New | Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 | नोंदणी सुरु |

Table of Contents

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2024 |

pradhan mantri krishi sinchai yojana PM krushi yojana maharashtra krushi sinchan yojana marathi pradhan mantri krishi sinchai yojana 2024 maha govt scheme

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्यात शासनामार्फत कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जात असते. या योजना या अनुदान तत्त्वावर राबवल्या जातात. राज्यातील कृषी क्षेत्राचा आर्थिक व सामाजिक विकास करण्याचे दृष्टीने योजना महत्त्वाच्या असतात.
राज्यात शासनामार्फत शेतकऱ्यांना शेतीत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेल्या एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. ती योजना म्हणजे ” प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना “ होय.
राज्यात शेती लोकांचा पारंपारिक व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला आहे.  त्यामुळे लोक जुन्या पद्धतीने शेती व्यवसाय करतात. पण बदलत्या काळानुसार कमी होत चाललेले पर्जन्यमान, यामुळे शेती क्षेत्रावर परिणाम झालेला दिसून येतो.
पर्जन्याचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे अशा पद्धतीत जुन्या पद्धतीने वाफे, बांध तयार करून पाणी देणे शक्य होत नाही.
त्यावेळी सिंचन पद्धतीने पाणी देणे योग्य ठरते. त्यासाठी शेतकऱ्याकडे आर्थिक भांडवलाची गरज असते. ते नसल्याने ते पारंपारिक पद्धतीने शेती करतात. याचा परिणाम म्हणून त्यांना थोड्या कालावधीनंतर पाण्याची कमतरता भासु लागते. त्यामुळे शेतीत मोठे नुकसान होते.
राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून तसेच सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनार्माफत 55% अनुदान देऊन सिंचन सुविधा उपलब्ध करण्यास आर्थिक साह्य केले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन, त्यामुळे पूर्ण वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होतो.
पाण्याचे योग्य पद्धतीने वापर झाल्याने पाण्याचा अपव्यय कमी होतो. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणून शेती क्षेत्राचा विकास करून, राज्यातील नागरिकांचाही आर्थिक विकास करणे. हा या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आतापर्यंत आपण घेतच आलो आहोत. शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी राज्याच्या कृषी विभागामार्फत या योजना राबवल्या जात असतात. त्याचप्रमाणे आज आपण शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती घेणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी शेतकरी लोक असतील व त्यांना आपल्या शेतामध्ये पाण्याच्या बचतीसाठी सिंचन योजना राबवायचे असेल, तर त्यांना या योजनेची माहिती सांगा. तसेच त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही विनंती.

योजनेचे नावप्रधान मंत्री कृषी सिंचन योजना
योजनेची सुरवातकृषी विभाग, महाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सर्व पात्र शेतकरी उमेदवार
लाभसिंचनासाठी 55% अनुदान
उद्देशशेतकर्यांना आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतओंनलाईन

 

हे पण वाचा – 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना | Good News | Yashvantrao Chavan Gharkul Yojana 2024 | घराचे स्वप्न होणार पूर्ण |

ताडपत्री अनुदान योजना मराठी | Good News | Tadpatri Anudan Yojana 2024 | जिल्हा परिषद मार्फात निधी उपलब्ध |

शुभमंगल सामुहिक विवाह योजना महाराष्ट्र | New | Samuhik Vivah Yojana Marathi 2024 | मुलीच्या लग्नासाठी मिळणार 10,000/-रुपये |

कलाकार मानधन अनुदान योजना मराठी | Good News | Kalakar Mandhan Yojana Maharashtra | पहा कसा करायचा अर्ज |

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची उद्दिष्ट्ये |

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने, या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेमुळे शेतकऱ्याच्या पारंपारिक पद्धतीने पाणी देण्याची पद्धत बंद झाल्याने पाण्याचा अपव्यय टाळता येणार आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास होणार आहे.
  • राज्यातील शेती क्षेत्रातील कार्य जलद गतीने व सुलभ व्हावे, या उद्देशाने योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • शेती क्षेत्रात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • सोलापूर खात्रीपूर्वक अशी सिंचन व्यवस्था राज्यात निर्माण करणे.
  • शेती क्षेत्राचा औद्योगिक विकास करून शेतीला उत्तेजन देणे.
  • राज्यातील तरुणांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • राज्यातील कुशल अर्ध कुशल बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची वैशिष्ट्ये |

  1. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांप्रमाणे ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
  2. प्रधानमंत्री कृषी योजनेअंतर्गत जाणारी लाभाचे आर्थिक रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाते.
  3. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी  75% टक्के अनुदान केंद्र शासन व 25 टक्के अनुदान राज्य शासन पुरवते.
  4. महाराष्ट्र राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
  5. कृषी सिंचन योजना ही पारदर्शक व अत्यंत जलद गतीने व्हावी, यासाठी या योजनेतील अटींचे पूर्तता कमी ठेवण्यात आली आहे.

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत मिळणारे अनुदान |

महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या हवामान घटकानुसार, स्थानिक परस्थिती नुसार अनुदानाचे प्रमाण हे कमी – जास्त ठरविण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे :

       स्थानिक परस्थिती / शेतकरी      देण्यात येणारे अनुदान 
       अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी      55 टक्के
       इतर शेतकरी      45 टक्के
      आवर्षण प्रवन क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक     35 टक्के
      आवर्षण प्रवन क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक     45 टक्के
      आवर्षण प्रवन क्षेत्राबाहेरी अल्प व अत्यल्प भूधारक     45 टक्के
      अवर्षण प्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक     60 टक्के

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत येणारे अंतर्भूत घटक |

  1. इन लाईन
  2. ऑनलाईन
  3. मायक्रोजेट
  4. ठिबक सिंचन
  5. तुषार सिंचन
  6. मायक्रो पिक स्पिंकलर
  7. मिनी स्प्रिंकलर
  8. पोर्टेबल स्प्रिंकलर
  9.  रेनगन

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी |

महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील अत्यल्प व अल्पभूधारक सर्व शेतकरी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे फायदे |

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये तुषार सिंचन तसेच ठिबक सिंचन बसवण्यात करिता आर्थिक सहाय्य उपलब्ध होते.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होईल.
  • या योजनेतील सिंचनामुळे पाण्याचा अपव्यय कमी करता येईल व पुरेसे पाणी वर्षभर पुरेल.
  • राज्यातील पाणीच्या समस्याने होणारे शेतीचे नुकसान या योजनेमुळे टाळता येणार आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने आर्थिक उत्पन्नात भर पडेल.
  • या योजनेमुळे तसेच सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात देखील शेती करणे शक्य होईल.
  • या योजनेमुळे शेती कार्य कमी खर्चात व जलद गतीने पार पाडता येईल.
  • महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील व त्यांच्या हातांना काम मिळेल.
  • या योजनेमुळे शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील व इतर तरुण शेती क्षेत्राकडे आकर्षित जाती.

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक पात्रता |

कृषी सिंचन योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे नियम व आटी |

  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
  • राज्याबाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • कृषी सिंचन योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार शेतकऱ्यांच्या नावे 7 /12  व 8 अ असणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सिंचन योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अन्य था लाभ दिला जाणार नाही.
  • प्रधानमंत्री सिंचन योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हेक्टरच्या प्रमाणात क्षेत्र असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या अर्जदार व्यक्तीकडून त्याच्या शेतात विद्युत पंप जोडणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला आत्ताचे वीज बिल सादर करावे लागणार आहे.
  • अर्जदार व्यक्ती मागास प्रवर्गातील असल्यास त्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक पासबुक ची लिंक असावे.
  • शेतात करण्यात येणारी सिंचन प्रणाली कंपनीच्या प्रतिनिधींनी केलेली असावी.
  • या योजनेचा अर्जदाराकडे पूर्वसंमती मिळाल्यानंतर सिंचन संच खरेदी करावा व त्याच्या बिल पावत्या अर्जासोबत जोडाव्यात.
  • या योजनेअंतर्गत पूर्वसंमती मिळाल्यानंतरही 30 दिवसाच्या आत शेतकऱ्यांनी कृषी संच खरेदी केला नसेल, तर त्याच्या लाभ रद्द केला जातो.
  • प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.
  • सामूहिक सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्यास इतरांनाचे सिंचन करण्यासाठीचे सामातीपात्र आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जावा.

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधारकार्ड
  2. मतदान ओळखपत्र
  3. उत्पनाचा दाखला
  4. रहिवाशी दाखला
  5. जमिनीचा ७/१२ व 8अ
  6. मागील 3 महिन्याचे वीज बिल.
  7. पूर्वसंमती पत्र
  8. खरेदी केलेल्या संचाचे बिल
  9. ई-मेल आयडी
  10. मोबाईल नंबर
  11. पासपोर्ट आकाराचे फोटो
  12. बँक खात्याचा तपशील

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्ज करण्याची पध्दत |

  • आपणाला प्रथम शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल.
  • त्यानंतर home page वरील शेतकरी योजना यावर click  करावे.
  • आत्ता एक नवीन page open होईल, त्यामध्ये लॉगिन करून तुमचं username व password  टाकावा.
  • आता एका new page open  होईल त्यामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधा या बाबीवर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर सिंचन साधने व सुविधाचा अर्थ ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
  • त्यानंतर या अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स apload  करावयाचे आहेत.
  • त्यानंतर एक नवीन page  होईल त्यामध्ये तुम्हाला 23/- रुपये भरायचे आहेत.
  • त्यानंतर submit  बटनावर click  करून अर्ज submit  करावा.
  • अशा प्रकारे तुमची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

 

Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana |

प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना अधिकृत website CLICK HERE

प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना शासन निर्णय CLICK HERE

 

 

Leave a Comment