SBI Asha Scholarship | SBI आशा शिष्यवृत्ती |
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SBI asha scholarship विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हुशार पण गरीब विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे अधिसूचना जारी केलेले आहे. एसबीआयच्या सीएसआर शाखेने एसबीआय अशा शिष्यवृत्ती योजनेचे अधिकृत सूचना करून अर्ज सादर करण्यासाठी आव्हान केलेले आहे.
SBI asha scholarship
Asha scholarship scheme
SBI asha scholarship in Marathi
Asha scholarship for education
Educational scholarship scheme
नक्की काय आहे एसबीआय अशा शिष्यवृत्ती |
मित्रांनो, SBI asha scholarship देशातील गरीब पण हुशार असणाऱ्या तसेच प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एसबीआय फाउंडेशनच्या शैक्षणिक शाखेकडून चालवण्यात येते. आशा शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत किंवा त्यांचे शिक्षण व भविष्य उज्वल करणे हा आहे.
एसबीआय शिष्यवृत्ती देशातील हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये व त्यांचे ज्ञान वाया जाऊ नये. यासाठी आर्थिक मदत करते. एसबीआय शिष्यवृत्ती ही माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते पदवी तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करते.
तसेच आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. या स्कॉलरशिप योजना अंतर्गत 15 हजार रुपये पासून ते साडेसात लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता | PM Kisan Yojana 18th Installment |
SBI Asha Scholarship | शिष्यवृत्तीचे स्वरूप |
एसबीआय अंतर्गत सुरू असलेल्या आशा शिष्यवृत्ती अंतर्गत पुढील प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.:
- इयत्ता 6 ते 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी – 15000 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
- पदवी अभ्यासक्रम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना -50000 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 70 हजार रुपयांची मदत केली जाते.
- आयआयटी मध्ये एमबीए सारख्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
- तर आयआयएम मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
MAHA DBT Seed Subsidy Scheme | रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024 सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज | मिळेल लाभ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख |
मित्रांनो, एसबीआय आशा शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख हे 1 आक्टोंबर 2024 पर्यंत दिलेली होती. मात्र आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
त्यामुळे राज्यातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करून आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्ती चा लाभ घ्यावा. SBI asha scholarship
SBI Asha Scholarship | आवश्यक पात्रता |
- अर्जदार विद्यार्थी हे मूळ भारतीय रहिवासी असावा.
- अर्जदार हा चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 ते 12 वी मध्ये शिकत असले पाहिजेत.
- विद्यार्थिनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
- अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
- इयत्ता 6 वी ते 12 वी मधील पात्र विद्यार्थ्यांनी प्रत्येक पंधरा हजार रुपये देण्यात येतात.
आवश्यक कागदपत्रे |
- मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट
- आधार कार्ड
- चालू वर्षाची फी पावती
- चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा/ प्रवेश पत्र / संस्थेची ओळखपत्र
- अर्जदार किंवा पालकाचे बँक खाते पासबुक
- उत्पन्नाचा पुरावा
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
Ladki bahin Yojana Update | ” दिवाळी भेट ” लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | लगेच चेक करा |
SBI Asha Scholarship | महत्वाची टीप |
विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता सहावी ते बारावी तसेच पदवी तर आयआयटी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता कागदपत्रे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. तो तुम्ही एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन सविस्तर माहिती पाहू शकता. SBI asha scholarship
1 thought on “SBI Asha Scholarship | 6 वी ते उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयांचे SBI आशा शिष्यवृत्ती मिळणार | अर्ज करण्यासाठी 20 ऑक्टोबर शेवटची तारीख |”