Pm Internship Scheme 2024 | पीएम इंटर्नशिप योजना |
Pm internship scheme 2024
Apply online pm internship scheme
Pm internship Yojana
Online process for PM internship scheme
Internship scheme for pm
नमस्कार, Pm internship scheme 2024 केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी इंटर्नशिप योजना सुरू केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी आर्थिक वर्ष 2024 – 25 साठी सादर केलेला अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. पुढील पाच वर्षात 1 कोटी तरुणांना या योजनेचा फायदा होईल .
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या तरुणांना प्रति महिना पाच हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर एक वर्ष पूर्ण केल्यानंतर सरकारकडून वेगळेच 6000/- हजार रुपये देण्यात येतील.
पीएम इंटर्नशिप योजना साठी अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही योजना नक्की काय आहे ? त्यासाठी अर्ज कसा करावा ? पात्रता काय आवश्यक आहे ? तसेच यामध्ये काय सुविधा मिळणार आहे ? त्याच्या सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
नक्की काय आहे ? पीएम इंटर्नशिप योजना |
भारत सरकारने Pm internship scheme 2024 तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. हा सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट आहे. 3 ऑक्टोबरला ही योजना सुरू करण्यात आली.
या इंटर्नशिप दिली जाणार आहे. त्यामध्ये पाच हजार रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 हजार रुपये भारत सरकार आणि 500 रुपये हि कंपनी देईल. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबर पर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून बारा महिन्यांसाठी इंटरंशिप सुरू होईल.
या योजनेअंतर्गत भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. या पाच वर्षाच्या कालावधीत एक कोटी तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे उद्दिष्ट आहे.
इंटर्नशिप बारा महिन्यांसाठी असेल, चालू आर्थिक वर्षात 1.25 लाख इंटर्नशिप उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा सूत्रांनी सांगितले आहे. यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बऱ्याच कंपनीने या योजनेत सारस्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. Pm internship scheme 2024
12 ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू होणार |
१० ऑक्टोबर पर्यंत कंपन्या त्यांच्या नियंत्रित पोस्टची माहिती देतील. इच्छुक तरुण 12 ऑक्टोबर च्या मध्यरात्रीपासून https://pminternship.mca.gov.in/login/ इंडियन पोर्टलवर नोंदणी करू शकतात. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादीही 26 ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना दिली जाईल.
हे पोर्टल प्रायोगिक तत्वावर नुकतेच सुरू करण्यात आले असले, तरी इंटर्नशिप च्या अर्जासाठी पोर्टल उघडण्यासाठी सरकारने विजयादशमीचा शुभ दिवस निवडला आहे. Pm internship scheme 2024
Pm Internship Scheme 2024 | आवश्यक पात्रता |
- अर्जदाराची वयोमर्यादा 21 ते 24 वर्ष असावी.
- इंटर्नशिप साठी अर्ज करणारे उमेदवार हायस्कूल, उच्च माध्यमिक शाळा उत्तीर्ण असावेत, तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- तसेच पॉलिटेक्निकल इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा धारण केलेला असावा किंवा यासारखी पदवी असलेले पदवीधर असावेत. BCA,BBS व B.FARM इत्यादी.
- पूर्णवेळ नोकरीत गुंतलेले अर्जदार व्यक्ती नसावी.
- सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती पात्र नाहीत.
- IIT, IIM यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील पदवीधर किंवा CA किंवा CMA यासारख्या पात्रता असलेल्यांना वगळण्यात आले आहे.
- ही योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय आणि कौशल केंद्रीय स्किल सेंटर येथील तरुणांसाठी खुली आहे.
Pm Internship Scheme 2024 | असा करा अर्ज |
- पीएम इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
- रजिस्टर लिंक वर क्लिक करा मग एक नवीन पेज ओपन होईल.
- रजिस्ट्रेशन फॉर्म भरा आणि त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
- उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोर्टल द्वारे बायोडाटा तयार केला जाईल.
- प्राधान्याने स्थान, क्षेत्र, कार्यक्रम, भूमिका आणि पात्रता या आधारे वर 5 पर्यंत इंटर्नशिप साठी अर्ज करा.
- वरील गोष्टी पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट वर क्लिक करा आणि कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा.
- पुढील आवश्यक ते प्रक्रियेसाठी त्याची एक प्रिंट स्वतः जवळ ठेवा.
1 thought on “पीएम इंटर्नशिप योजना | बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5000/- हजार रुपये | Pm Internship Scheme 2024 | अर्ज कसा करावा ? पात्रता काय ? संपूर्ण माहिती |”