Online Marriage Certificate | विवाह प्रमाणपत्र नोंदणी |
Online Marriage Certificate
नमस्कार मित्रांनो, आपल्या राज्यात शहरी व ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात, वाड्यावर या दरवर्षी असंख्य प्रमाणात विवाह होत असतात. परंतु ग्रामीण भागात पाहिले तर विवाह तर होतो. परंतु त्या विवाहाची नोंद केली जात नाही. ज्यामुळे त्या वधू-वरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्याचा मोठा परिणाम त्यांना भविष्यात भोगाव लागतो.
विवाह झाल्यानंतर प्रत्येकाला विवाह नोंदणी किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे घ्यावे लागते. परंतु खेड्यात या गोष्टींकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. विवाह नोंदणी प्रमाणपत्राची काय गरज ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. तर आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी.
तसेच मॅरेज सर्टिफिकेट हे लग्न बंधनाचे सरकारी व अधिकृत प्रमाण असते. त्याचा वापर लग्न झाले आहे. असे दाखवण्यासाठी अधिकृतपणे करू शकतो. Online Marriage Certificate
हे मॅरेज सर्टिफिकेट कुठे मिळते ? त्यासाठी अर्ज कसा करायचा ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? पात्रता काय ? या सर्वांची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Online Marriage Certificate : विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे काय ?
एखाद्या जोडप्याने लग्न केल्यानंतर त्याची झालेली कायदेशीर नोंद आणि ती नोंद केल्यानंतर जे सर्टिफिकेट देतात, त्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट असे म्हणतात. मॅरेज सर्टिफिकेट हा एक लग्नाचा पुरावा असतो. तोही कागदपत्रे पुरावा असतो. लग्ना ज्या शहरात किंवा गावात होते, तेथील ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका येथे या लग्नाची नोंद केलेली असते. Online Marriage Certificate
मॅरेज सर्टिफिकेट मुळे आपण मुलीचे लग्नानंतर तिच्या वडिलांचे नाव काढून नवऱ्याचे लावण्यासाठी वापरता येते. त्यासाठी पुरावा म्हणून हे ग्राह्य धरले जाते.
हे पण वाचा –
E – pik pahani 2024 | ई पिक पाहणी ( DSC ) वर्जन 3 | अशी करा मोबाईल वरून ई पिक पाहणी |
Document for Online marriage certificate | आवश्यक कागदपत्रे |
- वधू आणि वराचे फोटो
- वधू-वराचे आधार कार्ड चे झेरॉक्स
- वधू आणि वराचे शाळेच्या दाखल्याचे झेरॉक्स
- लग्नात उपस्थित असलेल्या तीन साक्षीदार व त्यांचे तीन फोटो आणि आधार कार्ड ची झेरॉक्स
- लग्न पत्रिका
- लग्नाचा ब्राह्मणासोबतचा एक फोटो
- ब्राह्मणाची नावासह माहिती Online Marriage Certificate
- विवाह नोंदणी फॉर्म
Marriage certificate fee | विवाह नोंदणीसाठी किती पैसे द्यावे लागतात ?
मित्रांनो, जर तुम्ही लग्न झाल्यानंतर एक-दोन-चार महिन्याच्या आत जर विवाह नोंदणीसाठी अर्ज करत असाल, तर तुम्हाला विवाह नोंदणी सर्टिफिकेट साठी कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. परंतु जर का तुम्ही लग्न झाल्यानंतर एक वर्षानंतर, विवाह नोंदणी करायला गेलात, तर तुम्हाला मात्र फी द्यावी लागते. Online Marriage Certificate
विवाह नोंदणीसाठी पात्रता काय ? Qulification for marriage certificate |
- कायद्यानुसार वधू चे वय किमान 18 वर्षे पूर्ण असायला हवे, व वराचे वय हे 21 वर्ष पूर्ण पाहिजे.
- वधू आणि वर हे महाराष्ट्र किंवा भारतातील मूळ रहिवाशी असायला हवेत.
- वधू-वरा वरांकडे सर्व कागदपत्रे असायला हवेत.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढण्यासाठी कमीत कमी तीन साक्षीदार पाहिजेत.
Apply For Online Marriage Certificate | ऑफलाईन अर्ज प्रक्रिया |
- मित्रांनो, मॅरेज सर्टिफिकेट हे दोन प्रकारे काढता येते.
- तुमचा विवाह जर ग्रामीण भागात झाला असून व तुम्ही जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल, तर तुम्हाला तुमचे मॅरेज सर्टिफिकेट हे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये दिले जाते.
- आणि तुमचा विवाह जर शहरी भागात झाला असेल किंवा तुम्ही मूळ शहरांमधील रहिवासी असाल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे विवाह आणि प्रमाणपत्र जवळच्या सरकारी दवाखान्यात किंवा नागरी सुविधा केंद्रामध्ये काढून मिळेल.
- जर तुमचा विवाह एखाद्या मंदिरामध्ये किंवा ट्रस्टमार्फत झाला असेल, तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र हे त्या ट्रस्टमार्फत देखील दिले जाऊ शकते.
त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असायला हवीत. Online Marriage Certificate
Marriage certificate apply online | ऑनलाईन अर्ज प्रक्रिया |
मित्रांनो, जर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने काढायचे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या aaple Sarkar. Maha. Online. gov. in या संकेतस्थळावरती जाऊन वरील सर्व कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढता येईल.
1 thought on “Online Marriage Certificate 2024 | विवाह प्रमाणपत्र नोंदणी | असे काढा ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट |”