SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |

Table of Contents

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 |

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024
stree shakti yojana
sbi stree shakti yojana marathi
sbi stree shakti yojana onlain form
Sbi scheme i india

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबवल्या जात असतात त्या समाजातील विविध स्तरातील लोकांसाठी राबवल्या जातात त्यामध्ये अपंग, विधवा स्त्रिया, विद्यार्थी, नवजात बालक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी व बांधकाम कामगार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांच्या हितासाठी योजनांची आमलबजावणी केली जाते.
आपल्या देशात स्त्री शिक्षणाचा पाया क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवला. त्यातून स्त्रियांची शिक्षणाची वाट चालू झाली व प्रत्येक घरातील मुलगी शिकू लागली. स्वतःच्या पायावर उभे राहून कर्तव्यदक्ष स्त्री झाली.
सुशिक्षित स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना पाठबळ देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय मार्फत एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्या योजनेचे नाव ” SBI स्त्री शक्ती योजना मराठी ” होय.
या योजनेद्वारे ज्या महिलाना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांना स्त्रीशक्ती योजनेतून एसबीआय कर्ज उपलब्ध करून देते. स्टेट बँक ऑफ इंडिया महिलांना अत्यंत कमी व्याजदराने स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. हे या योजनेचे महत्वाचे वैशिष्ट्ये आहे.
ज्यातून महिला कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतात व त्या माध्यमातून त्या इतर बेरोजगार स्त्रियांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. तसेच त्यातून समाजाचा विकास घडवून आणतात.
या योजने अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 25 लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज घ्यायचे असेल, तर त्या स्त्रीची व्यवसायात किंवा 50 टक्के भागीदारी असली पाहिजे. हि या sbi स्त्री शक्ती योजनेची महत्वाची अट आहे.

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, आपल्या समाजातील निरनिराळ्या घटकांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती आपण रोजच पाहत असतो. समाजातील आर्थिक दृष्ट्या गोरगरीब जनतेचा विकास साधण्याच्या हेतूने या योजना राबविल्या जात असतात.

त्याचप्रमाणे आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत चालवण्यात येणाऱ्या स्त्री शक्ती योजना मराठीची माहिती पहाणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या आसपासच्या परिसरात ज्या काही स्त्रीया असतील, ज्या स्वताचा लघु उद्योग चालवीत असतील. त्यांना या योजनेची माहिती सांगा.त्यामुळे त्यांना आपला उद्योग मोठा करण्यासाठी कर्ज उपलब्ध होईल. त्यासाठी आमचा हा लेख ज्यास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हि विनंती.

योजनेचे नाव SBI स्त्री शक्ती योजना मराठी 
योजनेची सुरुवातकेंद्र सरकार ( sbi )
लाभार्थीदेशातील लघु उद्योग करणाऱ्या महिला
लाभअत्यंत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणे
उद्देशस्त्रीयांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे
अर्ज करण्याची पध्दतऑफलाईन / ऑनलाईन

 

हे देखील वाचा –

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना | New | Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | Good News | बहुजन समाजातील तरुणांना मिळणार लाभ |

New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजनेची उद्दिष्ट्ये |

  •   देशातील महिलांना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे प्राण्यास मदत करण्याच्या उद्देशाने एसबीआय स्त्रीशक्ती योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • एसबीआय या योजनेच्या माध्यमातून महिलांन व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते.
  • या योजने अंतर्गत कर्ज मिळाल्याने महिला त्यांच्या स्वप्न पूर्ण करू शकते. तसेच स्वावलंबी होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करते.
  • योजनेच्या माध्यमातून समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन पडले.
  • एसबीआय स्त्रीशक्ती योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल.

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजनेची वैशिष्ट्ये |

  • देशात स्त्रीशक्ती योजनेची सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने केली.
  • या योजनेच्या माध्यमातून एसबीआय देशातील लघु उद्योग करणाऱ्या महिलांसाठी कर्ज पुरवठा करते.
  • या योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांचे कर्ज दिल्याने लघु उद्योगाचे मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतर होते.
  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो.
  • एसबीआय स्त्रीशक्ती योजना ही महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजने अंतर्गत समाविष्ट असणारे व्यवसाय |

देशात स्टेट बँक ऑफ इंडिया कडून sbi स्त्री शक्ती योजने अंतर्गत स्त्रीया न वेगवेगळ्या व्यवसाय व लघु उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो, ते व्यवसाय प्रकार पुढीलप्रमाणे :

  1. दुग्ध व्यवसाय
  2. शेती उत्पादने
  3. कापड क्षेत्र
  4. घरगुती उत्पादने
  5. पापड बनवण्याचा व्यवसाय
  6. लोणचे, मसाले बनवण्याचे व्यवसाय
  7. अगरबत्ती निर्मिती व्यवसाय
  8. कॉस्मेटिक वस्तू किंवा ब्युटी पार्लरचा व्यवसाय

 

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजने अंतर्गत मिळणारी कर्जाची रक्कम |

स्टेट बँक ऑफ इंडिया देशात महिलांना स्त्री शक्ती योजने अंतर्गत कर्जवाटप करते ते पुढील प्रमाणे:

  • किरकोळ व्यापारी 50 हजार ते दोन लाख रुपये
  • व्यवसाय उपक्रम 50 हजार ते दोन लाख रुपये
  • व्यावसायिक 50000 ते 25 लाख रुपये
  • एस एस आय 50000 ते 25 लाख

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजने अंतर्गत व्याजदर |

  1. ज्या महिलेने वैयक्तिक व्यवसायासाठी लागू असलेल्या श्रेणी अंतर्गत मर्जीन 5 टक्केने कमी केले जाईल.
  2. तसेच कर्ज घेतलेला रकमेनुसार व्याजदर बदलेल.
  3. जर एखाद्या महिलेने या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये किंवा त्याहून जास्त कर्ज घेतले असेल तर त्या महिलेला त्यासाठी 0.5 टक्के इतका व्याजदर द्यावा लागेल.

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजनेचे फायदे |

  •  राज्यात महिलांना स्त्री शक्ती योजना अंतर्गत एसबीआयकडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरने कर्ज उपलब्ध होते.
  • या योजनेतील पात्र अर्जदार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 25 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर करून दिले जाते.
  • महिलांनाही कर्ज वेगवेगळ्या श्रेणीमधून लागू असल्याने मार्जिन पाच टक्के वरून कमी करण्यात येते.
  •  एसबीआय स्त्री शक्ती योजनेअंतर्गत एखाद्या महिलेने दोन लाख किंवा जास्त कर्ज घेतले असेल तर त्यामुळे त्याला पाच टक्के कमी असल्यास द्यावे लागेल.
  • एसबीआय मार्फत दिला जाणारे कर्जाची रक्कम ही पाच लाख रुपये असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची हमी देण्याची गरज नाही.
  • या योजनेअंतर्गत MSM इ मध्ये नोंदणीकृत कंपन्यांना पन्नास हजार ते 25 लाख पर्यंतचे कर्ज हे बँक देते.
  • स्त्री शक्ती योजनेच्या माध्यामातून  ग्रामीण भागातील स्त्रियांना आपला व्यवसाय मोठा करता येणार आहे.
  • sbi स्त्री शक्ती योजनेच्या माध्यमातून स्त्रीयांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येईल.
  • या योजनेतून स्त्रीया स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे समाजतील इतर स्त्रीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजने अंतर्गत आवश्यक पात्रता |

  • एसबीआय स्त्री शक्ती योजनेसाठी अर्ज करणारी अर्जदार महिला हि मूळ भारतीय रहिवासी असावी.
  • या कर्ज योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचा स्वतःचा लघु व्यवसाय असावा.
  • sbi स्त्री शक्ती योजने अंतर्गत फक्त देशातील महिलांनाच लाभ दिला जाईल.
  • अर्जदार महिलेकडे व्यवसायातील 50 टक्के किंवा त्याहून अधिक हक्क असेल तरच ती कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकते.
  • वकील, डॉक्टर अशा नोकरदार सेवांमध्ये काम करणारा महिलाही या योजनेस अंतर्गत कर्ज मिळू शकतात.
  • sbi स्त्री शक्ती योजने अंतर्गत किरकोळ सेवा पुरवणाऱ्या लघु उद्योगांसाठी कर्ज पुरवठा केला जातो.

 

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. कंपनीच्या मालकीची प्रमाणपत्र
  5. योजनेचा अर्ज
  6. कंपनी भागीदारीत असल्याचे बँक स्टेटमेंट
  7. पाठीमागे दोन वर्षाचा आय टी आर
  8. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  9. मोबाईल नंबर
  10. पासपोर्ट साईझ फोटो
  11. ई-मेल आयडी
  12. कंपनीच्या नफा-तोटा विवरण पत्र

 

SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | SBI स्त्री शक्ती योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेत जावे लागेल.
  • कर्मचाऱ्यांकडून एसबीआय स्त्री शक्ती कर्ज योजनेचे माहिती मिळेल.
  • त्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जा मध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व अचूक भरावे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतात.
  • नंतर तो अर्ज बँक कर्मचाऱ्याकडे जमा करावा.
  • बँक अधिकारी अर्जाची पडताळणी करून कर्ज मंजूर करतील.
  • कर्ज मंजूर झाल्याच्या 24 ते 48 तासात तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
  • अशाप्रकारे तुम्ही एसबीआय स्त्रीशक्ती योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

1 thought on “SBI Stree Shakti Yojana Maharashtra 2024 | Good News | SBI स्त्री शक्ती योजना मराठी 2024 | महिला उद्योजकांना सुवर्णसंधी |”

Leave a Comment