Ayushman Bharat Yojana Maharashtra 2024 | आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र |
Ayushman Bharat Yojana Maharashtra |
नमस्कार मित्रानो, केंद्र शासना देशातील जनतेसाठी वेगवेगळ्या योजना रोज जाहीर करीत असते. मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनहितासाठी कल्याणकारी योजना येत असतात. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना होई. हि योजना गरीब ,मागासलेल्या ,निराधार ,आर्थिकदृष्ट्या कुमकुवत व शेतकरी यांच्यासाठी सरकारने हि योजना सुरु केली आहे.
आयुष्यमान भारत योजना सप्टेंबर 2018 रोजी सुरु करण्यात आली होती. गरीब, निराधार आणि दुर्बल घटकाला उपचार आणि आरोग्य सुविधा पुरविणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. आयुष्यमान भारत अंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना, AB PM-JAY ही जगातील दुसरी सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरली आहे.
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या कुटुंबाना मिळणार लाभ |
केंद्र व राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने, आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य विमा योजनेचा (AB PM-JAY) विस्तार वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी, बांधकाम क्षेत्रातील कामगार, खाण कामगार, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांना योजनेचा थेट लाभ देण्याचा प्रस्ताव आहे.
Ayushman Bharat Yojana Maharashtra | आरोग्याचा अर्थसंकल्प 2024 |
मित्रानो ,मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या सत्राच्या शेवटच्या अर्थसंकल्पात आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली होती . त्यनुसार अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका, सहाय्यक आणि आशा कामगारांना आयुष्मान योजनेत समाविष्ट केले जाईल. त्यांनाही मोफत उपचार सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही सुविधा वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयुष्मान योजनेंतर्गत कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिली जाते.
त्यप्रमाणे ,सरकारी आकड्यांनुसार, सध्या 55 कोटी लोक या योजनेशी जोडण्यात आले आहेत. 20 डिसें 2023 रोजी या योजनेतंर्गत 28.45 कोटी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले आहेत.असे साग्न्यात आले आहे.
तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सरकारने लसीकरणही आणले आहे. मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत दिली जाईल.
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेविषयी थोडक्यात …….|
केंद्र सरकारमार्फत सुरु केलेली हि योजना सर्वसामान्यांना वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबाना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जातो, यासाठी देशातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत रुग्णाला प्रवेशापूर्वी एक आठवडा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर १० दिवसांपर्यंतचा वैद्यकीय चाचण्यांसाठी खर्च दिला जातो. कर्करोग आणि किडनीच्या आजारासह अनेक गंभीर आजारांवरही या योजनेअंतर्गत उपचार केले जातात.
योजनेचे नाव | आयुष्यमान भारत योजना महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | पंतप्रधान नरेंद्र मोदी (2018) |
लाभार्थी | गरीब आणि आर्थिक दृष्ट्या मागास व्यक्ती |
लाभ | 5 लाख रुपये |
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत website |
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेचा उद्देश |
- देशातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
- गरीब व्यक्तीला एखादा आजार झाला, तर त्याचे उपचार घेणे त्याच्या आर्थिक अडचणींमुळे शक्य नसते. त्यमुळे त्यची आर्थिक स्थिती आणखीनच खालावते.
- हि गरज , समस्या ओळखूनच भारत सरकारने ही Ayushman Bharat Yojana maharashtra सुरू केली आहे.
- योजने द्वारे अशा गरजू आणि गरीब व्यक्तींना आरोग्य विमा देऊन, त्याच्या हॉस्पिटलचा खर्च शासनाद्वारे दिला जातो.
- आर्थिक सहाय्य प्रदान करुन कशा प्रकारे गरीबांना मोफत उपचार मिळतील हे पहिले जाते.
हे पण वाचा – PM Kisan Yojana Marathi | Good News | उद्या तुमच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये |
Sukanya Samruddhi Yojana Marathi 2024 | Good News | सुकन्या समृद्धी योजना 2024 |
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेची पात्रता |
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेचे फायदे |
- या योजनेत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळतो.
- या योजनेमध्ये जे लोक सहभागी आहेत, त्यांचा उपचार आणि औषधी खर्च हा पूर्णपणे मोफत केला जाणार आहे.
- या योजने अंतर्गत रुग्णालया मध्ये रुग्णाला प्रवेशापूर्वी 7 दिवसांपर्यंत तपासणी, उपचार तसेच उपचार दरम्यान जेवण आणि तपासणी मोफत दिली जाते.
- तसेच रुग्णाला उपचार झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत औषधे मोफत उपलब्ध करून दिले जातात.
- या योजनेंतर्गत रुग्णाला तब्बल 1350 आजारांसाठी पात्र व्यक्तीला मोफत उपचार घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र रुग्णाला कोणताही खर्च करण्याची गरज नाही.
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेतील आजारांची यादी |
- कोरोन
- कर्करोग
- किडनीचे आजार
- ह्रदयविकार
- डेंग्यू
- चिकनगुनिया
- मलेरिया
- डायलिसीस
- हिप रिप्लेसमेंट
- वंधत्व मोतीबिंदू
या पेक्षाही अधिक 1300 गंभीर आजारावर या योजने अंतर्गत मोफत उपचार दिले जातात.
- ओळखपत्र
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशनकार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Ayushman Bharat Yojana Maharashtra | या योजनेअंतर्गत असणाऱ्या रुग्णालयांची यादी
Ayishman Bharat Yojana या योजनेसाठी महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार सरकारी व खाजगी अशी दोन्ही रुग्णालये समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या रुग्णालयांची यादी कशी पहायची हे आपण खाली step by step पाहणार आहोत.
- महाराष्ट्रातील रुग्णालय पाहण्यासाठी प्रथम @www.hexahealth.com या website ला भेट द्या.
- त्यावरती state silect करायचा option आहे.
- त्यामध्ये जाऊन आपला जिल्हा निवडायचा आहे.
- city निवडल्यानंतर Ayishman Bharat Yojana maharashtra hospital list प्रदर्शित होईल.