पी एम विश्वकर्मा योजना |
pm vishwakarma yojana
Pm scheme for government
Government scheme for Vishwakarma
Vishwakarma scheme benefits
नमस्कार, pm vishwakarma yojana केंद्रशासनामार्फत गोर-गरीब नागरिकांचा, जनतेचा विकास करण्यासाठी विविध योजना आखल्या जातात. त्याच उद्देशाने हातात कौशल्य असणाऱ्यांना रोजगार देण्यासाठी आणि पारंपारिक व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ती म्हणजे ” पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ” होय. मूर्तिकार, खेळणी तयार करणारे, लोहार तसेच पारंपारिक व्यवसायाशी सबंधित असणार्या लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत सरकारकडून नागरिकांना मोफत ट्रेनिंग दिले जाणार आहे, तर या कामाच्या बदल्यात त्यांना रोज 500 रुपये प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत अनेक असे लाभ नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? पात्रता काय असणार आहे ? संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
केंद्र शासनाच्या नवीन योजना | सर्व योजनांची माहित एका क्लिकवर | असा करा अर्ज, तुम्हाला होईल फायदा |
पी एम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक पात्रता |
- अर्जदार व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेत विश्वकर्मा समाजातील 140 जातींचा समावेश करण्यात आला आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ फक्त कारागिरांनाच दिला जातो.
- केवळ कुशल कारागीर आणि कारागीर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असू नये.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असू नये. pm vishwakarma yojana
लाडक्या बहिणींना धनलाभ देणारी आणखीन एक संधी | पी एम विमा सखी योजना | मिळणार प्रती महा 7000 रु. | असा करा अर्ज |
विश्वकर्मा योजने अंतर्गत मिळणारे लाभ |
पीएम विश्वकर्मा योजनेत सहभागी झाल्यावर अर्जदारांना मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तुम्ही स्वतःला कुशल वर्कर म्हणून तयार करता. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला दिवसाला 500 रुपये स्टायपेंड दिला जाणार आहे, त्यात इन्सेंटिव्ह ची सुविधा आहे.
या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला, लाभार्थ्याला टूलकीट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत, जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. pm vishwakarma yojana
अर्जदाराला मिळणार गॅरेंटी शिवाय लोन |
पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. त्यासाठी त्यांना स्वस्त कर व्याज दरात कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी कोणत्याही तारण कर्जाची गरज नाही. व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार केवळ 5% व्याजदरावर तीन लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. सरकार मग दिले जाणारे हे रक्कम दोन टप्प्यात, ती म्हणजे पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये कर्ज दिले जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये पर्यंत लोन उपलब्ध केले जाईल.
बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी मिळणारे 51 हजार रुपये|
Pm Vishwakarma Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
पी एम विश्वकर्मा योजनेसाठी असा करा अर्ज |
- अर्ज करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटवर गेल्यानंतर नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज ओपन झाल्यावर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि Capcha कोड भरायचा आहे.
- त्यानंतर ओटीपी च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करावे लागेल.
- त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून, फिंगर प्रिंट ऍथेंटीफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- ऍथेंटीफिकेशन पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर अर्ज उघडणार आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती नीट व व्यवस्थित भरा.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- शेवटी फायनल सबमिट या ऑप्शन वर क्लिक करावे, त्यानंतर तुम्हाला पावती मिळणार आहे.