शेतकऱ्यांसाठी खास ओळखपत्र |
Farmer digital identity card in India
Farmer digital ID card
Digital ID card for government
Krushi scheme for government
Farmer digital id card marathi
नमस्कार, Farmer digital identity card in India भारत कृषीप्रधान देश आहे, अशीच भारताची खरी ओळख आहे. कारण आजही 60 % लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते. शेती हाच यांचा पाया आहे. म्हणून ही शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असते. राज्य सरकार सोबत अनेक अनुदान योजना राबविण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी, पी एम किसान योजनांसह इतर अनेक योजनांसाठी अनुदान देण्याची प्रक्रिया गेल्या पाच वर्षात राबवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी आता मोदी सरकारकडून नवीन वर्षात आणखी गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे. देशातील शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणेच एक बारा अंकाचा एक खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यात येणार आहे.
शेतकर्यांना देण्यात येणारे नक्की काय आहे ? हे डिजिटल आयडी कार्ड, याचा फायदा काय ? त्याचा वापर कशासाठी केला जाणार ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट | लाडकी बहीण योजनेतील ” हमीपत्र ” ची पडताळणी सुरू |
शेतकरी डिजिटल आयडि नक्की काय आहे ?
शेतकरी डिजिटल आयडी कार्ड बारा अंकाची खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. हे आयडी शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल. शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज व सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी या कार्डचा उपयोग पडेल. शासनामार्फतच्या लाभाचे थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकता येईल, शेतकरी योजना, अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आयडी कार्ड महत्त्वाचे ठरेल. Farmer digital identity card in India
या कार्डचा कसा उपयोग होणार |
तर मित्रांनो, केंद्रमार्फत राबविण्यात येणाऱ्या पीएम किसान योजना, पिक विमा योजना. माती परीक्षण, माती आरोग्य कार्ड यासारख्या विविध योजनांचा फायदा एका आयडी कार्ड माध्यमातून शेतकऱ्यांना घेता येणार आहे आणि शेतकरी योजनांचा लाभ या आयडी कार्ड मार्फत सहज मिळू शकतील. या माध्यमातून प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी डिजिटल डेटा तयार असेल, त्याने वर्षभर घेतलेल्या योजनांचा फायदा, त्याला देण्यात येणारे अनुदान व इतर सर्व माहिती एका क्लिकवर सरकारकडे उपलब्ध होईल.
तुमचं आधार कार्ड हरवले आहे का ? मग या टिप्स फॉलो करा | मीळेल नवीन आधार कार्ड |
शेतकऱ्याला कृषी कर्ज योजना आणि आर्थिक मदत शिवाय सर्व योजनांचा फायदा या कार्डद्वारे घेता येईल. तसेच देशातील शेतकऱ्यांच्या संख्येच्या आकडा शासनाकडे उपलब्ध असेल, त्यावरून सरकारला योजना ची सुरुवात करण्यासाठी चा मोठा डेटा उपलब्ध होईल. कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, कोणते शेतकरी अल्पभूधारक आहेत, बागायती क्षेत्र किती आहे ? जिरायती क्षेत्र किती याची आकडेवारी समोर येईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी हि आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कशी आणि कुठे केली जाणार नोंदणी ?
कृषी मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांचे आयडी कार्ड तयार करण्यासाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. प्रत्येक भागात शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक शिबिरासाठी पंधरा हजार रुपयांच्या अनुदान देणार आहे.