Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजना मराठी |
Education Loan In Maharashtra 2024 |
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनामार्फत देशातील गोरगरीब जनतेसाठी कल्याणकारी योजनांचे अंमलबजावणी केली जात असते. या कल्याणकारी योजनांना आर्थिक सहाय्य पुरवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची असते. त्यामुळे या योजनाची कार्यवाही पूर्ण होण्यास मदत होते.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून सतत प्रयत्न केले जात असतात. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या जातात. त्या योजना म्हणजे मोफत सायकल वाटप योजना, शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना आणि शैक्षणिक कर्ज योजना, बेरोजगार भत्ता योजना अशा विविध योजना असतात.
राज्य शासनामार्फत चालवण्यात येणाऱ्या अशाच एका नावीन्यपूर्ण योजनेचे आज आपण माहिती घेत आहोत. ती योजना म्हणजे ” शैक्षणिक कर्ज योजना महाराष्ट्र “ होय. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब, मागास प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती – जमातीतील विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत 1.5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच गरीब कुटुंबातील लोक आपल्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास असमर्थ्य ठरतात. ते अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतात. त्यामुळे ते आपल्या कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी असमर्थ होतात. कुटुंबातील मुलांना 12 वी नंतरचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यातून ते शिक्षण सोडून काम धंदा करायला लागतात. त्यामुळे या समाजातील मुले उच्च शिक्षणापासून कायम वंचित राहतात.
अशा या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात केली. राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सुटू नये, तसेच त्याच्यासाठी उच्च शिक्षणाच्या वाटा खुल्या व्हाव्यात, या उद्देशाने या शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
Education Loan In Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रांनो, राज्य शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आपण बघितल्याच आहेत. त्याचप्रमाणे आजही आपण शैक्षणिक कर्ज योजनेची माहिती या लेखातून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तुमच्या परिसरात कुणी आर्थिक दृष्ट्या गरीब, अनुसूचित जाती, जमातीतील प्रवर्गातील विद्यार्थी असतील. जे गरीब, होतकरू विद्यार्थी आहेत.जे शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच आमचा हा लेख जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.
योजनेचे नाव | शैक्षणिक कर्ज योजना मराठी |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र राज्य |
विभाग | समाज कल्याण विभाग |
उद्देश | उच्च शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना सहाय्य करणे |
लाभार्थी | अनुसूचित जातीतील विध्यार्थी |
लाभ | 1.5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन |
हे पण वाचा –
रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 | Rojgar Sangam Yojana Maharashtra | Good News| ऑनलाईन नोंदणी सुरु |
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र | Gai Gotha Anudan Yojana 2024 | Good News | ऑनलाईन अर्ज सुरु |
Kadba Kutti Machine Anudan Yojana Maharashtra | Good News | कडबाकुट्टी मशीन 100% अनुदान योजना | असा करा अर्ज |
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेचे उद्दिष्ट्ये |
- आर्थिकदृष्ट्या गरीब, मागास प्रवर्गातील, कुटुंबातील विद्यार्थी परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, या उद्देशाने शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.
- शैक्षणिक कर्ज योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध केले जाते.
- ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
- राज्यातील गरीब कुटुंबातील मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
- या योजनेच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना नोकरीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करणे.
- मागासवर्गीय कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र व स्वावलंबी बनविणे.
- शैक्षणिक कर्ज योजनेच्या माध्यमातून या मुलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेची वैशिष्ट्ये |
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी अत्यंत मापक व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही त्रास सहन करावा लागणार नाही.
- गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणाकडूनही जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागणार नाही. तसेच कोणावरही अवलंबून बसण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT मार्फत जमा केली जाते.
- शैक्षणिक कर्ज योजनेतून विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून, भविष्यात नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहतील.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभार्थी व दिला जाणारा लाभ |
- महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च शिक्षण घेणारे विध्यार्थी शैक्षणिक कर्ज योजनेचे लाभार्थी आहेत.
- शैक्षणी कर्ज योजने अंतर्गत राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विध्यार्थ्यांना अत्यंत कमी व्याज दारात 1.5 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे |
- राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांना आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला 1.5 लाख पर्यंतचे कर्ज मिळते.
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर केवळ 3 % व्याजदर आकारला जातो.
- शैक्षणिक कर्ज योजनेमार्फत विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या कोर्सचा तसेच राहण्याचा खर्च दिला जातो.
- जोपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे, तोपर्यंत त्यास या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकतो.
- शैक्षणिक कर्ज योजनेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
- या कर्ज योजनेमुळे विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडावे लागत नाही.
- या कर्ज योजनेचे कर्ज फेडण्याची मुदत जास्त दिवसाची ठेवण्यात आली आहे.
- ते म्हणजे नोकरी लागल्याच्या 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज विद्यार्थी फेडू शकतो.
- या कर्ज योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होणार आहे.
- शिक्षण कर्ज योजनेमुळे विद्यार्थी स्वावलंबी व स्वतंत्र होतील.
- शिक्षण चालू असताना विद्यार्थ्याला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागते.
- विद्यार्थ्याला राज्यातील कोणत्याही राष्ट्रीय कृत, खाजगी किंवा स्वयंसेवी संस्था अंतर्गत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत दिले जाणारे कर्ज व व्याजदर |
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. त्या दिलेल्या कर्जावर केवळ 3 % व्याजदर आकारला जातो.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेच्या आटी व नियम |
- शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही संस्थेकडून शैक्षणिक कर्ज परतफेड न केल्याचा बोजा असू नये.
- या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती – जमातील व अल्पसंख्यांक समाजातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- राज्यातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात. अशा विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे वय 18 ते 30 च्या दरम्यान असावे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असावे.
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिने ते 5 वर्षाच्या कालावधीत परत करावयाचे आहे.
- शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक कोणत्याही शासकीय नोकरीत असता कामा नयेत.
- या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्याला त्याच्या आई-वडील जामीन म्हणून राहावे लागतील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल.
- ज्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय उच्च शिक्षण अर्धवट सोडले आहे. अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- तसेच ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- 1 एप्रिल 2009 पासून शालेय शिक्षण घेत असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Education Loan In Maharashtra 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- यापूर्वी कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रमाणपत्र
- महाविद्यालयीन प्रवेश घेतल्याचे प्रवेश प्रमाणपत्र
- आधीच्या वर्षी उत्तीर्ण झालेले गुणपत्रिका
- शैक्षणिक खर्चाची आकडेवारी व अभ्यासक्रम कालावधीचा पुरावा
- चार लाखापेक्षा अधिक रक्कम हवे असल्यास हमीदराची संपूर्ण माहिती
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवाशी दाखला
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांची यादी |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
Education Loan In Maharashtra 2024 | शिक्षणासाठी कर्ज मिळणाऱ्या भारतीय अभ्यासक्रमांची यादी |
पदवी अभ्यासक्रम –
- बी ए
- बी कॉम
- बी एस सी
पदव्युत्तर अभ्यासक्रम –
- मास्टर व पी एच डी
व्यावसायिक अभ्यासक्रम –
- वैद्यकीय
- विधी
- कृषी
- अभियांत्रिकी
- संगणक
- पशुवैद्यकीय
Education Loan In Maharashtra 2024 | या योजने अंतर्गत दिल्या जाणार्या जास्तीत जास्त कर्जाची रक्कम |
विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेण्याची गरज व त्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता इत्यादी बाबी विचारात घेऊन बँकेमार्फत भारतातील शिक्षणासाठी विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दहा लाखापर्यंतचे व परदेशातील शिक्षणासाठी जास्तीत जास्त वीस लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
Education Loan In Maharashtra 2024 |
शैक्षणिक कर्ज योजना अधिकृत website click here
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत अर्ज रद्द करण्याची करणे |
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार विद्यार्थ्यावर इतर कोणत्याही शैक्षणिक कर्जाचा परत न केल्याचा बोजा असल्यास अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार विद्यार्थी हा मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेला असल्यास त्याच्या अर्ज रद्द केला जातो.
- अर्जदार विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर संस्थेचे कर्ज असल्यास अर्ज रद्द होतो.
- अर्जदार विद्यार्थ्याचे पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांचा अर्ज रद्द केला जातो.
Education Loan In Maharashtra 2024 | शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची पध्दत |
- शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोणतीच ऑनलाईन प्रोसेस नाही.
- त्यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपण राहत असलेल्या जवळच्या ठिकाणच्या बँकेत जाऊन शैक्षणिक कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा.
- अगोदर सदर बँक ही शिक्षणासाठी कर्ज देत असल्याची खात्री करून घ्यावी.
- नंतर तो अर्ज योग्य पद्धतीने भरावा व त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्यात.
- नंतर तो अर्ज बँकेत जमा करावा.
- बँक मॅनेजर सदर अर्ज व जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करेल.
- नंतर तो कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला शैक्षणिक कर्ज प्रदान करेल.
1 thought on “शैक्षणिक कर्ज योजना मराठी महाराष्ट्र | Good News | Education Loan In Maharashtra 2024 | नोंदणी सुरु |”