Saur krushi Pump Yojana Maharashtra | मुख्यमंत्री कृषी पंप योजना |
Saur krushi Pump Yojana Maharashtra |
नमस्कार शेतकरी बंधुनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी आणि त्यातून शेतकरी सुख-समृद्धीने संपन्न व्हावा. या साठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे राबवीत असते. याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सुरु करीत असते.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप सुरु करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पठारीभागात आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या उर्जेच्या वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.
त्याचप्रमाणे पारंपारिक उर्जेचे स्त्रोत निसर्गामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच त्यांचा अत्यंत वापर झाल्यामुळे निसर्गामध्ये असमतोल निर्माण होत आहे. त्यातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी हि वीज जर अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून म्हणजे सौर उर्जेतून मिळविण्यात आली तर हे शेतकऱ्यांच्या अत्यंत फायद्याचे आहे, तसेच यामुळे निसर्गाचा समतोल सुद्धा साधल्या जाईल. आणि पर्यावरणाचे रक्षण होईल.
Saur krushi Pump Yojana Maharashtra | 2024 अर्थसंकल्प |
2024 चा अर्थसंकल्प दि. 27 फेब्रुवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात या वर्षी पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात १ लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ७८ हजार ७५७ पंप कृषी पंप बसवण्यात आल्याचे ही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजने अंतर्गत ८ लाख ५० हजार कृषी पंप बसवण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडताना केली.
ऊर्जा क्षेत्रात ४० टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातही रूफ टॉप सोलर योजना लागू करण्यात येत आहे. त्यासाठी ७८ हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, असंही पवार म्हणाले. सर्व योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला.
हे पण वाचा – Good News | Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024 | New | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र |
Drought In Maharashtra 2024 New | राज्यात 224 नवीन महसूल मंडळात दुष्काळ जाहीर |
Bal Sangopan Yojana Maharashtra | 2024 | Good News | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
- या योजनेअंतर्गत शेतात वापरात येणारे डीझेल आणि इलेक्ट्रिक पंपावर चालणारे सिंचन बंद करणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यावर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करणे. हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजने अंतर्गत राज्य शासन सौर पंप किमतीच्या 95% अनुदान देते.
- त्यमुळे लाभार्त्यला फक्त 5% रक्कम भरावी लागणार आहे.
- या सौर पंप योजनेमुळे शेतकऱ्याच्या उत्पनात वाढ होईल.
- तसेच सौर पंपाच्या वापरणे पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही.
Saur krushi Pump Yojana Maharashtra | स्वरूप |
योजनेचे नाव | सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरवात | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
योजनेचा लाभ | सौरपंपासाठी आर्थिक अनुदान |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
योजनेची वेबसाइट | अधिकृत website |
Saur krushi Pump Yojana Maharashtra | या योजनेचे फायदे |
- या योजनेचा लाभ महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- या योजनेत 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 3 HP पंप मिळणार आहे.
- तसेच 5एकर पेक्षा जास्त शेतीक्षेत्रासाठी 5 HP पंप मिळणार आहे.
- या सौर कृषी पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकार 25,000 सोलर वॉटर पंप वाटप करणार आहे.
- आणि दुसऱ्या टप्प्यात 50,000 सौर पंपांचे वाटप केले जाणार आहे.
- या योजनेत राज्यातील कृषीपंप शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौरपंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- ज्या शेतकऱ्यांकडे आधीच वीज जोडणी आहे त्यांना या योजनेंतर्गत सौरऊर्जेवर चालणाऱ्या एजी पंपाचा लाभ दिला जाणार नाही.
- सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र 2024 पासून सरकारवरील विजेचा अतिरिक्त भारही कमी होईल.
- जुने डिझेल पंप बदलून नवीन सौर पंप लावल्याने पर्यावरणातील प्रदूषणही कमी होईल.
Saur krushi Pump Yojana Maharashtra | लाभार्थ्यांचा हिस्सा |
लाभार्थी | 3 HP पंप लाभार्थी हिस्सा | 5 HP पंप लाभार्थी हिस्सा | 7.5 HP पंप लाभार्थी हिस्सा |
---|---|---|---|
सर्वसाधारण लाभार्थी | रुपये -16,560/ (10 %) | रुपये – 24,710/ (10%) | रुपये – 33,455/ (10%) |
अनुसूचित जाती | रुपये – 8,280/ (5%) | रुपये – 12,355/ (5%) | रुपये – 16,728/ (5%) |
अनुसूचित जमाती | रुपये – 8,280/ (5%) | रुपये – 12,355/ (5%) | रुपये – 16,728/ (5%) |
Saur krushi Pump Yojana Maharashtra | सौर कृषी पंप योजनेची पात्रता |
- Saur krushi Pump Yojana Maharashtra 2024 अंतर्गत पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेले शेतकरीच या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेतून पारंपरिक वीज जोडणी असलेल्या शेतकऱ्यांनाच सोलर एजी पंपाचा लाभ मिळणार आहे.
- पारंपारिक ऊर्जेच्या स्त्रोताने (म्हणजे महावितरणद्वारे) विद्युतीकरण न केलेले परिसरातील शेतकरी.
- या योजनेत डोंगराळ, दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी पत्र आहेत.
- वनविभागाच्या NOC मुळे गावातील शेतकऱ्यांचे अद्याप विद्युतीकरण झालेले नाही, असे शेतकरी पत्र असतील.
- या योजनेसाठी एजी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांची प्रलंबित यादी.
- या योजनेत जलस्रोत म्हणजे नदी, नाले, स्वत:चे सामान्य शेत तलाव आणि खोदलेल्या विहीर इ. उपलब्ध असतील असे शेतकरी.
Saur krushi Pump Yojana Maharashtra | या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- रहिवाशी दाखला
- शेतीची कागदपत्रे , 7/ 12
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो