Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | मागेल त्याला शेततळे योजना |
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रानो, राज्यामध्ये शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे. बहुतांश नागरिकांचे कुटुंबाचे जीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून असते.पण राज्यातील पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित आहे. परंतु काही ठिकाणी नागरिकांची शेती हि फक्त पावसाच्या पाण्यावर आवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याला उन्हाळ्यात कायमस्वरूपी पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. या सर्वांचा परिणाम शेती व्यवसायावर होवून शेतकर्याचे नुकसान होते. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती खालावते.
या सर्व अडचणीवर मत करण्यासाठी शेततळे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ” मागेल त्याला शेततळे योजना ” सुरु केली आहे. आणि तसेच महाराष्ट्र जलसंधारण मंडळासाठी 10000 कोटींची तरतूद करण्यात आली .
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | शेततळे योजनेचे स्वरूप |
मित्रानो, महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये ‘मागेल त्याला विहीर, पाईपलाईन अनुदान योजना, सौर उर्जा पंप योजना ‘ याप्रमाणे विविध योजना राबविल्या आहेत.त्याचप्रमाणे “मागेल त्याला शेततळे योजना” शासन राबवीत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे देण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल. या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आले आहे. तर इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे, हा योजनेमागचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे शेततळे ही योजना शेतकऱ्यास एक महत्वपूर्ण योजना ठरणार आहे.
Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 | New | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |
योजनेचे नाव | ” मागेल त्याला शेततळे योजना “2024 |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र 9 फेबु 2016 |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्देश्य | शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहय्य करणे |
लाभ | 50 हजार रुपये |
विभाग | नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन |
officail वेबसाईट | अधिकृत website |
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | शेततळे योजनेचे उद्दिष्टे |
Kishori Shakti Yojana Maharashtra 2024 | New | किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात तळे खोदण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे.
- शेततळ्यातून शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता करून देणे.
- शेती पिकाचे पाण्याविना होणारे नुकसान टाळणे व शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे.
- कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र ओलीत खाली आणणे.
- जलसिंचनाची उप्लाबाध्ता झाल्याने उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल.
- महाराष्ट्र राज्यातील राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित व प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करून त्यांचे राहणीमान सुधारणे.
- पाण्याच्या टंचाई मुळे होणारे शेती पिकाचे नुकसान टाळणे ,हा या योजनेमागचा उद्देश आहे.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 |अनुज्ञेय आकारमान व अनुदान |
मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत सात प्रकारची शेततळे समाविष्ट आहेत. त्यामधील पुढीलप्रमाणे एक निवडणे महत्त्वाचे असते.
- या योजनेमध्ये सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे 30 x 30 x 3 मीटर असून सर्वात कमी आकारमानाचे शेततळे 15 x 15 x 3 मीटर आहे.
- 30 x 30 x 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके अनुदान निश्चित करण्यात आहे. तर 20 x 15 x 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी अनुदानाची रक्कम ₹30,000 आहे. 15 x 15 x 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी अनुदानाची रक्कम ₹22,500 आहे.
- या योजने अंतर्गत इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील, 50,000/- रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना स्वतः खर्च करावी लागेल.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | या योजनेचे फायदे |
- ज्या भागातील शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
- या योजनेमुळे पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही. शेततळ्यामुळे सिंचन करणे शक्य होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान होणार नाही. परिणामी पिकाच्या उत्पादनात वाढ होवून आर्थिक नफा वाढेल.
- या योजनेमुळे शेती पिकाचे नुकसान टाळल्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
- मागेल त्याला शेततळे योजनेचे मध्ये मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या DBT मार्फत बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | नियम व आटी |
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- कृषी विभागाचे अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी, निश्चित केलेल्या आकारमानानुसार शेततळे बांधणे बंधनकारक राहील.
- शेततळे मंजुरीचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम हे तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असेल.
- या योजनेचा लाभ घेण्शेयासाठी तकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक असेल.
- या योजने अंतर्गत शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जात नाही.
- या योजने मध्ये शेततळ्याच्या दुरस्तीची आणि निगा राखण्याची जवाबदारी संबधित लाभार्थी शेतकऱ्यांची राहील.
- पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, याची दक्षता या योजने अंतर्गत शेतकऱ्यावर दिली आहे.
- शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असेल.
- या योजने अंतर्गत शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावी.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसानभरपाई अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | शेततळे योजनेसाठी पात्रता |
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेची मर्यादा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे.
- शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 60 हेक्टर जमीन असावी.
- शेतकऱ्याने यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा विहीर या घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 उतारा व ८–अ प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
- प्रतिज्ञा पत्र (स्वतःच्या स्वाक्षरी सहित)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
मागेल त्याला शेततळे योजनेची अंमलबजावणी :
जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती, या योजनेवर देखरेख करेल. योजना अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देयील.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | जागा निवडीचे निकष |
- शेततळे बांधण्यास्ठी ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.
- काळी जमीन ज्यामध्ये चिकनमातीचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी शेततळयास योग्य असल्याने अशा जमिनीची निवड करण्यात यावी.
- शेततळ्यासाठी मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक अशी जमीन असलेली जागा निवडू नये.
- या योजने अंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावातील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावीत. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय अटी व शर्ती लागू राहतील.
- या योजनेनुसार ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारण तीन टक्क्याच्या आत आहे, त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत.
- नाल्याच्या किंवा ओहाळाच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
- भोवतालच्या जमिनीत दलदल व चिखल होईल तसेच शेततळे व त्यातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमीन शेततळ्यासाठी निवडण्यात येऊ नये.
- शेततळ्याला लागणारी जागा हि शेतकऱ्यांनी स्वखुषीने व विनामूल्य देणे बंधनकारक आहे.
Magel Tyala Shettale Yojana Maharashtra 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- शेतकऱ्यांना शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल.
- आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी झाल्यानंतर आपले युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
- होम पेज उघडेल या होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’’ या पर्यायावर क्लिक करावे.
- यानंतर अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत आवश्यकता ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर submit वर click करावे.
- अशा प्रकारे मागेल त्याला शेततळे योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.