रब्बी पिक विमा योजना |
Rabbi pik vima Yojana 2024
Rabbi pik Pera
Rabbi pik vima Yojana online
Pik vima Yojana
Krushi Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Rabbi pik vima Yojana 2024 आपला देश आक्रोशी प्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्याला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. या नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान पासून वाचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीक विमा योजना राबवण्यात येते.
ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण विमा भरता येतो. प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकरी खरीप व रब्बी हंगामाचा पिक विमा काढू शकतो. खरीप हंगाम राज्यात जून पासून सुरू होतो, तर रब्बी हंगामा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतो.
या कालावधीत अनेक नैसर्गिक आपत्ती असतात जसे की, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ असे अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढायचा असेल, त्यांनी दिलेला मुदतीच्या आत आपला पिक विमा काढणे आवश्यक असते. Rabbi pik vima Yojana 2024
पिक विमा कोण भरू शकते ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ? कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे ? अर्ज कुठे करायचा ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रियेला सुरुवात | 50 % मिळणार लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |
एक रुपयात पिक विमा |
Rabbi pik vima Yojana 2024 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व समावेशक पिक विमा योजना राबवून शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाच्या या सर्व समावेशक पिक विमा योजनेच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी एक रुपयाचा पिक विमा अर्ज सादर करता येतो.
त्याचप्रमाणे, राज्य शासनामार्फत या योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिक विमा एक रुपया मध्ये शेतकऱ्यांना आता भरता येणार आहे.
रब्बी हंगामामध्ये समाविष्ट असणारे पिके |
शासनामार्फत खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांसाठी सर्वसमावेशक पिक विमा योजना हि एक रुपया मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्यामधील रब्बी हंगाम पिक विमा योजनेमध्ये पुढील पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये :
- ज्वारी
- गहू
- हरभरा
- कांदा
- जवस
- मोहरी
- करडे
- वाटाणे
या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. Rabbi pik vima Yojana 2024
सातबारावर आईचे नाव बंधनकारक | सरकारचा मोठा निर्णय | 1 नोव्हेंबर पासून होणार अंमलबजावणी |
Rabbi Pik Vima Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जमिनीचा सातबारा उतारा
- जमिनीचा आठ अ उतारा
- बँक पासबुक
- पिक पेरा सामाईक खाते असल्यास सहमती पत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
रब्बी पिक विमा योजना अर्ज करण्याची पद्धत |
रब्बी हंगामातील पिक विमा योजना अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. रब्बी हंगामामधील सर्व समावेश पिकामध्ये असणार्या आपल्या पिकाचा पिक विमा आपण स्वतः किंवा आपल्या जवळ असणार्या CSC सेंटर मधून आपण आपला पीक विमा अर्ज सादर करू शकतो.