महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |

Table of Contents

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजना |

Free Tablet Yojana Maharashtra 2024
mahajyoti free tablet yojana
free tablet yojana marathi
mahajyoti tablet yojana onlain form
maha shasan yojana

Free Tablet Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रानो, केंद्रशासन विविध राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्याचप्रमाणे राज्य शासन हे राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत असते. याचे योजनांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन समाजातील प्रत्येकासाठी प्रयत्नशील असते.
राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवतात. त्यामध्ये स्कॉलरशिप योजना, शिष्यवृत्ती योजना, सायकल वाटप योजना तसेच वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजना अशा विविध योजना शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबवल्या जातात.
त्याचप्रमाणे राज्य शासनाने दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एका नवीन योजनेची सुरुवात केली आहे. ती म्हणजे ” महा ज्योती फ्री टॅबलेट योजना “ होय
या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना दहावी पास नंतर फ्री टॅबलेट वाटप केले जाते. तसेच त्यासाठी 6 जीबी इंटरनेट सुविधाही दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे सोयीचे होते.
राज्यातील ग्रामीण भागात बहुतेक कुटुंब दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांचे दहावीपर्यंत शिक्षण कसे तरी पूर्ण करतात. पण तिथून पुढे मेडिकल/ इंजिनिअरिंग/ वैद्यकीय या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE / NEET / MHCET यासारख्या परीक्षा द्याव्या लागतात.
पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीचे असल्याने ते पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरतात व पालकांन कडे भरण्यासाठी तेवडे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे मुले गुणवंत असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना कोचिंग क्लासेस ही करता येत नाहीत, पण त्याची अत्यंत गरज असते व ते त्यांच्या कुटुंबांना परवडण्यासारखे नसते. त्यामुळे मुले इच्छा असून देखील या शिक्षणासाठी जाऊ शकत नाही.
राज्यातील विद्यार्थी पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास अडथळा येऊ नये. या सर्व गोष्टींचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग / मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
आजचे योग्य डिजिटलकरनाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही संगणकावर अवलंबून झालेले आहे. उच्च शिक्षणात तर याचा सर्वात मोलाचा वाटा आहे आणि जर तेच नसेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या ऑनलाईन पुस्तकांचा व शिक्षण उपयोगी इतर वस्तूंचा लाभ घेणे शक्य होत नाही. त्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या योजने मुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करता येणार आहे. हा महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचा मुख्य उद्देश आहे. टॅबलेट मुले विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घरत येणार आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेची आपण माहिती घेतली आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्र या सर्वांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आज आपण महाज्योती फ्री टॅबलेट योजना या योजनेची माहिती घेणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी अकरावी सायन्सला ऍडमिशन घेतलेले असतील. त्यांना या योजनेची माहिती द्या. त्यासाठी हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना या योजनेची योजनेचा फायदा घेता येईल व आपल्या उच्च शिक्षणाची वाटचाल सुरू करता येईल, ही विनंती.

योजनेचे नाव महाज्योती फ्री टॅबलेट योजना 
योजनेची सुरुवातमहाज्योती संस्था
विभागशिक्षण विभाग, महाराष्ट्र
लाभार्थी10 वी उत्तीर्ण सर्व विध्यार्थी
लाभअभ्यासासाठी फ्री टॅबलेट देणे
उद्देशविध्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

हे देखील वाचा –

जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

गटई स्टॉल योजना मराठी | Good News | Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल |

चंदन कन्या योजना मराठी माहिती | New | Chandan Kanya Yojana Maharashtra 2024 | मुलींच्या भविष्यासाठी चंदन लागवाढ |

Good News | संजय गांधी निराधार अनुदान योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 | Good News | मानधनात वाढ, नोंदणी सुरु |

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच उद्देश |

  •  दहावी पास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने, राज्यात महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग क्लास करता येणार आहेत.
  • महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे मेडिकल / इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेण्यासाठी पूर्वतयारी करता येणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थी स्वावलंबी होऊन आत्मविश्वासाने शिक्षण घेतील.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांची जीवनमान उंचावेल.
  • महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाठबळ मिळेल.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना JEE / NEET / MHCET  या परीक्षांची तयारी करणे शक्य होईल.
  • या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिल्याने त्यांना पैशासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच कोणाकडून कर्जही काढून शिक्षण घ्यावे लागणार नाही.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची वैशिष्ट्ये |

  • राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी ऑनलाईन क्लास पूर्ण करता यावेत, यासाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • इयत्ता 11 सायन्सला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
  • या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
  • महाज्योती  फ्री टॅबलेट योजनेसाठी विद्यार्थी घरी बसून मोबाईलवर अर्ज भरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला अर्ज भरल्यापासून ते लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती कळते.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ राज्यातील तीस लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
  • हि सर्व प्रोसेस ऑनलाइन केल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळ व पैशाची बचत होईल.
  • महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही प्रोसेसिंग शुल्क भरावे लागत नाही.
  • महा ज्योती टॅबलेट योजनेचा लाभ राज्यातील मुलांना तसेच मुलींनाही दिला जातो.
  • या योजनेचा लाभ राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.
  • राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात खंड पडू नये, म्हणून सहा जीबी इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.

 

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावी पास झालेले इतर मागास प्रवर्ग ( OBC ), VJNT , SBC  इत्यादी प्रवर्गातील इयत्ता अकरावीला सायन्सला प्रवेश घेतलेली विद्यार्थी या योजनेसाठी लाभार्थी आहेत.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक गुण |

महाराष्ट्र राज्यात महत्मा ज्योतिबा फुले शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नागपूर यांचेकडून दर वर्षी 10 उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना राबविण्यात येते. त्यासाठी आवश्यक गुण मर्यादा पुढीलप्रमाणे :

  1. शहरी भाग – 70 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत.
  2. ग्रामीण भाग – 60 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजने अंतर्गत दिला जाणारा लाभ |

आर्थिक दृष्ट्या गरीब मागासवर्गीय कुटुंबातील दहावी पास विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट व 6 जीबी इंटरनेट सुविधा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाते.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजने फायदे |

  •  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी कोचिंग क्लासेस करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फ्री टॅबलेट दिले जाते.
  • ऑनलाइन शिक्षण पूर्ण करता येता येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रति दिवस सहा जीबी इंटरनेट फ्री मध्ये उपलब्ध करून दिले जाते.
  • तसेच टॅबलेट मध्ये ऑनलाईन पुस्तके अपलोड करता येतात.
  • कोचिंग क्लासेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोठेही पायपीट करावे लागणार नाही.
  • टॅबलेट मुळे विद्यार्थी ऑनलाइन क्लास करून, इतरही शैक्षणिक साहित्य अपलोड करून स्वतःचा विकास करून सक्षम होतील.
  • ऑनलाइन सुविधेमुळे विद्यार्थी डिजिटलकारणाचा  भाग होऊन स्वतंत्र बनतील.
  • या योजनेमुळे विद्यार्थी स्वतःचा शैक्षणिक विकास करून स्वावलंबी बनतील.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शहरी व ग्रामीण भागातील, कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिले जाते.
  •  या योजनेमुळे विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करतील, त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक होण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्याकडे वाटचाल होईल.
  • ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • या योजनेमुळे मुलांना अर्धवट शिक्षण सोडावे लागणार नाही.
  • या योजनेतील लाभांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

 

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • अर्जदार विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असून त्याने इयत्ता अकरावी सायन्सला प्रवेश घेतलेला असावा.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या नियम व आटी |

  1. महा ज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही.
  2. या योजनेअंतर्गत राज्यातील दहावी उत्तीर्ण मुले तसेच मुलींनाही लाभ दिला जातो.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता दहावी मध्ये 70 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
  4. ग्रामीण भागासाठी ही आट शिथिल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण असावे.
  5. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असावा.
  6. अर्जदार विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही योजनेअंतर्गत टॅबलेट योजनेचा लाभ मिळवला असेल, तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  7. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची आई किंवा वडील शासकीय नोकरीत कार्यरत असेल, तर त्या न्याय योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  8. या योजनेअंतर्गत दिला जाणारा टॅबलेट ला एक वर्षाचे वारंटी दिली जाते. त्यानंतर तो खराब झाल्यास, बिघडल्यास त्याच्या सर्व खर्च स्वतः लाभार्थीला करावा लागेल.
  9. या योजनेअंतर्गत लाभ मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण सोडले तर त्याच्याकडून टॅबलेट परत घेतला जाईल.
  10. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 6 जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही लाभ दिला जाणार नाही.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी पुढील प्रवर्गातून विध्यार्थी अर्ज करू शकतात |

  1. OBC ( इ मा व )
  2. VJNT ( वि जा भ ज )
  3. SBC ( वि मा प्र )

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • दहावी उत्तीर्ण चे मार्कशीट
  • अकरावीला प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र
  • नॉन क्रिमिनल
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला

Free Tablet Yojana Maharashtra 2024 | महाज्योती फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  • आपणाला प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • home page  वर गेल्यानंतर JEE / NEET / MHCET  या पर्याय खाली रजिस्ट्रेशन  या option वर click करावे.
  • आता तुमच्यासमोर एक page open होईल, त्यामध्ये आवश्यक सर्व माहिती भरावी.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर apload  वर click करावे.
  • अपलोड वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये सर्व माहिती भरावी.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यानंतर submit  बटनावर click करावे.
  • अशाप्रकारे तुमची महा ज्योती फ्री टॅबलेट योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • अर्ज केल्यानंतर थोड्या दिवसांनी या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर संपर्क करण्यात येईल.

Free Tablet Yojana Maharashtra 2024 |

महा ज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र अधिकृत website CLICK HERE

1 thought on “महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |”

Leave a Comment