Anganwadi Paryavekshak Bharti 2024 |
नमस्कार, राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या महिला नोकरी करण्यासाठी इच्छुक व पात्र आहेत, अशा महिलांसाठी एक महत्वपूर्ण बातम्या आलेली आहे. महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राज्यात मुख्य सेविका गट क संवर्गातील सरळ सेवा अंतर्गत एकूण 102 पदांसाठी हि भरती निघालेली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच महिला अर्ज करू शकतात. या महिलांच्या पात्रतेबाबत ची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरण्यात येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठीची ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी पात्रता काय असणार आहे ? कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ? अर्ज कसा करायचा आहे ? त्यासाठी आवश्यक असणारी परीक्षा शुल्क किती आहे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
महिला व बालविकास विभाग भरती |
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी 102 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये पदवीधर महिला या ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज करू शकतात.
येणाऱ्या अर्जांमधून सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून या महिलांची निवड केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात व अर्जाची अंतिम तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
5500 हजार रुपये, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | संपूर्ण माहिती |
अंगणवाडी पर्यवेक्षक आवश्यक पात्रता |
- अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
- अर्जदार महिलेने पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.
- अर्जदार महिलेची वय 21 वर्षे 38 वर्ष यादरम्यान असावे, आरक्षित प्रवर्गानुसार कमी जास्त असू शकते.
- अर्जदार महिला मराठी भाषेत ज्ञान अवगत असणारी असावी.
Anganwadi Paryavekshak Bharti | आवश्यक कागदपत्रे |
- शैक्षणिक कागदपत्रे
- वयाचा दाखला
- आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- अपंग असल्याचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र
- संगणक / एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- अर्जामध्ये नमूद केलेल्या नावाचा पुरावा
‘या ‘ तारखेला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | 5500/- रु. होणार खात्यावर जमा |
अंगणवाडी पर्यवेक्षक भारती अर्ज शुल्क |
महिला व बालविकास विभाग अंतर्गत भरण्यात येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे, ते परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 हजार रुपये तर राखीव आरक्षित प्रवर्गासाठी 900 रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या तारखा |
ऑनलाइन अर्ज सादर करणे ही प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होत आहे, तर 3 नोव्हेंबरला रात्री 11:55 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
How To Apply Anganwadi Paryavekshak Bharti |
- सर्वात प्रथम अर्ज करण्यासाठी आपणाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, आरक्षण याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे.
- त्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
- शेवटी तुम्हाला अर्जंट सबमिट करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. ते तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, यूपीआय क्रेडिट कार्ड याच्या माध्यमातून भरू शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी आपला अर्ज यशस्वीरित्या भरू शकतात.
1 thought on “Anganwadi Paryavekshak Bharti 2024 | अंगणवाडी पर्यवेक्षक भरती झाली सुरू | पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया | संपूर्ण माहिती”