Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना |
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासना मार्फत शेतकऱ्याच्या हितासाठी नेहमी कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात. त्यामध्ये पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना तसेच पिक विमा योजना. या सर्व योजना आर्थिक , मागास शेतकऱ्याच्या आर्थिक कल्याणासाठी राज्य शासना कडून राबविल्या जात असतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. त्यामुळे ते दारिद्र्य रेषेखाली स्वताचे जीवन जगत असल्यामुळे त्यांना स्वताचा व कुटुंबातील सदस्याचा विमा उतरवणे तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी असमर्थ ठरतात.या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू केली.Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे स्वरूप |
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अपघात होतो. अशा वेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना एखाद्या कारणामुळे अपघात झाल्यास त्याच्याजवळ इलाज करण्यासाठी पैसे नसल्याकारणामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते व अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला जीवन जगण्यासाठी खूप साऱ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अपघात होतो व त्यांना अपंगत्व येते किंवा त्यांचा मृत्यू ओढावतो परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा एकाएकी मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते तसेच त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो.
आशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून त्या पैशाने शेतकऱ्याचे कुटुंब स्वतःचे जीवन जगू शकतील किंवा स्वतःचा एखादा लहू उद्योग सुरु करू शकतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.या योजने अंतर्गत कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई, वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | वाचकांना विनंती |
चला तर मित्रानो, आज आपण राज्य शासनाच्या या नवीन योजनेविषयी माहिती पाहूया. ती योजना म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होई. या योजनेची संपूर्ण माहिती आम्ही या लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा लेख शेअर करा. त्यामुळे त्या अपघातग्रस्त शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येईल. Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
हे देखील पहा – Mahatma Fule Jan Arogya Yojana Mharashtra 2024 | Good News | महात्मा फुले जन आरोग्य योजना |
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | New | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |
योजनेचे नाव | गोपीनाथ मुंडे अपघात विमा माहिती |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ आधिकृत website |
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | या योजना चे उद्दिष्ट |
- कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने Gopinath Munde Yojana ची सुरुवात करण्यात आली आहे.
- सामाजिक व आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्याला मजबूत करण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्याच्या जीवन शैलीत सुधार या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला स्वतःच्या उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील शेतकऱ्याच्या कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल बनविण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | या विमा योजनेची वैशिष्ट्ये |
- हि योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने खासकरून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे.
- शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या निशुल्क उपचारासाठी एक महत्वाची अशी एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीत भरण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही.
- या योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून शेतकऱ्याच्या कुटुंबाला अर्ज करताना कोणत्याही अडचणींच सामना करावा लागणार नाही.Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
- आर्थिक सहाय्य DBT च्या साहाय्याने लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केले जाते.
- या योजनेत कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील,लाभार्थीचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेमुळे सामाजिक व आर्थिक विकास होण्यास व ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
Gopinath Munde Apghat Vima Yojana चे लाभार्थी
- राज्यातील सर्व अपघातग्रस्त शेतकरी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | या योजने अंतर्गत मिळणारा लाभ |
या योजने अंतर्गत मिळण्यार्या लाभाचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.
अपघाताची बाब | या योजनेतून मिळणारी रक्कम |
अपघाती मृत्यू | 2 लाख रुपये |
अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास | 2 लाख रुपये |
अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाल्यास | 1 लाख रुपये |
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | या अंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा |
- या योजनेत महाराष्ट्र शासन विम्याची रक्कम स्वतः भरते.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यावर आर्थिक भर न पडल्याने राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेत सरकार कडून 2 लाखांचे आर्थिक सहाय्य अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला देण्यात येते. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही. Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
- शेतकऱ्याला अपंगत्व आल्यास त्याला शासनाकडून 1 लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- सदर योजना कालावधीत संपुर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी हि योजना लागू राहिल.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | आवश्यक पात्रता|
- या योजनेत अर्जदार शेतकरी आणि त्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी असणे आवश्यक आहे.
- या योजने अंतर्मगत महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | नियम व अटी |
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- फक्त शेतकरी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदार शेतकऱ्याने शासनाच्या इतर कोणत्या अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 |
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी लाभ प्रदान करण्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येमध्ये शेतकऱ्याचे ( आई-वडिल, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी, यापैकी कोणतीही एक व्यक्ती) यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल.
- सदर योजने शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघातग्रस्त विमा योजना अंतर्गत वारसदार |
या योजनेमध्ये अपघातग्रस्त शेत्काय्याच्या वारसदारांची यादी पुढीलप्रमाणे :
1) अपघातग्रस्त यांची पत्नी / स्त्रीचा पती
२ ) अविवाहित मुलगी
3) आई
4) मुलगा
5) वडिल
6) सुन
7) अन्य कायदेशीर वारसदार
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | या योजना अंतर्गत समाविष्ट अपघाती कारणे |
खाली दिलेल्या वेगवेगळ्या कारणामुळे शेतकऱ्यांना अपंगत्व किंवा मृत्यू ओढवल्यास या योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते तसेच अपघाताच्या स्वरूपानुसार विमा रक्कम मंजूर केली जाते.
- अंगावर वीज पडून मृत्यू होणे
- नैसर्गिक आपत्ती
- पूर
- सर्पदंश
- विंचू दंश
- वाहन अपघात
- रस्त्यावरील अपघात
- विजेचा शॉक लागून मृत्यू
- रेल्वे अपघात
- पाण्यात बुडून मृत्यू
- जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- नक्षलवाद्यांकडून हत्या
- हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.
- दंगल
वर दिलेल्या कारणांमुळे शेतकर्यांना अपंगत्व किंवा मुर्त्यू ओढावल्यस २ लाखापर्यंत मदत या योजने अंतर्गत केली जाते.
Gopinath Munde Apghat Vima Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- 7/12 उतारा
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते
- बँकेचे नाव
- बचत खाते क्रमांक
- शाखा
- शिधापत्रिका
- एफ आय आर
- एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
- अकस्मात मृत्यूची खबर
- पंचनामा रिपोर्ट
- वाहन चालविण्याचा वैध परवाना
- मृत्यू दाखला
- अपंगत्वाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- वयाचा दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
- अपघात घटनास्थळ पंचनामा
- पोष्ठ मार्टेम रिपोर्ट
- वारासदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
- कृषी अधिकारी पत्र
- औषधोपचाराचे कागदपत्र
- डिस्चार्ज कार्ड