल्याच्या 7  दिवसाच्य आत 700 रुपये इतकी रक्कम DBT मार्फत बँक खात्यात जमा केली जाते.
  2. शहरी भागातील गर्भवती मातेची जर शासकीय/ निमशासकीय आरोग्य विभागात प्रसूती झाल्यास तिला प्रसूती झाल्याच्या 7 दिवसाच्या आत 600 रुपये दिली जाते.
  3. शहरी व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब व दारिद्ररेषेखालील कुटुंबातील महिलेची घरी प्रसूती झाल्यास तिला 7 दिवसाच्या आत 500 रुपये इतकी रक्कम दिली जाते.
  4. सिझेरीयन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत 1500/- रुपये इतकी रक्कम दिली जाते.
  5. तसेच या योजने मध्ये नोंदणी झालेल्या महिलेस 5 वर्षा पर्यंत सर्व लाचीकार्नाचे संदेश दिले जातात.
  6. तसेच सर्व लसी बालक 5 वर्षाचे होईपर्यंत सरकारी रुग्णालयात मोफत दिल्या जातात.

 

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजना मराठी अंतर्गत लाभार्थी |

जननी सुरक्षा योजने अंतर्गत देशातील व राज्यातील सर्व जाती धर्मातील गर्भावाती महिला पात्र आहेत.

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजना मराठीचे फायदे |

  • राज्यातील सर्व गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजने अंतर्गत पहिल्या प्रसूतीसाठी 6000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • या योजनेतील आर्थिक सहाय्यामुळे गर्भवती महिलांना पोषक व सकस आहार मिळेल.
  • जननी सुरक्षा योजनेमुळे बालक व माता सद्रुड होतील, त्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
  • या योजनेमुळे राज्यातील कुपोषणाचा दर कमी होण्यास मदत मिळेल.
  • राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास घडून येईल.
  • या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळाल्याने गर्भवती महिलांना पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

 

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत आवश्यक पात्रता |

जननी सुरक्षा योजना हि संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे त्या महिलेने आपापल्या राज्यात अर्ज करणे गरजेचे आहे.

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत नियम व आटी |

  • जननी सुरक्षा योजना अंतर्गत अर्जदार गर्भवती महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 18 च्या आतील महिलेस या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ दोन अपत्या पर्यंतच मर्यादित राहील.
  • तिसऱ्या आपत्यासाठी या योजनेचा लाभ दिला जात नाही, परंतु त्यानंतर जर ती महिला ऑपरेशन करणार असेल, तर तिसऱ्या अपत्याला ही लाभ दिला जाईल.
  • या योजनेचा लाभ शासकीय, निमशासकीय रुग्णालय तसेच शासनाने ठरवून दिलेल्या खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यासच मिळेल, अन्यथा कोणत्याही इतर रुग्णालयात या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • तसेच प्रसूतीदरम्यान जन्माला आलेले नवजात बालक दगावल्यास जननी सुरक्षा योजनेचा लाभ त्या महिलेस मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या नावाने बँक खाते असणे गरजेचे आहे.

 

Janani Suraksha Yojana 2024 | राज्यातील गर्भवती स्त्रियांना सेवा देणाऱ्या संस्था |

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये शहरी व ग्रामीण अशा दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये येणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे :

  1. ग्रामीण भाग –  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये, जिल्हा उप रुग्णालये, उपकेंद्रे, जिल्हा स्त्री रुग्णालये तसेच जननी सुरक्षा योजने अंतर्गत मानांकित केलेली रुग्णालये
  2. शहरी भाग – शहरी भागासाठी नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा उप रुग्णालय, जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय तसेच या योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालय, नागरी कुटुंब कल्याण योजनेतील रुग्णालय व इतर शासकीय अनुदानित रुग्णालय

 

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत आशा सेविकांचे कार्य |

  • जननी सुरक्षा योजनेमध्ये आरोग्य सेविकांचा महत्त्वाचा व मोलाचा वाटा असतो, त्या गर्भवती महिलेचे नाव नोंदणी पासून ते त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंतचे सर्व कार्य पार पडत असतात.
  • या आरोग्य सेविका राज्यातील गर्भवती महिलांचे नाव नोंदणी करून घेतात.
  • त्यानंतर या योजनेअंतर्गत सुरक्षा कार्ड गर्भवती महिलांना दिली जातात.
  • जननी सुरक्षा योजनेचा अर्ज गर्भवती महिले कडून भरून घेणे.
  • त्या महिलेला गरोदरपणात काय काळजी घ्यावी? कोणता आहार घ्यावा ? याविषयी मार्गदर्शन करणे.
  • या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्या महिलांकडून जमा करून घेणे.
  • प्रसूती पूर्व तपासण्यांच्या तारखा देणे व त्यांना लोहयुक्त गोळ्या आरोग्य केंद्रामधून मिळवून देणे, हे काम आशा सेविका करत असतात.
  • तसेच या गर्भवती महिलांना जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात प्रसूती करण्यास प्रवृत्त करणे.
  • गर्भवती महिलांचे बँकेत खाते उघडण्यास त्यांना मदत करणे.

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत आशा सेविकांना दिली जाणारी लाभाची रक्कम |

  1. ग्रामीण भागातील महिलांना शासकीय आरोग्य केंद्र प्रसूती करण्यास प्रवृत्त केल्यास आरोग्य सेविकांना प्रती महिला  600 रुपयांचे मानधन देण्यात येते.
  2. यापैकी 300 रुपये हे प्रसूती पूर्व देण्यात येते व उर्वरित 300 रुपये हे शासकीय रुग्णात प्रसूती झाल्याचे स्पष्ट झाल्यास देण्यात येते.
  3. शहरी भागात आशा सेविकांना शासकीय रुग्णालयात प्रसूती करण्यास प्रवृत्ती केल्याबद्दल 400 रुपये मानधन देण्यात येते.
  4. त्यातील 200 रुपये प्रसूतीपूर्व व उरलेले 200  रुपये प्रसूती झाल्यानंतर देण्यात येते.

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रेशन कार्ड
  4. रहिवासी दाखला
  5. जन्माचा दाखला
  6. मोबाईल नंबर
  7. पासपोर्ट साईज फोटो
  8. ई-मेल आयडी
  9. आरोग्य केंद्राचे कार्ड

Janani Suraksha Yojana 2024 | जननी सुरक्षा योजने अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत |

  1. राज्यातील गर्भवती महिला ज्या आरोग्य केंद्रात किंवा शासकीय रुग्णालयात प्रस्तीपूर्वक तपासणी करीत आहे, त्या आरोग्य केंद्रातील आशा सेविका जननी  सुरक्षा योजनेचा फॉर्म भरून देतील.
  2. त्यामुळे गर्भवती महिलेला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
  3. अर्ज भरण्यासाठी गर्भवती महिलेला आवश्यक ती कागदपत्रे आशा सेविकाकडे ‌जमा करावी लागतील.

Janani Suraksha Yojana 2024 |

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र अधिकृत website CLICK HERE

1 thought on “जननी सुरक्षा योजना मराठी | Good News | Janani Suraksha Yojana 2024 | महिलांना मिळणार मदत |”

Leave a Comment