बांधकाम कामगार योजना |
bandhkam kamgar yojana
bandhkam kamgar yojana online stutes
bandhkam kamgar yojana benifits
mahabocw.in
bandhkam kamgar yojana maharashtra goverment
नमस्कार, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेले आहेत. या योजना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत कामगारांना विविध वस्तू स्वरूपात आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामध्ये भांडी संच योजना, शिष्यवृत्ती योजना अशा 32 प्रकारच्या योजनांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे महामंडळाकडून या योजनेची वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली होती. परंतु आत्ता पुन्हा बांधकाम कामगार योजना सक्रिय झालेले आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य व विविध लाभ मिळण्याची संधी आहे.
त्यासाठी कामगार मंडळाकडून अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी अनेक कामगारांनी या योजनेअंतर्गत लाभासाठी अर्ज केला होता, परंतु आचारसंहितेच्या काळात ही योजना थांबल्याने प्रक्रिया झाली नव्हती. आता योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून प्रलंबित अर्जाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तुम्ही केलेला अर्ज मंजूर झालाय की नाही ? हे तपासणी महत्वाचे आहे. बांधकाम कामगार योजनेसाठी आपण केलेला अर्ज मंजूर झाला आहे का ? पेंडिंग पडला आहे ? हे कसे पाहणार त्यासाठीची प्रोसेस काय आहे ? याबद्दल पूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
संजय गांधी निराधार योजना अर्ज सुरू | तात्काळ अर्ज करून मिळवा मदत |
बांधकाम कामगार योजनेचा उद्देश |
- इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ही योजना राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येत.
- या योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक मदत आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आरोग्य साठी विमा तसेच, लग्नासाठी पाल्यांच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचा उद्देश आहे.
Bandhkam Kamgar Yojana | या योजनेचे महत्वाचे फायदे |
- विमा संरक्षण
- आर्थिक सहाय्य
- शैक्षणिक मदत
- वैद्यकीय सुविधा
कडबा कुट्टी खरेदीसाठी शेतकऱ्याला मिळणार 50 टक्के अनुदान | लगेच अर्ज करा, मिळेल लाभ |
अर्ज मंजूर झालाय का ? ते असे चेक करा |
- सर्वात प्रथम आपणाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- आपल्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची Mahabocw.in ही अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- त्यानंतर अनेक पर्याय समोर दिसतील, त्यातील बांधकाम कामगार प्रोफाइलवर login करा.
- या पर्यायावर क्लिक करा ‘ या ठिकाणी आपला आधार नंबर आपल्या अर्जासोबत दिलेला मोबाईल नंबर टाका.
- त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपला समोर आपला अर्जाची संपूर्ण माहिती स्क्रीनवर ओपन होईल.
- त्यात तुमचा अर्ज Accept झाला आहे की ? पेंडिंग आहे, हे दिसेल.
- अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता.