बांधकाम कामगार योजने अंतर्गत कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी मिळणारे 51 हजार रुपये| Bandhkam Kamgar Vivah Yojana |

                           बांधकाम कामगार विवाह योजना 

Bandhkam kamgar vivah Yojana
Bandhkam kamgar Yojana Maharashtra
Bandhkam kamgar Yojana apply online
Mahabocw.in
Bandhkam kamgar vivah scheme

Bandhkam kamgar vivah Yojana
Bandhkam kamgar Yojana Maharashtra
Bandhkam kamgar Yojana apply online
Mahabocw.in
Bandhkam kamgar vivah scheme

नमस्कार, Bandhkam kamgar vivah Yojana राज्य शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्यासाठी विविध योजना सुरू आहेत. त्यामध्ये भांडी संच वाटप योजना, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, दिवाळी बोनस योजना तसेच मुलीच्या लग्नासाठी अनुदानही दिले जाते.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम महामंडळामार्फत ही विकास योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांच्या अर्थसहाय्य दिले जातील.

बांधकाम कामगार विवाह योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे ? योजनेचा उद्देश काय ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? अर्ज कसा करायचा ? याबाबतची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पीएम इंटर्नशिप योजना | बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5000/- हजार रुपये | अर्ज कसा करावा ? पात्रता काय ? संपूर्ण माहिती |

बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी पात्रता |

  • बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा केवळ राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींना मिळणार आहे.
  • बांधकाम कामगाराला जर दोन मुली असतील तर केवळ एकाच मुलीच्या लग्नासाठी या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्जदार कामगाराची मुलगी 18 वर्षा पेक्षा कमी वयाची असू नये, 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलीच्या लग्नासाठीच लाभ घेता येणार आहे.
  • अर्जदार कामगाराची मुलीचे शिक्षण किमान दहावी उत्तीर्ण झालेले असावे, मुलगी जर नववी शिकणारी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Bandhkam kamgar vivah Yojana

लाडक्या बहींनीसाठी आनंदाची बातमी | डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार 2 दिवसात जमा |

आवश्यक कागदपत्रे |

  • मुलीचे विवाह प्रमाणपत्र
  • मुलीचा वयाचा दाखला
  • अर्जदार मुलगी ही बांधकाम कामगाराची असल्याचा पुरावा.
  • कामगाराचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट साईज फोटो ( तीन )
  • बँकेचे पासबुक
  • जन्म प्रमाणपत्र
  • बांधकाम कामगार कार्ड
  • स्वयंघोषणापत्र
  • ग्रामपंचायतीमार्फत बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
मतदान ओळखपत्र काढायचे ? त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे |

Bandhkam Kamgar Vivah Yojana | अर्ज करण्याची पद्धत |

  1. बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
  2. त्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  3. फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
  4. बांधकाम कामगार विवाह अनुदानासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत.
  5. त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे.
  6. जमा केलेल्या अर्जाची पोह्च्पावती घ्या.
  7. अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार विमा योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करू शकता. Bandhkam kamgar vivah Yojana

केंद्र सरकारची नवी विमा सखी योजना सुरू | महिलांना 7000/- हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार |

Leave a Comment